Discover and read the best of Twitter Threads about #संजय_सावंत

Most recents (19)

*म्यानमारचे 'मंडाले' - एक बौद्ध संस्कृतीचे शहर* Mandalay in Myanmar - City of Buddhist Culture

म्यानमार देशातील एक नंबरचे शहर म्हणजे यंगून (म्हणजेच रंगून) आणि दोन नंबरचे शहर मंडाले असून ते इरावती नदीच्या किनारी वसलेले आहे. इ.स.सन १८५७-५९ मध्ये मिनदोन राज्याच्या
1)
राजवटीत हे शहर स्थापित झाले. दुसऱ्या महायुद्धात या शहराची अपरिमित हानी झाली. पण फिनिक्स पक्षा प्रमाणे हे शहर पुन्हा भरभराटीस आले. बर्माचे हे सांस्कृतिक आणि बुद्धीझमचे मोठे धार्मिक केंद्र आहे. येथे बौद्धांचे प्राबल्य जास्त आहे. त्यामुळे असंख्य मॉनेस्ट्रीज आणि
2)
सातशेच्यावर पॅगोडे येथे आहेत. जगातील सर्वात जास्त बौद्ध भिक्खू असलेले हे शहर आहे.

इथे मंडाले डोंगर असून त्यावरून या शहराला मंडाले नाव पडले असावे. या मंडाले टेकडीवरून संपूर्ण शहराचा मोठा नयनरम्य देखावा दिसतो. इथे टेकडीवरच मोठा पॅगोडा आहे. इथली बुद्धमूर्ती अतिशय
3)
Read 9 tweets
*श्रेष्ठतम गुरू भगवान बुद्ध* The Greatest Guru Lord Buddha

भगवान बुद्धांच्या जन्मापूर्वीचा काळ हा भारतीय इतिहासातील तमो युगाचा काळ होता. प्रज्ञेच्या दृष्टिने ते एक मागासलेले युग होते. श्रद्धाळू लोक धर्मग्रंथावर विश्वास ठेवून आचार विधींचे आचरण करत होते. नैतिक विचारांना
1)
स्थान नव्हते. भगवान बुद्धांनी हे सर्व बदलले. त्यांच्या शिकवणुकीमुळे समाज जीवनावर अदभुत बदल घडून आला. सत्यमार्गाचे आणि विज्ञानमार्गाचे आकलन लोकांना झाले. सदाचार प्रवृत्ती होण्यासाठी मानसिक संस्काराचे महत्व लोकांना उमगले. आजही त्यांच्या शिकवणुकीचे अपूर्व स्वरूप भारतीय
2)
धार्मिक विचारधारांच्या अध्ययनात प्रतीत होत आहे. त्यांचा अनित्यतेचा सिद्धांत आज खरा ठरला आहे. आजचे आधुनिक विज्ञान म्हणजे बौद्ध धम्मातील अनित्य आणि अनात्मवाद यांचा प्रतिध्वनी होय.यामुळे समस्त प्रगल्भ मानवजातीला आपले गुरू म्हणून, मार्गदाता म्हणुन भगवान बुद्ध स्वीकारेवेसे का
3)
Read 16 tweets
*ठिकऱ्या उडालेल्या बुद्ध शिल्पाची केली जुळवाजुळव*

तालिबान या अतिरेकी संघटनेने २००१ मध्ये काबूल म्युझियम मधील गांधार शैलीचे मोठे बुद्ध शिल्प उध्वस्त केले होते. त्यामुळे ठिकऱ्या उडालेल्या या शिल्पाचे ७५० तुकडे गोळा करून म्युझियम मधील तळघरात ठेवले होते. शिकागो विद्यापीठ
1) ImageImageImage
संशोधकांनी ते तुकडे पुन्हा जोडण्याचे ठरविले. या कामासाठी काबूल येथील अमेरिकन राजदूत यांनी निधी उपलब्ध करून दिला.

त्यानुसार कोडे सोडविल्या प्रमाणे शिल्पाचा जुना फोटो पाहून तुकडे जुळविण्यात आले. काबूल संग्रहालयात अफगाणिस्तान मधील 'हड्डा' या पुरातन बौद्ध स्थळावर अनेक
2)
शिल्पे होती. बुद्धअस्थि असलेले हे ठिकाण १९८० साली अतिरेक्यांनी उध्वस्त केल्याने तेथील बौद्ध संस्कृतीचा प्राचीन ठेवा काबूल म्युझियम मध्ये आणण्यात आला होता. म्युझियमचे संचालक मोहम्मद फाहिम रहीमी यांनी सांगितले की पुरातन बौद्ध शिल्पे हा आमचा राष्ट्रीय ठेवा आहे.बौद्ध संस्कृती हा
3)
Read 6 tweets
*कान्हेरी लेणी पन्नास वर्षांपूर्वीची*

बोरिवलीची 'कान्हेरी लेणी' म्हणजे मुंबईच्या सान्निध्यात असलेला सर्वात सुंदर प्राचीन बौद्ध संस्कृतीचा वारसा होय. इ.स.पूर्व १ ल्या शतकापासून ते इ.स.११ व्या शतकापर्यंत विकसित झालेल्या या लेण्या म्हणजे मुंबईचा एक अनमोल ठेवा आहे.
1) ImageImage
सुंदर बुद्ध शिल्पे, स्तुप, चैत्यगृह, विहार, सभागृह, निवासस्थाने, शिलालेख, पाण्याची असंख्य कुंडे, बोधिसत्व आणि पद्मपाणी बुद्ध यांची शिल्पे असा असंख्य बौद्ध संस्कृतीचा अनमोल ठेवा तेथे दृष्टीस पडतो. मुंबईपासून हे ठिकाण अवघ्या तासाभराच्या अंतरावर आहे. शंभराच्यावर तेथे लेण्यां असून
2) ImageImage
आजूबाजूस पसरलेल्या बोरवली नॅशनल पार्कमुळे या परिसराला निसर्ग सान्निध्याची जोड मिळाली आहे. बोरिवलीची कान्हेरी लेणी,अंधेरीची कोंडीवटे लेणी, मागाठणे लेणी, जोगेश्वरी लेणी, विरारची जिवदानी लेणी, गोरेगावची पडन लेणी, डुंगी लेणी (पनवेल-उरण), नाहूरचा ताम्रपट (भांडूप),
3) ImageImage
Read 8 tweets
*पालि (मागधि) भाषेतून मराठीचा उगम - आश्चर्यकारक साम्य* Indian languages including Sanskrit originated from Pali

आपण महाराष्ट्रीयन आपली मराठी संस्कृती, भाषा आणि साहित्य यांच्या विषयाचे संशोधन महाराष्ट्राच्या सीमा आणि मराठी कलाकृती यांच्या परिघातच करतो. त्यामुळे त्याचे
1) Image
प्रतिबिंब किंवा कार्य राष्ट्रीय पातळीवर पडतच नाही. या देशाच्या सांस्कृतिक इतिहासात बंगाली, हिंदी व दाक्षिणात्य भाषा सोडल्यास मराठीचा मागमूस दिसत नाही. मराठीचा सांस्कृतिक इतिहास डोळसपणे पाहण्याचे व कथन करण्याचे प्रामाणिक प्रयत्न फारसे झाले नाहीत. त्यामुळेच मराठी
2) Image
भाषेच्या कित्येक बाबी अद्याप अज्ञात राहिल्या आहेत.आपण भारतीय आपल्या सर्व भाषा या संस्कृत मधून निर्माण झाल्याचे लहानपणापासून ऐकत आहोत. त्यामुळे ही गोष्ट खरी आहे काय याचा शोध आपण घेतच नाही. प्रत्यक्षात चित्र वेगळेच दिसते. परंपरेने जे मानले गेले आहे त्याच्या सीमा आपण ओलांडीत नाही
3) Image
Read 18 tweets
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाडची परिषद आणि गंधारपाले लेणी* Dr.Babasaheb Ambedkar, Mahad Satyagraha & Gandharpale Caves

महाडची सत्याग्रह परिषद दिनांक २५ ते २७ डिसेंबर १९२७ रोजी भरविण्यात आली होती. त्या परिषदेची पूर्वतयारी करण्याकरीता अनंत विनायक चित्रे यांची नियुक्ती करण्यात
1) Image
आली होती. त्यामुळे ते पंधरा दिवस अगोदरच महाडमध्ये जाऊन बसले होते. त्यावेळी महाडमध्ये त्यांना सत्याग्रहाबद्दल प्रतिकूल मत असल्याचे दिसले. तसेच परिषदेच्या कार्यात सर्वतोपरी विघ्ने उत्पन्न करून परिषदेला कोणत्याही प्रकारचे सामान मिळू द्यायचे नाही असा विरोधकांचा कट
2) Image
असल्याचे त्यांना दिसून आले. तेव्हा चित्रे यांनी कायस्थ ज्ञातीतील काही तरुण मंडळींना हाती धरून आपला उद्योग तडीस नेला. या कामी त्यांना शांताराम पोतनीस, केशवराव देशपांडे, कमलाकर टिपणीस, सुभेदार घाडगे, थोरात आणि जमादार वगैरे मंडळींचे पुष्कळ साहाय्य झाले. त्यांनी सर्व
3) Image
Read 15 tweets
*तामिळनाडू राज्यातील पेरूनचेरी आणि पुथामंगलम येथील बुद्धमूर्ती* Buddha Statues of Peruncheri and Puthamangalam in TamilNadu.

तामिळनाडूतील नागपट्टिनम जिल्ह्यात अनेक बुद्धमूर्ती व शिल्पे आढळून येत आहेत. दक्षिण भारतातील नागपट्टिनम हे एकेकाळी बौद्ध धर्माचे मोठे क्षेत्र होते.
1) Image
संगम राजवटीतील पुम्फहार पासून बौद्धधर्म तेथे रुजला होता. ब्राँझ धातुच्या बुद्धमूर्ती तेथेच अलीकडे सापडल्या होत्या. मोठ्या पाषाणातील बुद्धमूर्ती सुद्धा तेथील काही गावात दुर्लक्षित पडलेल्या आढळून येत आहेत. पेरूनचेरी आणि पुथामंगलम येथे सापडलेल्या बुद्धमूर्ती यांची
2) Image
माहिती खालील प्रमाणे आहे.

नागपट्टिनम जिल्ह्यात मथीलादुथुराई तालुक्यात पेरूनचेरी नावाचे गाव आडबाजूस आहे. या गावात जवळजवळ पाच फूट सात इंच उंचीची बुद्ध मूर्ती आढळून आली असून ती आठव्या ते दहाव्या शतकातील असावी. शंभर वर्षांपूर्वी या गावात एका घराचा पाया खणताना ती मिळाली असून
3) Image
Read 9 tweets
*धम्मलिपि.. पालिभाषा*

पालि' भाषेची १४ आश्चर्ये

१) जी भाषा बोलली जात नाही तिचा जगभर अभ्यास चालू आहे.
२) त्रिपिटकाची ही भाषा आज आंतरराष्ट्रीय भाषा झाली आहे.
३) पालि भाषेच्या सर्व शाखा समृद्ध असून तेथे संशोधनाला वाव आहे.
४) भगवान बुद्ध यांच्या धम्मासबंधी सर्व

1) Image
माहितीचे भंडार पालि भाषेत ओतप्रोत भरले आहे.
५) नुसतेच भिक्खू नाही, तर नवीन पिढी सुद्धा ही भाषा शिकतेय.
६) पालि भाषेत वैद्यकीय शास्त्र, वास्तू संरचना शास्त्र, व्यवस्थापन शास्त्र आणि अर्थशास्त्र सुद्धा आहे.
७) जगभरातील मोठमोठ्या विद्यापीठातून पालि भाषा शिकविली जात आहे.

2)
८) इतर कोणत्याही भाषेत पालि शब्दांचे अर्थ देता येत नाहीत.
९) पालि भाषेत अनेक शब्दांचे विविध अर्थ स्पष्ट होतात.
१०) पालि भाषा अनेक भाषांची जननी आहे.
११) ती आता फक्त बौद्ध समुदायापुरती मर्यादित राहिली नाही. पालि जातक कथांचे असंख्य भाषेत भाषांतर झाले आहे.

