Saurabh Profile picture
some heroes may ever remain unsung but will never be forgotten..🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳

Jul 23, 2020, 6 tweets

आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती.

त्या निमित्त लो. टिळकांनी त्यांच्या आयुष्यात केलेल्या महत्त्वपूर्ण गोष्टींचा थोडक्यात आढावा घेऊया.

1. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. अशी लोकप्रिय घोषणा करून पूर्ण स्वराज्याची मागणी करणारे एक जहाल व्यक्तिमत्त्व.

2. आपापसातील मतभेद आणि क्लेश विसरून सर्वांना एकत्र आणून शिवजयंती अणि गणेशोत्सव यांसारखे सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करून लोकांमधे एकात्मतेची भावना निर्माण केली.

3. केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू करून लोकांमधे इंग्रजांविरुद्ध क्रांतीची ठिणगी निर्माण केली.

4. बंगालच्या फाळणीला त्यांनी कडाडून विरोध केला त्या साठी त्यांनी 'होमरूल लीग ' ही स्वतंत्र शक्तिमान संघटना निर्माण केली.

5. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य हा महान ग्रंथ लिहिला. आपल्याला पवित्र्य अशा भगवत गीतेचा अनुवाद करणारे टिळक हे पाचवे महापुरुष होते.

6. कितीही संकटे आली अगदी आभाळ जरी कोसळले तरी त्याच्यावर पाय ठेवून उभा राहील.

अशा प्रकारे न डगमगता स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपले सर्वस्व बहाल करणार्‍या या महापुरुषास मानाचा मुजरा

#लोकमान्य #लोकमान्य_टिळक 🙏🙏🙏

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling