नुकताच आपल्याकडे महाराष्ट्रात पारंपरिक वटपौर्णिमेच्या सण झाला.नेहमीप्रमाणे सौभाग्यवती स्त्रियांनी वडाच्या झाडाला दोरे देखील गुंढाळले.मला प्रश्न पडलाय,कधी थांबणार हे? एखाद्या माणसाला करकचून बांधून ठेवल तर त्याचा पण जीव जाईल हो, फरक फक्त हाच की ते झाड आहे पण त्याला देखील जीव आहे.
ना, आहे ना? सध्या अमेझॉन, उत्तराखंड इथल्या जंगल जळण्याच्या घटना पाहिल्या, रादर अजूनही पाहतोय, मोठ्या मोठ्या गप्पा ऐकतो आपण काय तर झाडे वाचवा, झाडे जगवा. हे फक्त बोलण्यापूर्तच का? लक्षात घ्या आणि सर्वांना माहीत आहे की एक व्यक्तीला श्वास पुरवण्यासाठी ७- ८ झाडं लागतात. पण आहेत का
भूतलावर एवढी झाडे. खरतर कृत्रिम प्राणवायू विकत घ्यायला एक दिवसासाठी ७०००- ८००० रुपये मोजावे लागतात. पण तोच प्राणवायू झाडे आपल्याला विनामूल्य देतात. पण आपण काय करतो त्या निरागस झाडांना दोरे गुंडळतो, खिळे ठोकतो, तारा, वायर यांनी करकचून बांधून ठेवतो. त्यांना पण त्रास होतो रे.
त्यांचं दुर्दैव की त्यांना बोलून दाखवता येत नाही. आणि ह्याचं त्रास त्यांना जितका होतो ना त्याच्या दुप्पट निसर्गाला आणि पर्यायाने आपल्याला होतो तो कसा हे नक्कीच ९०% लोकांना माहीत नसेल, खरंतर झाडांना खिळे ठोकले, दोरे गुंडाळले, तारा गुंडाळल्या की त्यांचे विघटन झाडामध्ये होत असते.
जे आपल्याला दिसत नाही, आणि हे विघटन अर्धवट होते. तारा, खिळे ह्यांना गंज लागतो तो गंज पर्यायाने झाडाला लागतो, दोऱ्यांच ही तसच त्यांचं विघटन व्हायला बराच काळ लागतो आणि पावसाळ्यात हे दोरे झाडाला आवळून बसतात त्यामुळे झाडातील ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड ह्यावर परिणाम होतो आणि हळूहळू
झाडाची जीव रस निर्माण करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे झाडाचे आयुर्मान देखील कमी होते. आणि झाडांची संख्या कमी झाल्यावर माणूस दोन्ही हाताने बोंब मारायला मोकळाच असतो. पण त्यासाठी आधी तोच जबाबदार असतो हे का लक्षात येत नाही. असो मला वाटत मला चांगला श्वास मिळवा आणि झाडाप्रती
कृतज्ञता म्हणून मी दरवर्षी हा उपक्रम करणार. आणि मी तुम्हाला ही आवाहन करेन की तुम्ही देखील आपल्या जवळच्या परिसरात वडाचे दोरे गुंडाळलेले झाड आढळ्यास तत्काळ त्याचे दोरे काढा व मुक्त करा. ह्यामध्ये देखील आपलाच स्वार्थ आहे, आपल्याला जास्त ऑक्सजनचा पुरवठा होईल. निदान हा विचार करूनतरी
दोरे सोडा. बाकी २०२० मधील निसर्गाचा कहर तर ह्याची देही ह्याची डोळा पाहतोच आहोत. त्यामुळे जागे व्हा आणि सकारात्मकतेने निसर्गाकडे बघा. खालील फोटो कोथरुड मधील आहे. तसेच ह्या उपक्रमात आरती रासकर ह्यांचा समावेश होता.
वडाचे झाड हे २४ तास ऑक्सिजन पुरवते. (अपेक्षित आहे हे माहीत असेल.) त्याचे आयुष्य ३५०+ च्या अधिक असते. पण ह्या दोरे गुंडाळण्यामुळे ते कमी होत चालले आहे.
©शा.न. श्वेतश्री.
#खिळेमुक्तझाडं #अंघोळीचीगोळी
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
