कोण म्हणतं, खिळ्याने फक्त चायनाचे #ChinaArmy सैनिकच जीव घेतात ?
शहरातली झाडं पहिली तर कळेल की खिळ्यांनी फक्त माणसंच नाही तर झाडंसुद्धा तीळ तीळ मारायची कला आपल्याच काही माणसांना अवगत आहे.हो ,आपल्याच माणसांना.
'हिंदी-चिनी भाई-भाई' यावर आजही आमचा ठाम विश्वास आहे.
माणूस वाईट नसतोच पण त्या माणसाचे काही दुर्गुण वाईट असतात.आपल्याला माणूस नाही तर त्यांच्यातला दुर्गुण संपवायचा आहे.
हो,२० सैनिक शाहिद झाले,वाईट झाले.सलाम सर्वांना.त्या सैनिकांनी आपल्या भारताची रक्षा केली होती. भारताची म्हणजे डोंगर,नदी,नाले,झाडे,माणसं,प्राणी,बिल्डिंगा,शेतं हे सगळे
...बरोबर ना ?
पण मग त्या सैनिकांकडूनच का अपेक्षा ठेवायची सगळ्या भारताची रक्षा करण्याची ?
आपण नाही का रक्षा करू शकत ? निदान आपल्या आजुबाजुंच्या झाडांची !
खिळे मारणे काय आणि खिळ्यांनी मारणे काय,दोन्हीही सारखेच.
चिनी सैनिकांबद्दल आमच्याही मनात राग आहे.
@PMOIndia @CMOMaharashtra
त्यावर सरकार योग्य ती कारवाई करेल.
पण, जे झाडांवर खिळे मारतात त्यांना आमची कळकळीची विनंती आहे, कृपया असे (चिनी सैनिक खिळे कृत्य) करू नका, तुम्ही खूप चांगले आहात आणि झाडेही चांगली आहेत.
आजपर्यंत #अंघोळीचीगोळी टीम आणि सर्व सहकारी संस्थांनी मिळून १ लाख खिळे काढले, थांबलो नाही आणि
थांबणारसुद्धा नाही जोपर्यंत खिळ्यांचे असे भ्याड हल्ले थांबणार नाहीत.हा दुर्गुण घालवण्यासाठी प्रत्येकाने शस्त्र उचलले पाहिजे. खिळेपकड्या हे आमचे शस्त्र आहे आणि त्याने आम्ही हवामानठोसा (अहिंसक) देणारच.
सैनिक भारताची सुरक्षा करतील,आपण निदान आपल्याला रोज दिसणाऱ्या झाडांची काळजी घेवू
झाडांना आदर म्हणजेच सैनिकांना आदर.आमच्यासाठी झाडं म्हणजेच भारत.चला भारताची काळजी घेउ.काळजी ,त्या आईप्रमाणे जी आपल्या तुळशीला एक दिवसही विसरत नाही.ती आईसुद्धा एक सैनिकच असते.असते ना ?
#खिळेमुक्तझाडं , एक #हवामानठोसा (अहिंसक)
@AUThackeray @MahaForest @mataonline @ThePuneMirror
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.