💊 #BathPill 💊- Skip a Bath अंघोळीची गोळी Profile picture
Taking a #BathPill means skipping a bath intentionally.This saves natural resources & thus🌍.💊is a common #ClimateAction for 8 bn people. We do #NailFreeTree

Aug 7, 2020, 8 tweets

🌳 झाडांच्या स्वातंत्र्याचा लढा उभारावा लागेल 🌳

भारतीय स्वातंत्र्याची ७३ वर्ष यावर्षी पुर्ण होत आहेत. ब्रिटिशांशी चाललेल्या या लढ्यात अनेकांनी आपले योगदान दिले आणि अखेर ब्रिटिश राजवट खालसा झाली पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण देशांचे नागरिक

म्हणुन आपल्या मुलभूत गरजांसाठी काम करण्यास सुरुवात केली. पंचवार्षिक योजना, हरित क्रांती, दुग्ध क्रांती, माहिती आणि तंत्रज्ञान, उद्योग व्यापार, डिजिटल क्रांती सर्वच क्षेत्रांत आपण दिवसेंदिवस एक पाऊल पुढे टाकत आहोत. दुर्गम भागात रस्ते, लाईट, पाणी पोहचवण्यासाठी आपण पुढाकार घेत आहोत

आपल्याला अत्यावश्यक वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करत आहोत. मात्र भारतीय स्वातंत्र्याची ७३ वर्ष उलटुन गेली तरी येथील झाडे अजुनही पारतंत्र्यात आहेत. हो नक्कीच आहेत कारण आपल्याकडे झाडांसाठी अनेक कायदे नमुद असले तरी हे कायदे मोडणाऱ्या एखाद्या व्यक्ती

किंवा तत्सम घटकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई प्रशासनाद्वारे होतांना दिसत नाही. झाडे स्वतंत्र नाहीत म्हणजे नेमकं काय असा प्रश्न नक्कीच पडला असेल हो ना? तर बघा आपल्याकडे सर्रास झाडांना पोस्टर, बॅनर जाहिरातीसाठी लावले जातात आता आपल्याकडे विरुपणास प्रतिबंध म्हणजेच

जाहिरात लावण्यासाठी झाडांचा वापर केला जावु नये असा कायदा आहे मात्र प्रशासन कोणावर कारवाई करत नाहीत किंवा त्यांवर जनजागृतीही नाही. दुसरं असं झाडांना मुळाशी १ मीटरचे आळे असावे असे राष्ट्रीय हरीत लवाद आपल्या निर्णयात सांगते मात्र आपण त्यांना सिमेंट काँक्रीट आणि डांबर लावतो इकडेही

कारवाई आणि जनजागृतीचा अभाव आहेच आणि सर्वात शेवटी झाडे स्वतंत्र नाही म्हणजे आपल्याकडे कोणीही येत पावसाळ्यात छाटणीच्या नावे सर्व झाडांची कत्तल करून जात विकासाच्या नावाखाली कित्येक झाडांचा बळी दिला जातो. वृक्षसंवर्धनाचे मोजके प्रयत्न आणि मोजक्या व्यक्ती आणि संस्था आज काम करत आहेत

आता आपल्याला एक नवा स्वातंत्र्य लढा उभारायचा आहे हा लढा झाडांना स्वतंत्र करण्यासाठी असणार आहे या लढ्यात प्रत्येकाला सहभाग घेता येणार आहे यांसाठी तुम्हांला आपल्या परिसरात असलेल्या झाडांना पोस्टर, बॅनरमुक्त करायचे आहे किंवा ज्या झाडांना आळे नाही त्यांना आळे करायचे आहे चला

तर मग कामाला लागु आपण या लढ्यात नक्की सहभागी व्हा आपले अनुभव नक्की आम्हांला सांगा आपण केलेल्या कामांचे फोटो देखील शेयर करा.
अविनाश पाटील.
#वृक्षसैनिक #हवामानठोसा #खिळेमुक्तझाडं #एककण #आळेयुक्तझाडे #लिफ्टशी_तह_केला_मी #डोंगराला_आग_लागली_पळा_पळा_पळा
🌳
#अंघोळीचीगोळी
८०८०१७१४३०

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling