Dr. Nishigandha Profile picture
निशिगंधा Dentist मनातलं वादळ शब्दांतून मांडायचा प्रयत्न views are personal #व्यथांच्याकथा (संचित माझ्या मनातलं सारं व्यथांच्या कथेतून सांगायचं)

Jul 15, 2020, 5 tweets

काश्मिरी चहाची पाने, साखर, गुलाबपाकळ्या,बदाम, दालचिनी, वेलदोडे यांचा काश्मिरी काहवा चहा, पाणी, पिस्ता, बदाम, गुलाबपाकळ्या,सोडा,मीठ, चहाची पाने,दूध घालून केलेला काश्मिरी नन/ पिंक चहा साच्यात बसवलेल्या चहाला वेगळा अर्थ देतात.
तुम्हाला असे भन्नाट चहा माहित आहे?
#चहाप्रेमी
#मराठी

इराणी चहा/ हैदराबादी दम चहा -
हंडीमध्ये पाणी चहा पावडर साखर टाकून त्याला कणीक लावून बंद करतात. ४५ मिनीटे तो उकळतात. दुसऱ्या भांड्यात दूध,मावा आणि विलायची घालून दूध आटवतात.४५ मिनीटांनी कपात कोरा चहा आटवलेलं दूध यांचे थर दिले जातात. दम बिर्याणी प्रमाणेच दमदार चहा.
#चहाप्रेमी
#मराठी

चद्दरवाली चाय( हैदराबाद)
चद्दरवाली चाय' हा हैदराबादचा चहा.अर्धा पेला चहा आणि वर अर्धा पेला भरून साय(सायीची चादर म्हणून चद्दरवाली चाय).
Credits- @swapnp 😊😊

Butter tea/ गुर गुर चहा-
हा चहा लेह लडाख, तिबेटियन भागात प्रसिद्ध आहे. एका प्रकारचा बांबूच्या पाईपवजा यंत्रामध्ये चहापत्ती, उकळलेले पाणी, मीठ,दूध आणि बटर टाकून मिक्स करतात. मिक्स झाल्यानंतर एका भांड्यात ओतून पुन्हा उकळतात. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त चहा.
#चहाप्रेमी
#मराठी

राजस्थानी राजावाडी चाय-
साखरेचा मंद आचेवर पाक/ चाचणी केली जाते. त्यात हळूहळू दूध टाकून ते दूध उकळतात. दुसऱ्या भांड्यात चहापत्ती, आलं टाकून उकळी आणली जाते. त्यात हे चाचणीमिश्रीत दूध टाकून उकळले जाते.
#चहाप्रेमी
#मराठी

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling