Vikas Patil Profile picture
राजकीय /भौतिक विज्ञान/ इतिहास / वैचारीक व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्ती विषयी जिज्ञासा.. Blogger..✍
Feb 10, 2022 7 tweets 3 min read
🎯
दुसऱ्यांच्या वागण्या बोलण्याचा त्रास होतो..?
त्यांच्या नावाचे पासबुक जाळून टाका!
- व.पु.काळे
कोणतीही व्यक्ती असो, तुमच्याशी विचित्र वागली, तिने तुमचा अपमान केला, दुर्लक्ष केलं, तुमच्या उपकारांचं कोणाला विस्मरण झालं, तर एकेक अकाऊंट पूर्ण झाला, असं आजपासून स्वत:ला सांगायला लागा आपण जो जन्म घेतला आहे, तो अपेक्षापूर्तीसाठीच नाही.आपल्या दुसऱ्यांकडूनच अपेक्षा असतात, असे नाही. आपल्या स्वत:कडूनही अपेक्षा असतात. त्या पूर्ण होत नाहीत. उरतात फक्त जाळणाऱ्या व्यथा. माझ्या मते हा जन्म अपेक्षापूर्तीसाठी नाही. हा जन्म परतफेडीसाठी आहे. तुमच्या सौभाग्यवती गेल्या.
Feb 9, 2022 12 tweets 3 min read
🤝मुलांच्या लग्नापूर्वी शांत विचार करूनच निर्णय घ्या🤝

समाजात नविनच प्रथा पडु लागल्या आहेत त्याचा मुलांच्या वैवाहिक जीवनावर फार मोठा परिणाम होत आहे याचा विचार करणे आवश्यक आहे.अवास्तव अपेक्षा असणाऱ्या वर किंवा वधु पित्यानी आपल्या मुलाचे किंवा मुलीचे स्थळ शोधणे सुरू करण्या अगोदर फक्त एक वेळेस तुम्ही जिथे राहात असाल त्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील कोर्टात एक वेळेस फेर फटका मारून या आणि मग घरी येऊन विचार करा की नेमके कसे स्थळ तुम्हाला पाहिजे तुमच्या पेक्षा जास्त श्रीमंत स्थळ तुम्हाला हवे की सर्वसाधारण असले तरी चालेल परंतु चांगली माणसे हवीत
Jun 15, 2021 4 tweets 2 min read
रेल्वेच्या खिडकीत बसून. प्रवास करणाऱा २२ वर्षाच्या मुलगा मोठ्याने ओरडून आपल्या वडिलांना म्हणाला,...... पप्पा बघा झाड मागे पळत आहेत. वडील त्याच्याकडे पाहून हसले. त्यांच्या समोर एक जोडप बसले होते. त्यांना तो मुलगा अबनार्मल वाटला. इतक्यात तो मुलगा परत ओरडला, पप्पा ढग आपल्या बरोबर पळत आहेत. समोर बसलेले जोडपे त्या मुलांच्या वडिलांना म्हणाले, तुम्ही मुलाला चांगल्या डॉक्टरकडे का नाही दाखवत. वडील हसले आम्ही आता हास्पीटल मधूनच येत आहोत. माझा मुलगा जन्मतःच अंध आहे. त्याला आजच डोळे मिळाले......
या जगातील प्रत्येक माणसाची एक वेगळी कथा असते.
Jun 15, 2021 8 tweets 3 min read
#गरुडाचा_पुनर्जन्म !

गरुडाचे जीवनमान 70 वर्षांचे असते, परंतु तो जेव्हा 40 वर्षाचा होतो तेव्हा त्याला एक महत्वाचा निर्णय घ्यावा लागतो.

त्या अवस्थेत त्याच्या शरीराचे 3 महत्वाचे अवयव निष्प्रभ होऊ लागलेले असतात, पंजे लांब आणि लवचिक होतात ज्यामुळे शिकार पकडतायेत नाही , चोच पुढील बाजूला वळते ज्यामुळे भोजन करता येत नाही, पंख जड होतात व छातीस चिकटल्यामूळे पूर्णपणे उघडत नाहीत, गरुड भरारी सीमित करतात. अन्न शोधणे, सावज पकडणे,अन्न खाणे या तिन्ही क्रिया त्याच्यासाठी अवघड बनून जातात.
Jun 13, 2021 4 tweets 2 min read
कोणत्याही स्त्रीचे आत्मबळ वाढविण्यामधे तिच्या कुटुंबियांचा खुप मोठा हातभार असतो. घरच्यांनी जर तिला आधार आणि ठाम पाठींबा दिला तर ती या सगळ्यातून स्वतःला सावरु शकेल. तिला पूर्वीप्रमाणेच दैनंदिन आयुष्य जागायला देणे. लावणे, जसे की वेशभूषा, टिकली, कुंकु, मंगळसूत्र, जोडवी, बांगड्या तिच्या आवडीप्रमाणे तिला वापरु देणे. केवळ नवऱ्याचा मृत्यु झाला म्हणून या गोष्टी तिला वर्ज्य करु नयेत. याबाबतित तिची आवड महत्वाची आहे. तिचे बाह्यरूप कसे असावे किंवा तिने कसे दिसावे हे ठरविण्याचा हक्क सर्वस्वी तिचा आहे आणि तो तिला मिळावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
Feb 24, 2021 5 tweets 2 min read
लघुकथा..!!

नुकतेच तिच्या पतीचे निधन झालेले. कालच तेरावा पार पडला. तिच्या दीड वर्षाच्या जुळ्या मुली. शिक्षण जास्त नाही. पण दिसायला देखणी म्हणून एकविसाव्या वर्षी मागणी घालून लग्न झाले. आता पुढे काय असा विचार करुन डोके फुटायची वेळ आली होती.
@DrSanjayRakibe
@Rohini_indo_aus Image चौदाव्या दिवशी तिने गळ्यातील मंगळसूत्र काढून ठेवले. अंघोळ करुन बारीक काळी टिकली आणि एक साधासा ड्रेस घालून ती स्वयंपाकघरात आली. सासूबाई भाजी निवडत होत्या. "इकडे ये बाळ" अशी हाक ऐकून बिचारी चुपचाप त्यांच्या समोर उभी राहिली. हलकेच तिला जवळ घेऊन ती माऊली बोलली "जे झालं ते झालं.
Feb 22, 2021 6 tweets 3 min read
पांगुळगाडा...!!

खुप वर्षां पुर्वी पोरं सिझेरियन न होता घरीच जन्मायची.

कुणी तरी अनुभवी आज्या त्यांना न्हाऊ माखू घालायच्या.
आईच दूध पिऊन , आजोळहून पाठवलेल्या लाकडी पाळण्यात पोरं गाढ झोपायची.

दूध पिणे आणि झोपणे एवढे दोनच मुख्य कार्यक्रम असायचे.
@faijalkhantroll स्तन्यावर पोसली की पायात बळ यायचं, मग कशाच्या तरी आधारानं पोरं उभं रहायला शिकायची.

आई नाही तर आजीच्या दोन्ही हाताला धरून पोरं पा पा करायला लागली की घरात लाकडी पांगुळगाडा यायचा.

तो बहुतेक आजोळच्या सुताराने बनवून मामा बरोबर पाठवलेला असायचा.
Feb 21, 2021 4 tweets 2 min read
अणुबॉम्बने उद्ध्वस्त झालेल्या जपानसारख्या छोट्या राष्ट्राने देखील आपली प्रगती साधली ती आपल्या मातृभाषेतूनच. कोणत्याही परकीय भाषेचा पांगुळगाडा त्यांनी पत्करला नाही. आपल्या देशाचा आणि आपला व्यक्तिगत विकास आपणांस साधावयाचा असेल तर मातृभाषेचे ऋण मानले पाहिजेत व या मातृभाषेतील थोर ठेवा जपला पाहिजे, वाढविला पाहिजे.
ज्ञानदेवांनी मातृभाषेचे हे सामर्थ्य जाणले होते म्हणूनच त्यांनी मराठीतून ज्ञानाचा प्रसार करण्याचा संकल्प सोडला.
Feb 19, 2021 5 tweets 3 min read
🌼 किंमत एका पेल्याची..!!

वडील आपल्या मुलाला सद्गुणांची किंमत समजावुन सांगत असतात. एक काचेचा पेला हातात घेऊन ते विचारतात,
वडील : "बाळ, या पेल्याची किंमत किती आहे.?"
मुलगा उत्तरतो : "असेल पंधरा रुपये."
वडील : "समज या पेल्यात पाणी भरले तर.?" @TSYIngle @Mrutyyunjay
@rt_marathi मुलगा : "वीस रुपये".
वडील : "आता या पेल्यात केशर विलायचीयुक्त उत्तम दूध भरले."
मुलगा : "आता याची किंमत शंभर रुपये होईल,
वडील : "ठीक आहे. आता मी यात सोन्याचे काही दागिने भरतो."
मुलगा : "आता तर याची किंमत लाखोंच्या घरात होईल."
वडील : आता मी अनमोल अशा जवाहिरांनी
Feb 17, 2021 9 tweets 3 min read
परी..!!

एकदा एका गरोदर पत्नीने मोठया उत्सुकतेने आपल्या पतीला विचारले, "आपल्याला काय होईल, काय अपेक्षा आहे तुमची, मुलगा की मुलगी तुम्हाला काय वाटतं ?"

त्यावर पती म्हणाला "जर आपल्याला मुलगा झाला तर, मी त्याचा अभ्यास घेईन, त्याला गणितं शिकवीन, त्याच्याबरोबर मी मैदानावर खेळायला , पळायला पण जाईन, त्याला मासे पकडायला, पोहायला शिकविन अशा अनेक गोष्टी मी त्याला शिकवीन"

हसत हसत बायकोने यावर प्रतिप्रश्न केला "आणि मुलगी झाली तर?"

यावर पतीने खूप छान उत्तर दिले, "जर आपल्याला मुलगी झाली तर मला तिला काही शिकवावेच लागणार नाही"
Feb 16, 2021 5 tweets 2 min read
म्हणुनच संसार देखणा होतो..!!

स्त्री थकत नाही , हरत नाही ...
हरली , तरी रडत बसत नाही ..,
ती धडपडते, मार्ग शोधते...
स्त्री ...
सतत कार्यमग्न असते...एखाद्या मुंगीसारखी,,सतत कशाचा तरी साठा करत असते...
मुंगी सारखीच,,,शिस्तबद्ध ...आखीव मार्गावरुन चालत राहते,...
स्त्री ..
@TSYIngle जगण्यासाठी तिला व्यसनांचा आधार लागत नाही .,,तिच्यातील जिविगिषु वृत्ती हेच तिचं व्यसन....
ती जगते.....गर्भाशयात मारली गेली नसेल, तर नक्कीच जगते....!
स्त्री ..
धारण करते, पोषण करते...
जगते , तशीच जगवते...
ती मोडत नाही , ती थकत नाही ....
अतीव दुःखानेही , ती कोलमडत नाही ....
Feb 16, 2021 14 tweets 5 min read
क्रिया तशी प्रतिक्रिया..!
#बोधकथा

एक स्त्री आपल्या आलिशान कारने हायवे वरून शहराकडे जात असते. अचानक तिची कार बंद पडते. आकाश ही ढगांनी भरून आलेले असते. लगेच धो धो पाऊस पडतो. तिला गाडी दुरुस्त करण्याची काहीच माहिती नसते.ती इकडे तिकडे Image मदतीसाठी कोणी आहे का ते पाहते तिला कोणीच दिसत नाही. मदतीसाठी इतर गाडयांना हात दाखविते पण कोणताच गाडीचालक थांबत नाही. बराच वेळ जातो आता मात्र तिच्या डोळ्यात काळजीने पाण्याच्या धारा लागतात. तेवढयात सखाराम नावाचा माणूस तिच्या जवळ येतो . त्याला पाहून ती स्त्री प्रथम घाबरते .
Dec 11, 2020 8 tweets 3 min read
वाचा आणि विचार करा...
Cp
बाई जपान ची, नव्वद हजार खर्च करून हजारो किलोमीटर वरून भारतातील लेण्या पाहण्यासाठी मुंबई ला उतरते. खाजगी बसने अजिंठा वेरूळला पोहचते. सोबत एक हाय रेजुुलेशन कॅमेरा, मॅप, एक आठवडा लेण्यांचा अभ्यास, एक प्रश्नांची यादी , अजिंठा वेरूळला येऊन खूप बारकाईने अभ्यास करतात .काही दगडमातीचे नमुने सोबत घेतात लेणी, पहाड, दगडाचे फोटो काढतात. बनवण्याची प्रक्रिया समजुन घेतात.कलाकृतीचे निरिक्षण करतात .
Dec 9, 2020 20 tweets 4 min read
आज देशात सर्वत्र अर्थव्यवस्थेची चर्चा सुरू आहे. एकीकडे सत्ताधारी देशाला ५ ट्रिलियन इकॉनॉमी बनविण्याच्या घोषणा करताहेत, तर दुसरीकडे अनेक अर्थविषयक संस्था मंदीची चिन्हे असल्याचे सांगताहेत. यातील सत्य काहीही असले तरी, जर आपल्याला अर्थव्यवस्थेची घडी नीट करायची असेल तर देशातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्येच्या उदरनिर्वाहेचे साधन असलेल्या कृषीक्षेत्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.आज शेतीवर अवलंबून असलेल्या लोकसंख्येची ढासळती आर्थिक स्थिती आणि सर्वांना परवडण्याजोग्या सकस अन्नाची उपलब्धता हे देशापुढील मोठे आव्हान आहे.