#Thread - Agrima Joshua नावाचा Virus (@Agrimonious)
Stand Up Comedy करून पोट भरणं हे काही नवीन नाही. अगदी IT कंपनी मधला जॉब सोडून "Stand Up" नावाच्या "छंदाला" जोपासणारे खूप लोकं आता या "धंद्याला" लागलेत, हरकत नाही. आज या विषयावर राजकारण करण्याची मुळीच इच्छा नाही आणि ते चुकून
सुद्धा माझ्या कडून होणार नाही याची मला खात्री आहे. जिथे विषय हा अस्मितेचा येतो तिथे राजकारण शुन्य टक्के उरतं. आपण ज्या राज्यात राहतो, ज्या प्रांतात वावरतो, जी भाषा वापरतो, ज्या धर्मात नावारूपास येतो, ज्या समाजात "कॉलर" ताठ करून मान, सन्मान मिळवण्यासाठी धडपडत असतो त्याचा
"पुसटसा अभिमान" बाळगला तर हरकत नसते आणि तो असावाच या मताचा मी आहे. आता माझ्या एकट्या पुरता "अभिमान" हा शब्द वापरणं उचित ठरेल, पण याच रूपांतर जेव्हा एका समूहात होतं तर त्याच "अभिमानाला" "अस्मिता" असं म्हटलं जातं. आपला अभिमान जिथे दुखावला जातो त्याच वेळेस आपल्या अस्मितेला सुद्धा
धक्का पोहचतो. हे एवढं सगळं विस्तृत स्वरूपात सांगण्याचं "दुर्दैवी औचित्य" म्हणजे ३-४ दिवसांपूर्वी प्रसिद्धी झोतात आलेला Agrima Joshua नावाच्या Stand Up Comedianचा व्हिडीओ. Freedom of Speech या मूलभूत अधिकाराचा बट्ट्याबोळ करत मूर्खांसारखा वापर कसा करावा याची शिकवणी सर्व
"Leftists and Communist" लोकांनी या पोरीकडून घेतली तर ते त्या कौशल्यात अधिक निपुण होतील यात शंका नाही. थोडक्यात सांगतो, या पोरीने नुकताच Youtube वर एक व्हिडिओ Upload केलाय ज्यात
१) छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला.
यांचा Sarcasm आपल्याला समजू नये एवढे आपण दुधखुळे
नक्कीच नाही. पैसे कमवण्यासाठी मुंबई गाठायची, महाराष्ट्रात राहायचं आणि महापुरुषांचा अपमान करायचा म्हणजे यांना कॉमेडी केल्याचा "फील" येतो. या असल्या फालतू कॉमेडीच्या नावाखाली आपल्या विकृत मनस्थितीचं "प्रदर्शन" भरवण्यात हे माहीर झालेत.
२) आता विषय असा की तिथे बसणाऱ्या लोकांवर
टीका करून फायदा नाही, चालू कार्यक्रमात आपण अशा "Flow" मध्ये असतो की आपल्याला अशा वेळेस उमजत नाही.
३) महाराजांचं स्मारक होईल तेव्हा होईल तो विषय नाहीये, पण स्मारकावरून सुद्धा मजा घ्यावी असं कोणत्या विनोदबुद्धीला सुचत असावं,तर Agrima सारख्या विकृत बुद्धीला ते सुचतं, असे अनेक आहे.
४) राजकीय विरोधापोटी आपण महापुरुषांविषयी काय बोलतोय याच तारतम्य यांना नाहीये आणि चाललेत कॉमेडी करायला. खरी कॉमेडी तर नंतर होते जेव्हा प्रतिक्रिया येण्यास सुरुवात होते.
५) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या यश रानडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जेव्हा कार्यक्रम झालेल्या ठिकाणी जाऊन
त्यांच्या पद्धतीत उत्तर दिलं ते एका राजकीय पक्षाला धरून नव्हतं तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेकडून होतं. आणि याच पद्धतीत उत्तरं दिले गेले तर ही @Agrimonious सारखी विकृत मानसिकता तिथल्या तिथे ठेचली जाईल, आणि ते योग्यच आहे.