3)
Read 4 tweets
*केरळात सापडल्या प्राचीन बुद्धमूर्ती* Ancient Buddha Statues found in Kerala State.

केरळ राज्यात अनेकजण पर्यटनासाठी जातात. कुणी तिथे देवालयांच्या दर्शनासाठी जातात तर कुणी केरळातील निसर्गसौंदर्याचा अविष्कार पाहण्यास जातात. कुणी संस्कृतीचा अभ्यास करण्यास तर कुणी कामानिमित्त
1) Image
भेट देतात. पण केरळाला जाऊन कुणी बुद्धमूर्ती पाहून आल्याचे आजपर्यंत सांगितले काय ? कारण केरळ म्हणजे सगळीकडे मोठं मोठी मंदिरे. बुद्धमूर्ती तिथे कशा असतील हा अनेकांना प्रश्न पडतो. पण आता अनेक ठिकाणी पुरातन बुद्धमूर्ती प्राप्त झाल्याने केरळाची मूळ संस्कृती उजेडात येत आहे.
2) Image
एकेकाळी भरभराट असलेली बौद्ध संस्कृती या प्रदेशातून विस्मरणात कशी काय गेली या बाबत संशोधन होत आहे. ४५ वर्षांपूर्वी शाळेत असताना केरळला भेट दिली होती. वडील त्यावेळी केंद्र सरकारच्या सेवेत त्रिचूर येथे कार्यरत होते. त्यामुळे तेथील देवालयांची माहिती ज्ञात होती. पण त्यांचा
3) Image
Read 15 tweets
*कोंडाणे लेण्यांचा दर्शनी भाग कूठे आहे ? Where is front portion of Kondane caves* ?

रायगड जिल्ह्यातील कर्जत जवळची कोंडाणे लेणी अती प्राचीन असून भंग झालेला त्याचा बराचसा भाग पाहून देखील एकेकाळी ही लेणी भव्य, रेखीव व कलाकुसरीने नटलेली असावीत हे ध्यानी येते.
1) ImageImageImage
थेरवादी परंपरेच्या या लेण्या राजमाची किल्ल्याच्या उत्तर कडयाच्या खाली येतात. लेण्यांचा हा परिसर पावसाळ्यात अलौकिक सौंदर्याने नटलेला दिसतो. हिरवीगार वृक्षवल्ली, जागोजागी वाहणारे ओहोळ व मध्येच फेसाळत वाहणारे ओढे यांचे दर्शन पावसाळ्यात नेहमी होते. कोंडाणे समूहात
2) ImageImageImage
एक चैत्य व ७ विहार आहेत. इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात ती खोदली गेली आहेत. दर्शनी भागात टिकून राहिलेली चैत्याची कलाकुसर श्रेष्ठ दर्जाची असून पिंपळ पानाच्या आकाराची आहे. या चैत्याच्या उत्तर बाजूकडील विहारांसमोर पावसाळ्यात मोठा पाण्याचा लोट कोसळत असतो. या डोंगरात ठिकठिकाणी
3) ImageImage
Read 16 tweets
*थाळ्या वाजवू नका तर बिगुल फुका*

आचार्य अत्रे ---- (13 ऑगस्ट)
बंधू-भगिनींनो आज माझा जन्मदिवस आहे. दोन दिवसांनी १५ ऑगस्ट आहे. या वर्षी जानेवारीपासून सर्व जगाचे गणित बिघडून गेले आहे. गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही अशा व्हायरसने मानव जातीला विळखा घातला आहे. भारतात तर त्याची
1) ImageImageImage
एवढी दहशत पसरली आहे की तो महारोग्यापेक्षा जास्त भयंकर रोग झाला आहे. कोणी नुसता खोकला किंवा शिंकला तरी लोक त्याच्याकडे संशयाने पहात आहेत.(हशा) यामुळे तोंड धुताना खाकरणेसुद्धा निषिद्ध झाले आहे.(हशा) या अगोदर भारताने व सार्‍या जगाने अनेक व्हायरस बघितले आणि पचविले आहेत
2) ImageImage
.(टाळ्या) पण या व्हायरस बुवांचा थाट वेगळाच आहे.

जगात सगळीकडे संगीताचे, विश्वसुंदरी स्पर्धेचे, उदघाटनाचे, आणि टिमकी वाजवणाऱ्यांचे सोहळे रद्द झाले. पण यामुळे भाषण ठोकणाऱ्यांचे खूपच हाल झाले. त्यामुळे आपल्या वाचाळ नेत्यांनी घरीच राहून भाषणांचे धडे गिरवून घरच्यांचे डोके
3)
Read 17 tweets
*कंबोडियातील अंगकोर वट* Angkor Wat - Largest religious monuments in Cambodia.

कंबोडिया हे व्हिएतनाम आणि थायलंड या देशांच्यामध्ये वसलेले एक बौद्धराष्ट्र आहे. १३ व्या शतकापासून थेरवादी बौद्धधम्म तेथे प्रचलित आहे. ५ व्या शतकापासून बुद्धीझमचे अस्तित्व तेथे होते हे अलीकडील
1) ImageImageImage
उत्खननावरून स्पष्ट झाले आहे. ७ व्या शतकानंतर धम्माचा प्रभाव भारताप्रमाणेच कमी होत गेला. तेथील राजांना हिंदू करण्यात पुरोहित वर्ग यशस्वी झाला. पण राजाचे मंत्री बौद्धच राहिले. इ.स. १००१ ते १०५० मध्ये पुन्हा महायानी पंथाचा सुर्यवर्मन हा कंबोडियाचा पहिला बौद्ध राजा
2) ImageImageImage
झाला. १३ व्या शतकात थेरवादी बौद्धधम्म हा राजा ति-चय (इंद्रवदन) याच्यामुळे चांगला रुजला. त्याकाळात बांधले गेलेले 'अंगकोर वट' हे आता कंबोडियातील महत्त्वाचे प्रेक्षणीय स्थळ झाले आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेले हे एक भव्य धार्मिक बौद्धस्थळ असून त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.
3) ImageImageImage
Read 14 tweets
*कवि वर्डस्वर्थचे घर होणार बौद्ध विहार* William Wordsworth's home saved by Buddhist charity.

इंग्लंडचा शेक्सपियर, जर्मनीचा गटे व शिलर, तसेच रशियाचा पुष्किन या प्रतिभावंत साहित्यिकांमुळे त्या त्या देशातील लोकांचे जीवन पिढ्यान्पिढ्या व्यापून गेले आहे. विल्यम शेक्सपिअर
1) ImageImageImage
यांच्याप्रमाणे विल्यम वर्डस्वर्थ या रोमँटिक आणि सौंदर्यवादी कवीचा दबदबा देखील इंग्रजी साहित्यात आहे. पाच भावंडात त्याचा नंबर दुसरा होता. वडील जॉन वर्डस्वर्थ मुलांना कविता शिकवीत, त्यामुळे त्यांच्यात कवितेची आवड निर्माण झाली. सन १७८७ मध्ये केम्ब्रिज येथे शिकत असताना विल्यमने
2) ImageImage
पहिले सुनीत ( Sonnet ) लिहिले. हळूहळू ते निसर्गकवी म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांची लहान बहीण डोरोथी हिला देखील काव्याची आवड होती व ती देखील कवियत्री झाली. त्यावेळी झालेल्या फ्रान्स व इंग्लंड मधल्या तणावामुळे ते बायको आणि मुलीला सोडून इंग्लंडला परत आले.
3)
Read 12 tweets
*वरळीचे जपानी बौद्ध विहार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर* Japanese Buddha Vihar (Worli) and Dr. Babasaheb Ambedkar

मुंबईत वरळी पोद्दार हॉस्पिटललसमोर एक जपानी बौद्ध विहार असून त्याचे नाव निप्पोन्झान म्योहोजी असे आहे. येथे गगनाला भिडणार्‍या इमारती उभ्या राहिल्या
1) ImageImageImage
असून त्यांच्या गराड्यात हे अप्रतिम छोटेसे बुद्धविहार लक्ष वेधून घेते. या विहाराच्या आवारात मोठमोठे वृक्ष असून उत्तराभिमुख असलेल्या या विहारातील सफेद संगमरवरी बुद्धमूर्तीचे दर्शन रस्त्यावरून जाताना सुद्धा होते. सन १९३१-३८ दरम्यान जपानी निचिरेन पंथाचे फुजी गुरुजी भारतात आले
2) ImageImageImage
असता भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी वरळी येथे टेकडीखाली बुद्ध विहार बांधले. सन १९५० च्या दरम्यान याचे नूतनीकरणाचे काम सुरू झाले व दोन वर्षात पूर्ण करण्यात आले. ( त्यावेळेचे फोटो सोबत जोडण्यात येत आहेत ) नवीन आकर्षक चैत्यगृहासारखे
3) ImageImage
Read 16 tweets
*महाराष्ट्राची पहिली धम्मयात्रा- १९६० मधील सोपारा स्तुप यात्रा* Soppara Stupa in 1960.

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांसह बौद्ध धर्माची दिक्षा घेतली आणि भारतातील असंख्य पिडीतांची आयडेंटिटी चेंज झाली. त्यांच्या आयुष्यातील नव्या मार्गावरील वाटचालीला
1) ImageImage
सुरवात झाली. हा बदल अपेक्षित होताच आणि तो उस्फूर्तपणे स्वीकारला जाऊन घरातील काल्पनिक देवांना विसर्जित करण्यात आले. परंतु त्यावेळी तळागाळात बुद्धधम्माबद्दल काहीच माहिती नव्हती. वंदना माहीत नव्हती. मात्र धर्मांतर झाल्यानंतर दोन-तीन वर्षातच बौद्ध धर्माची माहिती असणारी
2) ImageImage
अनेक पुस्तके, पाक्षिके बाजारात येऊ लागली. भगवान बुद्ध यांचे चरित्र, त्यांचा उपदेश यावरील पुस्तके प्रसिद्ध होऊ लागली. मग हळूहळू बुद्ध धम्म म्हणजे काय हे समजू लागले. यामुळे आजूबाजूस असलेल्या बौद्ध लेण्यां, स्तुप पाहून ही सर्व आपलीच संस्कृती आहे ही जाणीव जागृत झाली.
3)
Read 11 tweets
*दामोदर प्रकल्प आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर* Damodar Vally Project and Dr. Babasaheb Ambedkar

एकेकाळी दामोदर नदी बिहार राज्यावरील मोठे संकट होते. दर दोन-चार वर्षांनी नदीला महापूर येई आणि लाखो लोकांचे जीवन आणि वित्त नष्ट होत असे. सन १८५९ पासून या नदीला आलेल्या मोठ्या
1)
पुरांच्या बारा नोंदी करण्यात आल्या होत्या. बरोबर ७७ वर्षापूर्वी १७ जुलै १९४३ मध्ये या नदीला असाच मोठा पूर आला आणि त्यावेळेला त्याने सर्व रेकॉर्ड मोडले. अपरिमित हानी झाली. ११ हजार घरे वाहून गेली. लाखो लोक बेघर झाले. बंगालमध्ये अन्नधान्य पोहोचणे कठीण झाले. त्यातच दुसऱ्या
2)
महायुद्धाची धुमश्चक्री चालू असल्याने कलकत्त्यापर्यंत बॉम्बवर्षाव होत होते. पुन्हा बंगालमध्ये दुष्काळाने कहर केला. पंचवीस हजार लोक मरण पावले आणि म्हणून इंग्रज सरकारने दामोदर नदीला कायमचा अटकाव घालणारी योजना राबविण्याचा विचार सुरू केला.

दामोदर प्रकल्प पूर्ण करण्याचे काम
3)
Read 15 tweets
*आंध्रप्रदेश मधील बौद्ध संस्कृतीचे श्रीकाकुलम* Buddhist heritage site in Srikakulam, AP

'श्रीकाकुलम' हा आंध्रप्रदेश राज्यातील जिल्हा असून एक मोठे शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या दीड लाख होती. येथे शालिहूंदम, कलिंगपट्टनम, डब्बका वानी पेटा, नागरी पेटा,
1)
जागति मेता अशी प्राचीन बौद्ध संस्कृतीची ठिकाणे आहेत. शालिहूंदम येथे स्तूप आणि चैत्यगृह यांचे अवशेष आहेत. तसेच वोटीव स्तुप आणि शिलालेख सुद्धा येथे आढळले आहेत. येथील म्युझियममध्ये डोकावल्यास बौद्ध शिल्पांचे भांडार असल्याचे दिसून येते.

आंध्रप्रदेशातील या श्रीकाकुलम
2)
जिल्ह्यात कलिंगपट्टनम नावाचे शहर आहे. प्राचीन कलिंग प्रांताचे ते एक उत्कृष्ट बंदर होते. इथल्या बंदरातून प्राचीनकाळी सुवासीक अत्तर, कपडे, मसाले यांचा मोठा व्यापार चालत असे. अनेक देशात हा माल गलबताद्वारे जात असे. हळूहळू ब्रिटिश राजवटीत मात्र हे बंदर निकामी झाले व ते
3)
Read 8 tweets
*तामिळनाडूतील नागपट्टिनम - एक बौद्ध संस्कृतीचे केंद्र* Ancient Buddhist Center - Nagapattinam (Tamilnadu State )

तामिळनाडू राज्यामधील अनेक गावांत पाषाणातील बुद्धमूर्त्या आढळून आल्या आहेत. तेथील 'नागपट्टिनम' जिल्हा म्हणजे एके काळी बौद्ध संस्कृतीने बहरलेले मोठे केंद्र होते.
1)
या नागपट्टिनम जिल्ह्यामध्ये 'पुष्पवंणम' नावाचे एकांतात वसलेले गाव आहे. तेथे एक सापडलेली प्राचीन बुद्धमूर्ती वडाच्या व पिंपळाच्या झाडाखाली गावकऱ्यांनी ठेवली आहे. ही मूर्ती जवळजवळ ५ फुट ४ इंच उंच असून काळ्या पाषाणात घडविलेली आहे. पुष्पवंणम हे एक निसर्गरम्य
2)
ठिकाण असून तेथे पूर्वी विहार असावा असे समजते.

१४ व्या शतकापर्यंत नागपट्टिनम हे बौद्ध संस्कृतीने भरभराटीला आलेले मोठे केंद्र होते. भारतातील अनेक पुरातन बौद्ध स्थळांच्या नोंदी या म्यानमार तसेच थायलंड देशातील अनेक मॉनेस्ट्रीत आढळून येतात. त्यानुसार म्यानमारमधील पुरातन
3)
Read 10 tweets
*एही पस्सीको - या पहा आणि मगच विश्वास ठेवा* EhiPassiko - SEEING AND BELIEVING

बुद्धिझम तत्वप्रणाली सर्व जगभर पसरली आहे. तो एक धर्म म्हणून नाही तर दुःखमुक्त जीवन जगण्याचा उच्चतम मार्ग आहे. पाश्चात्य देशात लोकांनी धर्म न बदलता विज्ञानवादी बुद्ध तत्वज्ञान स्वीकारले आहे. राग-
1)
द्वेष, मोह-माया पासून मुक्त होऊन निर्वाणपदी पोहोचलेले आणि सर्व मानवजातीला दुःखमुक्तीचा मार्ग दाखविणाऱ्या बुद्धांनी स्वतःसाठी काही वेगळे स्थान निर्माण केलेले नाही. राजपुत्र असताना पायाशी लोळणाऱ्या सुखांना दूर सारून ज्या महामुनींनी शेवटच्या क्षणापर्यंत धर्मोपदेश दिला ते
2)
स्वतःचा संप्रदाय कसे स्थापित करतील ? या जगाने मात्र त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून चालणाऱ्या त्यांच्या अनुयानांना बौद्ध, बुद्धिस्ट म्हटले. त्याचप्रमाणे बुद्ध तत्वप्रणालीचा त्यांना संस्थापक म्हटल्यामुळे त्यांचे अनुयायी बौद्ध म्हणून संबोधले गेले. व्यावहारिक दृष्ट्या ते ठीक आहे.
3)
Read 13 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!