#भयकथा पहिली
माझ्याबद्दल माझ्या आयुष्यात घडलेला 1 विलक्षण चकवा
1991 चा काळ होता.माझी नोकरी 3 शिफ्ट मध्ये असायची.
माझे रहाते घर ते कंपनी हे अंतर चालत 10 मिनिटांचे म्हणजे अदमासे 1 km जेमतेम
माझी आई मला कायम सांगायची की रात्री घरी येऊ नकोस.
तिथेच झोपून सकाळी उठून येत जा,कारण रात्री तिची झोपमोड होत असे.
मी संध्याकाळी 4 ते रात्री 12 अशी शिफ्ट असली की कायम कंपनीत झोपून सकाळी उठून घरी येत असे.
त्यावेळी माझी आई उठून सकाळी अंगणातील कचरा झाडत मला कायम दिसायची.
एकदा दुसऱ्या दिवशी माझी सुट्टी असल्याने बाहेर फिरायला जायचा
प्लॅन केला होता.रात्री जेवणाच्या सुट्टीत जेव्हा घरी आलो तेव्हा आईला म्हटले की उद्या सुट्टी आहे आणि मी सकाळी उठून मित्रांसोबत फिरायला जाणार आहे म्हणून मी रात्री घरी येईन.
आई मला ये असे बोलली पण का कोण जाणे मला काहीतरी वेगळेच वाटले.
मनातून विषय काढून टाकत मी कंपनीत आलो.
सगळे जण तिथे बसलो होतो आणि उद्याबद्दल चे प्लॅनिंग करून सगळं फिक्स केले.प्लॅनिंग करताना ही 1 मन सांगत होते की उद्याचा प्लॅन फुस्स होणारेय.
रात्रीचे 12 वाजत आले.माझा रिलिव्हर अगोदरच येऊन झोपलेला होता.
खोलीत जाऊन त्याला उठवले.
फ्रेश होऊन तो सव्वा 12 ला आला.
त्याला सगळ्या चालू
मशिन्स व ऑपरेशन ची कल्पना दिली त्यानेही सगळे चेक केले
तो ok बोलल्यावर मी अंदाजे साडे 12 वाजता निघालो.
पाऊण पर्यत घरी पोचायचे सकाळी लवकर उठून फ्रेश व्हायचे आणि साडे 6 वाजता निघायचे हा प्लॅन.
10 मिनिटात घरी आलो.
बघितले तर आई नुकतीच उठून झाडू घेऊन अंगणात आली होती.
मला बोलली अरे तू रात्री येणार होतास ना
तेव्हाच मी तुला येऊ नकोस आज अमावस्या आहे म्हणून येऊ नकोस असे सांगणार होते.
आंघोळीला चूल पेटवते मी तोपर्यंत हात पाय धुवून घे.
मी काय बोलणार.
माझ्या पायातले त्राण निघून गेले होते आणि हात पाय थरथर कापू लागले होते.
तरीही शांतपणे हो म्हटले,आणि
पाय धुवून घरात गेलो तर समोरच्या घड्याळात बघितले तर बरोबर सव्वा 6 वाजले होते.
काहीही न बोलता अंथरुणावर पडलो
आई येऊन बोलली काय झालं रे?
मी बोललो दमलोय मी थोडा झोपतो
आणि गाढ झोपी गेलो पण
दुपारी दीड च्या दरम्यान जाग आली.
आई बोलली तुझे मित्र आले होते. मी त्यांना बोलले की तुझी तब्येत बिघडलीय त्यामुळे आजची ट्रिप रद्द करायला तूच सांगितलेस. असे मी त्यांना बोलल्यावर थोडा वेळ थांबून ते निघून गेले.
माझे पाय प्रचंड दुखत होते.
आईला मी घडलेली घटना सांगितली.
त्यावर 1 चकार
अक्षर न बोलता आई बोलली की तु
"चकव्यात"गेलास.
आता काही भीती नाहीये, वेळ टळली.
1 माणूस एकटा असेल तर तो ताशी 6 km वेगाने चालतो
म्हणजे साडे 12 ते सकाळी 6 असे
साडे 5 तास सलग न थांबता वेगाने चालत होतो.
म्हणजे मी तब्बल 33 km अंतर चालून आलो होतो
नंतर कधीही रात्री आलो नाही.
इति
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