जे काही झालं ते अतिशय योग्य रित्या केलं गेलं एक अपवाद म्हणजे @Agrimonious ने महाराष्ट्राच्या जनतेला त्रास दिलाच, पण कार्यक्रम स्थळाची सुद्धा नासधूस झाली हा त्या मालकांना सुद्धा मानसिक त्रास तो पण हीच्यामुळे. या नंतर तिने ट्विट केलं.
माफी मागायलाच हवी. छत्रपती आधी सुध्दा दैवत होते, आता सुद्धा आहेत आणि अखेरच्या श्वासापर्यंत राहतील त्यामुळे असल्या फालतू लोकांना त्यांची लायकी दाखवून द्यायलाच हवी.
Agrima Joshua Stand Up Comedian का झाली हे तिने दिलेल्या माफीनाम्यावरून दिसतं.यांना मराठीचा काही गंध नसावा हे अपेक्षित आहेच. पण यांची English सुद्धा बघूया.
1) Apalogize - Apologize
2) Mah - My
3) Regert - Regret
4) Riligion - Religion
5) Disrispect -Disrespect
असल्या लोकांकडून हे असं वागणं अपेक्षित आहेच यात आता तरी मुळीच शंका राहिली नाही. पण माफी मागून आपली चूक लक्षात घेण्या एवढं डोकं हिच्या कडे कसं असू शकतं? हा प्रश्न केव्हापासून सतावतोय.
RSS आणि भाजप समर्थकांच्या भाषेवरून जेव्हा Agrima संतापते तेव्हा खूप आश्चर्य वाटत तिचं. कारण Agrimaची भाषा आणि विचार आपण या गोंधळात विसरून जातो.
ही स्त्री नसावी असे अभद्र विचार माझ्या डोक्यात सुरू असताना हिचे ट्विट्स नकळत मला त्याची शाश्वती देऊन जातात की ही स्त्री मुळीच नाही, कारण भारतीय नारीचे संस्कार असे असू शकत नाहीत.
हिच्या कडून संघ आणि भाजप विरोधी ट्विट नक्कीच अपेक्षित असावे कारण जिथे नीतिमत्ता आणि संस्कार नसलेल्या लोकांना ते शिकवण्याचा प्रयत्न केला जातो तिथे हे लोकं याला विरोध करू लागतात.
याच बरोबर @SouravGhosh87 हे महाशय सुद्धा ३ वर्षांपूर्वी महाराजांविषयी बरळून गेलेत. हा सगळा प्रकार पाहून एकच विनंती करावीशी वाटते की आपण सदैव जागृत राहून यांना वेळीच धडा शिकवणं गरजेचं आहे. आपण गाफील राहता कामा नये. आणि यात सर्वांनी जात,धर्म,पंथ सोडून जर एकजूट दाखवली
तर आणि तरच आपण ही लढाई जिंकू.
छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, अशा विकृत मानसिकतेला वेळीच आळा घालण्यासाठी सर्व मावळ्यांना बळ देवो अशी आई भवानी चरणी प्रार्थना.
#जगदंब
#छत्रपती
#AgrimaJoshuaPyschologicalDisorder
@malhar_pandey @MatruBhakt @TheRSS_Piyussh @SGhodgerikar @meerawords @Deshpandemn @khadaksingh_ @RaviManik555 @Rushya_ @KaduAmol @ChinmayVijayVa1 @Vedashree_19 @gajanan137 @sengaonkarss @ShriramP31 @The_BSiddhesh @JayuBari333 @Siddhi_Hindu879 @DixitRutuja @The_Lion_RS
@AadiShakti1010 @yuga_v108 @sanjay_railkar @DwarkanathKulk9 @ShekharGokhale @PadmakarTillu @Saffronkoffee @nilesh_4_11 @KasarPatil96
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
