Milind Gaikwad (मोदीजी का परिवार) Profile picture
स्वतंत्रतासमर मे 1857 को पहिली गोली और 1948 को आखरी गोली ये दोनो गोलिया चलानेवाले महापुरुष मुझे आदरणीय है। भारतमाता की जय, जय हिंद, वंदे मातरम

Aug 15, 2020, 19 tweets

#भयकथा दुसरी
सन 2008 माझी नोकरी आता सरकारी आहे
(आणि मी इथे राजकीय व्यक्तीना ही ट्रोल करतो म्हणून मी खाते कोणते हे सांगत नाही
कृपया समजून घ्या)
माझ्या कामाच्या ठिकाणापासून 40 km अंतरावर एक गाव आहे.
त्याठिकाणी आमची 1 गाडी जाऊन फसली होती.
यांत्रिक प्रॉब्लेम होताच

आणि पावसाळी दिवस असल्याने गाडी रुतत जाऊन क्रेन ला पर्याय उरला नव्हता.
म्हणून अगोदर क्रेन नेऊन ती गाडी तिथून बाहेर ओढून काढून नंतर यांत्रिक काम करून गाडी कार्यशाळेत आणण्याचा आदेश मिळाला होता.
त्यानुसार क्रेन बरोबर क्रेन वर काम करणारी नेहमीची माणसे व आम्ही असे तिथे गेलो
गाडीची

स्थिती बघितल्यावर
"हा काय!हातचा मळ, सहज काढू ओढून" अश्या वलग्ना आमच्या कडून झाल्याही
आता ओढून योग्य जागेवर घेतल्यावर काम करायचे होते.
सहजपणे काढू शकू ह्या आत्मविश्वासाने मग OC चे रूप केव्हा घेतले हेच समजले नाही.
क्रेन लावून पूर्ण ताकदीने गाडी ओढूनही ती गाडी 1 mm ही सरकत नव्हती.

2 तास गेले.
अश्याच एका प्रयत्नात क्रेन चा रोप तुटला व आडवा मागे येऊन क्रेन चे दोन्हीही हेडलाइट आतील बल्ब सकट चेंदामेंदा करून गेला.
नशिबाने दुसरा रोप होता.
तो रोप लावत असतानाच त्या गावात जाणारी शेवटची वस्तीची ST बस आली व आमच्या इथे थोडावेळ थांबली.प्रवासी गाडीतूनच बोलले

"निघताना कठीण" आणि माझ्या मनात शंकासुराने प्रवेश केला.
काहीतरी वेगळेच जाणवू लागले.
मी म्हटले की उद्या येऊ वगैरे वगैरे
पण बाकीचे जोडीदार ठाम होते
आणि रोप तुटल्यामुळे वैतागले होते आणि सहजपणे येऊ शकणार गाडी न आल्याने आजवर जितक्या गाड्या क्रेन ने ओढून काढलेल्या होत्या त्या मानाने

हे काम सहजी असूनही प्रॉब्लेम झाला होता म्हणून चिडले ही होते.
मी मनातल्या शंकेला शांत केले.
वेळ निघत चालली होती आणि तो ही रोप तुटला आणि धीर सुटला माझा तरीही शांतपणे बघत होतो.
गावातली ST गावात गेली आणि ह्या दरम्यान 1 ही गावकरी अथवा एखादी दुचाकी किंवा कसलेही वाहन तिथून गेलेले नव्हते

पोटात कावळे कोकलू लागले होते.
शेवटी जोडीदार बोलले शेवटचा प्रयत्न करू
नाही झालं तर उद्या करू
मला हायसे वाटले
मी प्रार्थना करू लागलो की परत रोप तुटून जाऊदे
दोन्ही रोप ना गाठी मारल्या गेल्या आणि आता जरी गाडी वरती आली तरी क्रेन हेडलाइट फुटल्याने परत जाऊ शकत नव्हती

गाडी ओढून झाल्यावर त्या गाडीतील बल्ब क्रेन ला लावून एक बाजू चालू करून जायचे ठरले होते.
आणि 1 दुचाकी आली
त्या दुचाकी वाल्याला एका जोडीदाराने विचारलं की गावात काय "मिळते काय?
तो हो बोलल्यावर हा त्याच्या मागे बसला ही
पण तो दुचाकी वाला बोलला तुम्हाला सोडायला मी येणार नाही

तरीही तलफ आल्याने हे बेणं स्वतःकडची बॅटरी घेऊन बसले पण
आणि आमची पण सोय करतो हे वचन दिल्याने सगळे गप्प
तो गेला
आणि गाडी एका झटक्यात रस्त्यावर आली आणि जीव भांड्यात पडला
कुणाच्याही पोटात अन्नाचा कण नव्हता
वाटेत निघताना संध्याकाळी खाल्लेले 2 वडापाव केव्हाच जिरून गेले होते

पाणी तर केव्हाच संपून गेले होते.
आमच्या यांत्रिक कामाला माझ्या अंदाजे जास्तीत जास्त 1 तास लागणार होता.
गाडी वर आल्यावर पहिला 1 बल्ब काढून क्रेन ला लावला
कामाचा अंदाज घेतला हत्यारे घेतली आणि कामाला जाणार तेवढ्यात खालून हाक आली आणि दूरवर बॅटरी दिसली
मी लगेच गाडीचा हेडलाइट चालू केला

रस्ता साफ दिसू लागला
आम्ही यांत्रिक दोघे व हे दोघेअसे मिळून 4 जण होतो.(मला आजपर्यंत कसलेही व्यसन नाही पण मी कोणालाही आडकाठी करत नाही)आणि दारू हे एक अमृत आहे आणि ते अमृतासारखे प्यायले तरच लाभ होतो अन्यथा नुकसानच होते
माझे तिन्ही जोडीदार काम संपल्यावर पिणारे होते
आणि आज तर बेक्कार

काम झाले होते. श्रमपरिहार तो बनता है
मग तो आला
त्याने दारू तसेच खायला चखना ही भरपूर आणला होता
महफील तिथेच रस्त्यावर बसली. मी खाण्यात जोर मारला आणि का कोण जाणे सगळे म्हणजे तिघेही फुल्ल टाइट झाले.
इतके टाइट झाले की बोलू लागले की ही दारू जबरदस्त आहे 1 क्वार्टर मारतो आम्ही पण

आज त्याहूनही कमी पिऊन चांगलीच लागलीय वगैरे वगैरे
ह्यात बराच वेळ गेला होता
खाणे पोटात गेल्याने कावळे ही शांत झाले होते.
आम्ही दोघांनी कामाला सुरुवात केली हे दोघेजण तिथेच रस्त्यावर आडवे झाले
माझ्या जोडीदाराला तोल सावरणे ही अशक्य होऊन बसले
तो बोलू लागला अरे मिलिंद जास्त नाही पिलोय

ह्यापेक्षा जास्त पितो मी पण आज विचित्र होतंय
मी बोललो माझ्या बाजूला बस काम झाल्यावर गाडी तुलाच चालवत घेऊन जायचंय
मी काय ते काम करतो
त्यानुसार मी काम करत होतो
तेवढ्यात त्याच्या पोटात ढवळू लागले आणि सगळं उलटून बाहेर पडलं
मी म्हटलं बर झालं आता ok होशील
त्याला गाडीत नेऊन बसवले

क्रेन वाल्याना हाक मारली तर ते दोघेही ठार (झोप)झालेले होते आणि हा माझा आता ठार होऊ लागला होता.
मला घड्याळात बघायची पण शुद्ध उरली नव्हती
त्या निर्जन निर्मनुष्य ठिकाणी मी आता 1 टाच उरलो होतो
ह्याला मग गाडीत झोपवले आणि दार बंद न करताच खाली उतरून गाडी खाली गेलो
आणि काम करू लागलो

थोड्या वेळाने जोडीदार खाली उतरला आणि गप्पा मारू लागला
आता त्याची पूर्ण उतरली होती उलटी केल्याने
गप्पा मारत काम लवकर संपले मी दुसऱ्या बाजूला गेलेला spanner घ्यायला गाडी खालूनच सरपटत जाऊन घेतला व ह्याला बोललो वर बस आणि गाडी चालू कर
मी पाने गाडीत ठेवतो आणि क्रेन वाल्यांना उठवतो

आणि मी गाडीच्या खालून बाहेर आलो सर्व हत्यारे गोळा पेटीत ठेवली आणि दरवाजा उघडाच होता पण वाऱ्याने कलला होता तो पूर्ण उघडला आणि आत गेलो
तर माझा यांत्रिक जोडीदार ठार झोपलेला होता आणि तोंडातून लाळ गळून खाली घेतलेल्या पुठ्ठयावर पडत होती

1 आणि 1च क्षणात मला सगळा प्रकार समजून आला

हातातील पेटी हातात ,बाहेरचा श्वास बाहेर आणि आतला आत
ही स्थिती त्यावेळेस झाली.
तरीही मनावर पूर्ण काबू मिळवत जाऊन स्टेअरिंग वर बसलो
मोठंमोठयाने सगळ्यांना हाका मारू लागलो
तेव्हा हा उठला
घडला प्रकार सांगितला त्यावेळी ह्याला लघवी लागली होती आता बाहेर जायचे ही धाडस उरले नव्हते

तरीही मनाचा हिय्या करत पूर्ण काबू मिळवत दोघेही खाली उतरलो व जाऊन त्यांना उठवले
माझ्या जोडीदाराने गाडी उठवली आणि गावात जाऊन रिव्हर्स मारून आम्ही परत निघालो

इति

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling