लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
Aug 24, 2019 • 8 tweets • 9 min read
उत्तरेत जे काही कृष्ण साहित्य आहे ते मध्ययुगीन ब्रज/अवधी भाषेत आहे, महाराष्ट्रात त्याआधीच कृष्णावर लिहीलेलं आहे.
मराठीत सगळ्यात जुनं ज्ञात साहित्य हेच महानुभाव साहित्य आहे.ते कृष्णाला सर्वोच्च ठिकाणी मानतात. #मराठी#कृष्ण अनुबंध मोठा आहे! #कृष्ण#गोकुळाष्टमी#गोपाळकाला#दहीहंडी
अर्थात् ह्या जुन्या साहित्यात राधा कृष्ण वगैरे प्रकरण नव्हतं, ओडिशातील जयदेवाच्या गीत गोविंदानंतर आलं.
मराठीत त्यावरही विपुल लिखाण झालं, एकनाथांच्या गौळणी त्यानंतर आलेली कित्येक गवळणी, लोकगीतं ह्यांनी कृष्णाच्या शृंगार लीलांवर मोठा भर दिला! #गोकुळाष्टमी#गोपाळकाला