😂😂😂 मला तर खूप चिंता वाटू लागली राव आपल्या वर्ल्ड बेस्ट सीएम ठाकरे यांची. असं कुठं असतं का राव.. मोठा भाईंचा धिक्कार असो.आमचे सरकार हे भक्कम सरकार आहे आणि ते आम्ही पाच वर्षे चालवणार आहोत.असेल तुमच्याकडे एक चाणक्य पण आमच्याकडे पण दोन चाण्यक्य आहेत,राऊत आणि लवासा धिपती पवार..
तेंव्हा तुम्ही आमचे सरकार पाडायचा चुकूनही प्रयत्न करू नये.आम्हाला पवार साहेबांनी कानात सांगीतले आहे की हे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार आहे.महत्वाचे म्हणजे तुम्हाला माहीतच आहे आमचे पवार साहेब त्यांच्या शब्दावर किती ठाम असतात एकवेळ पाठीत खंजीर खुपसतील पण शब्द मोडणार नाहीत.
पण कसे आहे त्या अमित शहा म्हणजेच मोठा भाई वर आमचा विश्वास नाही. त्या माणसाची नजर आमच्या सरकार वर पडणार आहे त्यामुळे राज्यातील नेत्यांच्या छातीत धडकी भरली आहे.आधीच हॉस्पिटल मध्ये बेडची संख्या कमी आहे.तुम्ही तर नवीन आलेलं राफेल विमान उडवण्यासाठी नवीन पायलट शोधला आहे.#सचिन पायलट
तिकडे यूपी मध्ये गाडीचे ड्रायव्हर गाडी पलटी करतात आणि आता राजस्थान सरकारच्याच पायलट ने त्यांचे विमान हायजॅक केलं आहे.काय चालू आहे मोदीजी हे चुकीचे आहे.ही लोकशाहीची हत्या चालवली आहे तुम्ही.आम्ही याचा निषेद करतो.तुमची हुकुमशाही या देशावर चालू देणार नाही हे लक्षात ठेवा.
बघा मोदीजी बघा तुमची भक्त मंडळी असे मेम्स तयार करून आम्हाला भीती दाखवत आहेत.#डर का माहोल हैं!. आम्ही तिघेजण एकत्र आलो म्हणून काय झालं?आम्ही लोकशाही चे रक्षण करण्यासाठी एकत्र आलो आहोत.आम्ही जे केलं त्याने लोकशाहीचे रक्षण होत आहे पण तुम्ही जे करत आहात ते चुकीचं आहे.. आपलाच लाचार..
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.