बुध्द चरित्र आणी तत्वज्ञान या मध्ये ब्रह्म आणी त्याचे भवन ह्यांचे वारंवार उल्लेख येतात ..त्यावेळी अभ्यासक गोंधळात पडणे सहाजिक आहे ..पण त्याचे विश्लेषण केल्यास हाच गोंधळ नाहीसा होतो ..
बुध्द तत्वज्ञानामध्ये चार ब्रह्म विहार कल्पलेले आहेत ..
1)
मैत्री ,करुणा , मुदिता , उपेक्षा हे चार ब्रह्म विहार ( भवन ) आहेत ..
हे विहारे म्हणजे लोकभवने आहेत त्या त्या भावनेची प्राप्ती करणारे श्रमण या भवनात विहारात वास्तव्याला राहतात.ब्रह्म सहपती हा या भवनाचा स्वामी असतो अशी कल्पना केलेली आहे ..
2)
मैत्री , करुणा , मुदिता ,उपेक्षा या मानवी मुल्यांच्या सहजीवनातील भावना आहेत ..त्या भावनेची विहारे ही भौतिक नसून मानसिक आहेत ,,ही चार ब्रह्मलोक व त्यांचे प्रमुख ब्रह्म हे तथागतांच्याच मनातील द्वंद आहे ..
वैशाख पौर्णिमेला ज्ञान प्राप्ती झाल्या नंतर तथागतांच्या मनात विषाद
3)
योग उत्पन्न झाला ..
हे ज्ञान जनतेला सांगावे की सांगू नये ?
सांगितलेले ज्ञान लोकांना समजेल की समजणारच नाही ?
समजलेल्या ज्ञाना नुसार लोकांचे आचरण होईल की नाही ?
असे मंथन सूरु झाले ..
आपले हसे होईल त्यापेक्षा हे ज्ञान सांगूच नये ..आपणच ह्या निर्वाणाचा उपभोग घ्यावा
4)
असा विषाद योग उत्पन्न झाल्यामुळे ..करुणा ब्रह्म विहार प्रमुख ब्रह्म सहपती तथागतांना विनंती करतो ..की निर्वाणाचे ज्ञान सर्व जनतेला सांगावे ...
हा विषाद आणी ब्रह्म सहपतीची विनंती हे तथागतांच्या मनातील द्वंदाचेच रुपक होय ..
5)
ब्रह्म सहपती ही कोणी ऐतिहासिक व्यक्ती म्हणून बौध्द साहित्यात येत नाही ..
#महेन्द्र_शेगांवकर
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
