💊 #BathPill 💊- Skip a Bath अंघोळीची गोळी Profile picture
Taking a #BathPill means skipping a bath intentionally.This saves natural resources & thus🌍.💊is a common #ClimateAction for 8 bn people. We do #NailFreeTree

Jul 23, 2020, 23 tweets

शिवाजी महाराज आणि पाणी व्यवस्थापन
गेले अनेक दिवस पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात पाऊस पडला नाही. लोकांना #अंघोळीचीगोळी घ्यावी लागते का काय शी भीती आहे.पण शिवाजी महाराजांनी त्या काळात पाण्याचे व्यवस्थापन व्यवस्तिथ पार पडले.आपण कधी महाराजांचा विचार आत्मसात करणार ?
सह्याद्रीच्या शिखर

माथ्यावर अनेक गड-किल्ले आहेत. त्यातील काही शिलाहार, यादवकालीन तर काही शिवकालीन गड-कोट आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य या गड-किल्ल्यांच्याच आश्रयाने उभे राहिले होते, त्यामुळे गडावर त्यांचे विशेष प्रेम. डोंगरमाथ्यावरील या किल्ल्यांवर प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्याला असे.

आज्ञापत्रातील दुर्गप्रकरणामधील गडाची राखण या विषयासंबंधी लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, 'तसेच गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा, पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी, टाकी पर्जन्यकाळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावी. गडावरी

झराही आहे. जसे तसे पाणीही पुरते म्हणून तितक्यावरीच निश्चिंती न मानावी, उद्योग करावा, की निमित्त की झुंजामध्ये भांडियाचे आवाजाखाली झरे स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो, तेव्हा संकट पडते. याकरिता तसे जागी जखिरियाचे पाणी म्हणून दोनचार टाकी तळी बांधावी. त्यातील पाणी खर्च

होऊ न द्यावे, गडाचे पाणी बहुत जतन राखावे.' गड व पाण्याच्या देखभालीसाठी त्यांनी म्हटले की लोहार, सुतार, पाथरवट यांना गड पाहून एक एक दोन दोन असाम्या करून ठेवाव्या. लहान-सहान गडांवर यांचे नित्यकाम पडते असे नाही. याकरिता त्यांचे कामाची हत्यारे त्यांजवळी तयार असो द्यावी.

गडावरील शिबंदीला वर्षभर पाणी कसे पुरेल याचे नियोजन त्यांनी दूरदृष्टीने करून ठेवले होते.
साभार - सदाशिव टेटविलकर.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी रायगड येथील जल व्यवस्थापन तर खास अभ्यासण्याजोगी आहे. रायगडावरील लेणी व डोंगराच्या पोटात खोदलेली खांब टाकी पाहिल्यावर लक्षात येते की रायगड हा प्राचीन गड असून त्याला किमान दीड हजार वर्षांचा इतिहास लाभला आहे. शिलाहार राजांपासून

शिवाजी महाराजांपर्यंत अनेक राजवटी रायगडावर नांदल्या आहेत. जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचा पाडाव केल्यावर रायगड स्वराज्यात दाखल झाला. शिवाजी महाराज जातीने रायगडावर आले. सरळसोट भिंतीसारखे चहूबाजूने तुटलेले उभे कडे, दीड गाव उंच आणि वर चौरंगासारखा दीड मैल लांब आणि १ मैल रुंद सपाट माथा

पाहिल्यावर 'तख्तास हाच जागा करावा' असे त्यांच्या मनात आले आणि स्वराज्याची राजधानी रायगड सजू लागला.

राजधानी रायगडावर मुबलक पाणीसाठा आहे. गंगासागर तलाव, कोळीम तलाव, कुशावर्त तलाव, हत्ती तलाव, काळा तलाव आणि निकामी झालेले तीन तलाव धरून एकूण आठ तलाव रायगडावर आहेत. त्यातील गंगासागर

तलाव हा सर्वात मोठा असून राजवाड्यासमोरच तो बांधण्यात आला आहे. महादरवाजा, तटबंदी, बुरूज, राजवाडा, जगदीश्वर मंदिर आणि सेवकांची जवळजवळ तीनशे इमारती रायगडावर बांधण्यात आल्या. त्यासाठी लागणारा दगड गंगासागर व इतर तलावांतील दगड खाणीतून काढलेला आहे. राज्यभिषेकावेळी सप्तनद्यांचे पाणी

गंगासागर तलावात टाकले आहे. या तलावांखेरीज पाऊणशे पाण्याची टाकी आहेत ती गडमाथ्यावर, गुंफेत व कड्याच्या पोटात राजवाड्यापासून भवानी टोकापर्यंत आणि वाघ दरवाज्यापासून टकमक टोकापर्यंत निरनिराळ्या ठिकाणी त्या खोदलेल्या आहेत. रायगडावरील दहा हजाराच्या शिबंदीला पुरून उरेल एवढा प्रचंड

पाण्याचा साठा रायगडावर होता. शिवराज्यभिषेकाला रायगडावर एक लाख असामी आले होते. हे तत्कालीन कागदपत्रे व इंग्रज, पोर्तुगीज यांनी लिहून ठेवले आहे. या समारंभातील सर्व लोकांची पिण्याच्या पाण्याची तहान गडावरील या पाणवठ्यांनी भागवली होती. रायगडावर सर्वांना मुबलक पाणी पुरेल एवढ्या

पाण्याचे नियोजन कसे करण्यात आले, त्याचा पुरावा रायगडावरच पाहायला मिळतो. शिवाजी महाराजांनी रायगडावर सर्वप्रथम दगडात बनवलेले पर्जन्यमापक यंत्र कुशावर्त तलावाजवळ मंदिराच्या मागे बांधून घेतले. कौटिल्याने दोनहजार चारशे वर्षांपूर्वी पर्जन्यमापकाचा उपयोग शेती आणि धरणे बांधण्यासाठी केला

होता. रायगडावरील दगडात बनवलेले हे पर्जन्यमापक त्याची सुधारित आवृत्ती म्हणजे आधुनिकच म्हटले पाहिजे. वर्षाला सरासरी किती पाऊस पडतो हे पर्जन्यमापकामुळे समजत असल्यामुळे रायगडावरील शिबंदीसाठी किती तळी खोदावी लागतील, त्यासाठी त्यांची लांबी-रुंदी व खोली किती ठेवायची म्हणजे त्यात

साठलेले पाणी पुढील पर्जन्यकाळापर्यंत पुरेल याचा शिवाजी महाराजांच्या स्थापत्यविशारदाने अंदाज घेऊन गडावरील विद्यमान तलाव बांधण्यात आले आहेत.

पाऊस योग्य वेळी व योग्य तेवढाच पडला तर धान्य भरपूर पिकते आणि गवत चाऱ्याचेही चांगले पोषण होते. शेती हा भारतातील महत्त्वाचा व्यवसाय, त्यासाठी

राज्याचा कोष हा मुख्यत्वे शेती उत्पन्नावर आधारित असल्यामुळे शेतीच्या पीकपाण्याचे नियोजन करण्यासाठी त्या काळात हे अतिशय सुंदर असे दगडी पर्जन्यमापक रायगडावर बसविण्यात आले. हे पर्जन्यमापक आहे हे रायगड पाहण्यासाठी आलेले पर्यटक, इतिहासाचे अभ्यासक दुर्गप्रेमी मंडळींना माहीत नव्हते.

रायगड अभ्यासक व संशोधक श्री. गोपाळ चांदोरकर (अर्किटेक्ट) यांच्या प्रथम ते दृष्टीस पडले. त्यांनी आपल्या 'वैभव रायगडचे' या पुस्तकात या पर्जन्यमापकाचे मोजमाप व कार्यप्रणाली नकाशासह उलगडून दाखविले आहे. बाजूचे छायाचित्र त्या दगडी पर्जन्यमापकाचे आहे. कुशावर्त तलावाच्या काठी एक शिवमंदिर

आहे. त्याच्या उत्तरेकडील एका खोलगट भागात हे दगडी पर्जन्यमापक आहे. रायगडावर आठ तलाव होते. त्यापैकी गंगासागर आणि कोळीम तलावाचेच पाणी सध्या रायगडावर वापरण्यात येते. रायगडावर रोज येणाऱ्या-जाणाऱ्या पर्यटकांची संख्या हजारोंच्यावर आहे आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, हे पाहता

साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाण्याचे नियोजन किती दूरदृष्टीने केले होते याची कल्पना येते.
शिवाजी महाराजांनी जिजाऊसाठी पाचाडला वाडा बांधला आहे. सभोवताली तटबंदी आहे. आत २००' x ४००' फूट लांबी-रुंदीचे वाड्याचे जोते आहे. घोडे बांधण्यासाठी त्यात लोखंडी गोल कडी आहेत

वाड्यात दोन विहिरी आहेत. विशेष म्हणजे एकीला खाली उतरण्यासाठी दगडी पायऱ्या असून वर दगडी बांधकाम आहे. त्यावर दगडीबैठक आहे. हिला 'तक्क्याची विहीर' म्हणतात. महाराजांनी जिजाऊंना बसण्यासाठी ती खास बनवून घेतली. एका मराठमोळ्या राजाची जीवन आणि जिव्हाळा जपणारी साधीसुधी मराठमोळी विहीर

अद्यापही जीवनरस उराशी घेऊन उभी आहे.

शिवाजी महाराजांनी आज्ञापत्रात म्हटले आहे की गडावर झऱ्याचे पाणी भरपूर आहे म्हणून त्यावर विसंबून न राहता एकदोन तळी अधिक बांधून राखीव ठेवावी. प्रसंगी ती कामास येतील हे लक्षात घेऊन व निसर्गचक्राचा रोख पाहून यापुढे पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे

किती गरजेचे आहे, हे अलीकडचे बदलते वातावरण पाहून आपल्या लक्षात आले असेल.
साभार - श्री. सदाशिव टेटवीलकर

@thethreaderapp please unroll

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling