उत्तरेत जे काही कृष्ण साहित्य आहे ते मध्ययुगीन ब्रज/अवधी भाषेत आहे, महाराष्ट्रात त्याआधीच कृष्णावर लिहीलेलं आहे.
मराठीत सगळ्यात जुनं ज्ञात साहित्य हेच महानुभाव साहित्य आहे.ते कृष्णाला सर्वोच्च ठिकाणी मानतात.
#मराठी #कृष्ण अनुबंध मोठा आहे!
#कृष्ण #गोकुळाष्टमी #गोपाळकाला #दहीहंडी
अर्थात् ह्या जुन्या साहित्यात राधा कृष्ण वगैरे प्रकरण नव्हतं, ओडिशातील जयदेवाच्या गीत गोविंदानंतर आलं.
मराठीत त्यावरही विपुल लिखाण झालं, एकनाथांच्या गौळणी त्यानंतर आलेली कित्येक गवळणी, लोकगीतं ह्यांनी कृष्णाच्या शृंगार लीलांवर मोठा भर दिला! #गोकुळाष्टमी #गोपाळकाला
महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल पांडुरंग हे कृष्णाचं रूप असल्यानं तर कृष्ण आपल्या आयुष्याचा भाग झाला, अर्थात् हे कृष्णाचं सखा, माऊली असलेलं वेगळंच रूप!
झाडलोट करी जनी केर भरी चक्रपाणी! असं म्हणणाऱ्या जनाई आपल्याकडे होऊन गेल्या!
#कृष्ण #गोकुळाष्टमी #गोपाळकाला #दहीहंडी
मराठी साहित्यात महानुभाव पंथाचे कित्येक ग्रंथ तर आहेतच, त्यासोबत आपल्या ज्ञानोबांनी कृष्णाच्या गीतेची ज्ञानेश्वरी केली, एकनाथांनी रुक्मिणी स्वयंवर, एकनाथी भागवत केलं! वारकरी पंथात शेवटच्या कीर्तनाला काल्याचं कीर्तन म्हणतात #कृष्ण #गोकुळाष्टमी #गोपाळकाला #दहीहंडी
#मराठी लोकसाहित्यात कृष्ण तर भरपूर आहे, गवळणी, विराण्या असे कित्येक प्रकार मराठीत कृष्णलीला गात असतात! तेच आपसूक आपल्या भावगीत, चित्रपट संगीत ह्यातही आलं, माणिक वर्मा,शिंदेंची गाणी,भरजरी ग पितांबर अशी कित्येक गाणी आपल्या तोंडी रुळली आहेत! #कृष्ण #गोकुळाष्टमी #गोपाळकाला #दहीहंडी
सध्या कृष्ण उत्तर भारतीय,कृष्णाची, गवळणींची वेशभूषा म्हणजे उत्तर भारतीय वेशभूषा हे निव्वळ अज्ञानातून आलेलं आहे, #मराठी संस्कृतीला कृष्णाचा मोठा वारसा आहे,राजा रवी वर्मा ह्यांनी तर कृष्ण कथेतील पात्रं मराठीच वेशभूषेत दाखवली आहेत!(चित्र पाहा) #कृष्ण #गोकुळाष्टमी #गोपाळकाला #दहीहंडी
थोर केरळी चित्रकार राजा रवी वर्मा ह्यांची तर कृष्ण राधा सगळीच कल्पनाच #मराठी होती, मागच्या ट्विटमध्ये यशोदा कृष्ण होते, इथं कृष्णाची राधा आणि राधा - कृष्णाची पहिली भेट आहे चित्रं पाहू शकता! #कृष्ण #गोकुळाष्टमी #गोपाळकाला #दहीहंडी
#मराठी खाद्यसंस्कृतीत कृष्णाच्या प्रसादाच्या रूपात सुंठवडा करतात,सुदामाच्या पोह्याचा रुपात गोपाळकाला करतात,त्यातूनच दहीहंडी ही परंपरा आलेली आहे! मुंबईचा अस्सल मराठी सण!
वारकरी पंथात ह्या काल्याला महत्त्व आहे,ते एक अध्यात्मिक ज्ञानाचं प्रतीक आहे. #गोकुळाष्टमी #गोपाळकाला #दहीहंडी
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
