@Jollyboy Profile picture

Aug 20, 2020, 6 tweets

सुशांतसिंग मेहनती, कर्तृत्ववान होता. त्याला चांगलं भविष्य होतं. मग रोहित वेमुला काय होता ? तो मेहनती नव्हता ? हुशार नव्हता ? सुशांतसिंग girlfriend बदलत होता, मुलींच्या गराड्यात असायचा. मोठा नट होण्याची स्वप्न बघत होता. रोहित वेमुला सदैव पुस्तकांच्या गराड्यात असायचा !
1)

कार्ल सेगन च आकर्षण होतं रोहित वेमुलाला, तो मोठी स्वप्न बघत होता. रोहित डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सच्चा अनुयायी होता. त्याला सामाजिक जाण होती.
सुशांतसिंग ने आत्महत्या केली की खून झाला हा प्रश्न आहे, मीडिया फार अस्वस्थ आहे त्यावरून. खून झाला असेल तर त्याच्या girlfriend ने
2)

केला असेल ही शंका वाटते काही लोकांना. आत्महत्या असेल तर depression मुळे केली असेल का ? कसलं depression तर सिनेमे चालत नाहीत, काही लोक काम मिळू देत नाहीत वगैरे वगैरे.

रोहित वेमुलाने आत्महत्या केली का ? नाही, तर परिस्थितीने त्याचा खून केला. परिस्थिती कुणी निर्माण केली तर
3)

सरकार ने, विद्यापीठाने ,मंत्र्याने. त्याला त्याची हक्काची scholarship मिळू दिली नाही. त्याच्या बुध्दी मुळे त्याला त्याची scholarship मिळाली होती. त्याला scholarship चे पैसे न मिळाल्याने त्याने हॉस्टेलची फी नाही भरली म्हणून त्याला हॉस्टेल मधून हाकलले, त्याने रात्र रस्त्यावर
4)

काढली. या हरामखोर मीडिया ने तेव्हा असा थयथयाट केला होता का ? नाही ना !

मीडिया ला, इथल्या व्यवस्थेला रोहित वेमुलाचा खून नाही दिसत का ? या व्यवस्थेने च केला ना हा खून ? रोहित वेमुला महत्वाचा वाटतं नाही का तुम्हाला ? Why is it so ? Sensitivity ची अपेक्षा करत नाही, करणार
5)

ही नाही, हे जरी वर्षानुवर्षे चालत आलं असलं तरी ते बदलणार आहे हे नक्की. सुनेचे ही दिवस नव्हे राज्य येतच की.

7 वर्ष झाली अजूनही दाभोलकरांचे खुनी सापडले नाही की प्रामाणिकपणे शोधले नाहीत !
Its time to bring in the change !

#Akshay_Ubale

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling