@Jollyboy Profile picture

Aug 15, 2020, 17 tweets

*थाळ्या वाजवू नका तर बिगुल फुका*

आचार्य अत्रे ---- (13 ऑगस्ट)
बंधू-भगिनींनो आज माझा जन्मदिवस आहे. दोन दिवसांनी १५ ऑगस्ट आहे. या वर्षी जानेवारीपासून सर्व जगाचे गणित बिघडून गेले आहे. गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही अशा व्हायरसने मानव जातीला विळखा घातला आहे. भारतात तर त्याची
1)

एवढी दहशत पसरली आहे की तो महारोग्यापेक्षा जास्त भयंकर रोग झाला आहे. कोणी नुसता खोकला किंवा शिंकला तरी लोक त्याच्याकडे संशयाने पहात आहेत.(हशा) यामुळे तोंड धुताना खाकरणेसुद्धा निषिद्ध झाले आहे.(हशा) या अगोदर भारताने व सार्‍या जगाने अनेक व्हायरस बघितले आणि पचविले आहेत
2)

.(टाळ्या) पण या व्हायरस बुवांचा थाट वेगळाच आहे.

जगात सगळीकडे संगीताचे, विश्वसुंदरी स्पर्धेचे, उदघाटनाचे, आणि टिमकी वाजवणाऱ्यांचे सोहळे रद्द झाले. पण यामुळे भाषण ठोकणाऱ्यांचे खूपच हाल झाले. त्यामुळे आपल्या वाचाळ नेत्यांनी घरीच राहून भाषणांचे धडे गिरवून घरच्यांचे डोके
3)

उठविले आहे असे ऐकतो.(हशा) कोरोनाच्या रोगराईने जनता भ्याली आहे. तिचे लक्ष ठिकाणावर नाही. आणि त्यातच पक्क्या राजकारण्यांनी त्यांचे मनसुबे पुरे केले. लोकांना त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न पडला आहे. कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा याचा प्रश्न आवासून उभा आहे आणि तशातच
4)

स्वार्थी राजकारण्यांना मंदिर बांधायचे सुचले आहे. म्हणजे "कोणाला कशाचं तर बोडकीला केसांचं"( हशा व टाळ्या) जनतेला विश्वासात घेणे दूर राहिले असून धर्माच्या नावावर पोळी भाजणे चालू आहे. अशा नाठाळांच्या माथी सोटाच हाणला पाहिजे.(प्रचंड टाळ्या)

गेल्या सहा महिन्यात जे सेवानिवृत्त
5)

झाले त्यांची तर मोठी परवड झाली आहे. ना निरोप समारंभ झाला, ना सेवानिवृत्तीची रक्कम प्राप्त झाली आहे. या काळात ना वारकरी दिंड्या दिसल्या ना दहीहंड्या फुटल्या.त्यातच वाढीव विजबिलांचा शॉक बसला आहे. त्यामुळे सगळेच जीवन कसे बेचव व नीरस वाटते आहे. या रोगराईमुळे सर्वजण नाका
6)

तोंडाला मास्क बांधून फिरत आहेत. त्यात देणेकऱ्यांचे चांगलेच फावले आहे. कारण तेच उजळमाथ्याने मास्क लावून फिरत आहेत.( हशा) ठग देखील खुशाल तोंडावर रुमाल बांधून दिवसाढवळ्या चोरी करू लागले आहेत. रशियाने म्हणे यावर लस शोधून काढली आहे. पण ती रशियन पुतीन यांची लस आहे. पुतना
7)

मावशी सारखी तिची हालत झाली नाही म्हणजे मिळवली.(हशा)

मुंबईच्या नाड्या असलेली लोकल निष्क्रिय झाली आहे आणि झोडपणारा पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे, असे चित्र यंदा दिसत आहे. तरीही मराठी बाणा असलेला माणूस चोहोबाजूंनी येत असलेली संकटे झेलून ताठ मानेने उभा आहे याचा मला निश्चितच
8)

अभिमान वाटतो कारण मी महाराष्ट्रीयन आहे याचा मला गर्व आहे.(टाळ्या) कऱ्हेचे पाणी प्यायलेला मी सासवडकर आहे. या देशाच्या स्वातंत्र्यसाठी कोणी त्याग केला असेल तर तो महाराष्ट्राने केला आहे.(टाळ्या) जेव्हा जेव्हा परकीय इंग्रजांनी, पोर्तुगीजांनी, मोगलांनी आक्रमण केले तेव्हा
9)

त्यांच्यापुढे छातीचा कोट करुन मराठी माणूस उभा राहिलेला आहे.(प्रचंड टाळ्या) गनिमीकावा करणारे अनेक धुरंधर या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे दिल्लीकरांना मराठी माणसाचे नेहमी टेन्शन वाटते. कारण मन की बात मधली विझलेली वात केवळ मराठी माणूसच ओळखू शकतो. सर्वांगसुंदर भारत घडविण्यात
10)

मराठी माणसांचे योगदान इतर राज्यांपेक्षा जास्तच आहे.(प्रचंड टाळ्या)

आपल्या महाराष्ट्रात अनेक दिग्गज होऊन गेले. त्यातील काही प्रमुख नावे आजही भारताच्या कानाकोपऱ्यात तळपताना दिसून येतात. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले-सावित्रीबाई फुले दाम्पत्य, राजश्री
11)

शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्तृत्व एवढे महान आहे की सर्व भारत त्यांना ओळखतो.(प्रचंड टाळ्या) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नुसत्या महाराष्ट्राचा नाही तर सगळ्या भारताचा सर्वांगीण विचार केला.(टाळ्या) त्यांच्या गुणवत्तेचे विविध पैलू पाहिले तर साऱ्या
12)

भारतातील कानाकोपऱ्यात त्यांचा प्रकाश पसरलेला दिसतो. महिलांचे सबलीकरणा पासून कामगारांच्या हितापर्यंत तसेच कोट्यवधी अस्पृश्य-मागासवर्गीयांच्या न्याय हक्कासाठी दिलेला लढा हा केवळ निधड्या छातीचा मराठी माणूसच करू शकतो.(प्रचंड टाळ्या) आणि त्याचा सर्वांना अभिमान वाटला पाहिजे.
13)

नवी दिल्लीत २९ जानेवारी १९५० रोजी महाराष्ट्र मंडळातर्फे त्यांचा सत्कार केला तेव्हा तेथे ते म्हणाले "मराठी माणूस हा राष्ट्रभक्तीत आणि कर्तव्यात कसूर करत नाही आणि इतर कुणापेक्षाही मागेही नाही. ज्ञान व त्यागामध्ये मराठी माणूस सर्व भारतात पुढे आहे".
14)

उद्याच्या स्वातंत्र्यदिनी आपण अगणित मराठी वीरांची कृतज्ञतापूर्वक आठवण केली पाहिजे. राजकीय स्वातंत्र्याबरोबर आर्थिक आणि सामाजिक समता देशात प्रस्थापित झाली तरच कोट्यवधी जनता सुखी होईल. (टाळ्या) हे आजच्या पुढाऱ्यांच्या टाळक्यात शिरले पाहिजे.(हशा) एकेकाळी ९ ऑगस्टने
15)

पेटविलेला अंगार पुन्हा चेतविला पाहिजे. म्हणूनच थाळ्या वाजवू नका तर कुशल कामांचा बिगुल फुका. सर्व अपप्रवृत्ती यात भस्मसात झाल्या पाहिजेत. तसेच कोरोनाला न घाबरता पुन्हा कार्यक्षम झाले पाहिजे, कारण जो थांबला तो संपला हे लक्षात असुद्या.
16)

जीवनचक्र हे गतिमान असेल तरच या पृथ्वीवर नंदनवन बहरेल.(SS)
17)

(आचार्य अत्रे यांनी एक न केलेले पण असते तर त्यांनी केले असते ते भाषण )

--- #संजय_सावंत ( नवी मुंबई )

🟦🟦🟦

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling