कोझिकोड विमान दुर्घटना
कोविड-१९ या जागतिक महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. त्याचाच एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पंतप्रधानांनी भारतात लॉकडाऊन जाहीर केला. कोविड-१९चा वाढता प्रादुर्भाव पाहता इतर देशातील भारतीय नागरिकांना सुखरूप घरी आणण्यासाठी "वंदे भारत मिशन" ही योजना आखली गेली.
या मिशनमध्ये दुबई, फिलिपिन्स, अमेरिका, मलेशिया, बांग्लादेश, कुवैत, सौदी अरेबिया, सिंगापूर इत्यादी देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूप आणण्याची जबाबदारी Air India Limited या भारत सरकारच्या कंपनीकडे दिली गेली. या मिशन अंतर्गत आता पर्यंत ६लाख ८७हजार लोकं सुखरूप घरी परतले.
मिशन अंतर्गत ५व्या टप्प्यात दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून Air India Ltd चे AXB1344, बोइंग 737 विमानाने १९० लोकांना घेऊन उड्डाण केले.विमानात १८४ प्रवासी होते ज्यात १०लहान मुले,६ टीम मेंबर ज्यात २ पायलट यांचा समावेश होता विमानास कोझिकोड आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे लँड करायचे होते.
Table Top Runway ?
कोझिकोड विमानतळाची धावपट्टी ही "Table Top" म्हणून ओळखली जाते. Table Top म्हणजे धावपट्टीच्या दोन्ही किंवा एका बाजूस खोल दरी असून एखाद्या डोंगरावर किंवा पर्वतावर ही धावपट्टी असणे. या धावपट्टीवर विमानाचे "Safe Landing" म्हणजे पायलटने हातात घेतलेले शिवधनुष्य.
Flight Skidded Off
या दुर्घटनेत हा शब्द खूपदा ऐकायला मिळाला. Skidded Off म्हणजे जेव्हा विमान थांबवण्याच्या प्रयत्नात असताना ते घसरते व वेग वाढतो आणि दुर्घटनेची शक्यता असू शकते.
विमान Skidd का झाले ?
Safe Landing च्या थोड्या वेळापूर्वी "Landing Gears" म्हणजेच विमानाचे चाकं बाहेर काढण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होते. ते जेव्हा व्यवस्थित रित्या बाहेर येतात तेव्हा पायलटला एक मेसेज मिळतो, आणि त्या नंतर विमान Safe Land केले जाते.
विमानाचे Safe Landing का झाले नाही ?
विमान जेव्हा विमानतळाच्या जवळ होते तेव्हा विमानाचे पायलट साठे यांनी Landing Gears बाहेर काढण्यास सुरुवात केली परंतु काही तांत्रिक कारणास्तव ते बाहेर निघत नव्हते. या मुळे विमानाचे Safe Landing होण्यास अडचण येऊ शकते याचा अंदाज त्यांना आला.
पायलट साठे यांची हुशारी
Safe Landing होऊ शकत नाही याची शंका आल्यावर पायलट साठे यांनी विमानतळाच्या ३फेऱ्या विमानाद्वारे मारायचे ठरवले, जेणेकरून विमानातले इंधन संपेल आणि जेव्हा विमान Land होताना Crash होईल तेव्हा आग लागण्याचा धोका कमी होईल आणि जीवितहानी टाळली जाईल.
जेव्हा इंधन अगदीच थोडे उरले होते तेव्हा साठे यांनी विमान Land करायला सुरुवात केली. विमान Land होत असताना Crash झाले आणि Runway च्या पुढील भागात दरी असल्याने ते वेग सावरु शकले नाही आणि विमान ३५ फूट खोल दरीत जाऊन कोसळले आणि विमानाचे दोन तुकडे झाले.
विमानात बसलेल्या १९० लोकांपैकी पायलट साठे व सह पायलट अखिलेश कुमार हे जागीच मृत्युमुखी पडले. त्याच बरोबर घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या ही १८ असून जवळजवळ १३७ जण हे जखमी झाले असून त्यातील १४ हे गंभीर जखमी आहेत.
कॅप्टन दीपक वसंत साठे
दीपक यांना ३६ वर्षांचा विमान उड्डाणाचा प्रदीर्घ असा अनुभव होता. Air India Ltd मध्ये काम करण्या आधी दीपक हे भारतीय हवाई दलाच्या मिग २१ या विमानाचे २१ वर्ष वैमानिक म्हणून कार्यरत होते. इ.स.२००५ साली ते Air India Ltd मध्ये व्यावसायिक वैमानिक म्हणून रुजू झाले.
आपला जीव धोक्यात घालून मात्र इतर लोकांना वाचवण्यासाठी केलेले साठे आणि अखिलेश कुमार यांचे शिताफीचे प्रयत्न आपण कधीच विसरू शकत नाही. देशहितासाठी दुसऱ्यांचा जीव वाचवून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता साठे व अखिलेश कुमार यांचे बलिदान हे खरोखर प्रेरक असे आहे.
#भावपुर्ण_श्रद्धांजली
एक प्रसिद्ध इंग्रजी कविता या वेळेस आठवते.
If I die in war zone,
Box me up & send me home.
Put my medals on my chest,
Tell my mom I did the best.
Tell my dad not to bow,
He wont get tension from me now.
Tell my brother to study perfectly,
Keys of my bike will b his pefectly
विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. आपण सर्वच त्यांच्या दुःखात सहभागी आहोत.
🙏💐🌹
- मानस
#planecrash
#Kozhikode
#KozhikodeAirCrash
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
