या शिल्पपट्टात वर उडते यक्ष / गंधर्व आहेत , दोन प्रलंबपाद बुध्द , पद्मपाणी , वाज्रपाणी , दोन चौरीधारी , तारादेवी , भृकुटी देवी आहेत. त्यानंतर मध्यभागी वज्रासनावर बसलेले दोन पाय मांडी / पद्मासन न घालता मोकळे ठेवलेले ( प्रलंबपाद ) बुध्द दिसत आहेत . त्यांची
1)
दोन्ही पावले एका सहस्रदल कमलपुष्पावर स्थिर आहेत त्या कमलाचा दांडा धरुन दोन्ही बाजूला दोन मानवी आकृत्या दिसतात त्या आकृत्या या कमलपुष्प दांड्याला आधार देत आहेत . " बुध्द तत्वज्ञानाला आम्ही शिरोधार्य मानलेले आहे , आम्ही हे ज्ञान जतन करुन प्रवाही ठेवले आहे " हे व्यक्त इथे
2)
होत आहे . ह्या दोन्ही व्यक्तीचे चेहऱ्याच्या बाजूला पांच तोंडांच्या नाग आकृत्या दिसत आहेत . म्हणजे नाग प्रतिक स्विकारणारे मानवी " गण " समुदायाचे प्रतिनिधित्व करणा-या त्या व्यक्ती आहेत .
" तिदसपुरवरे नागलोकेस थुपे "
याचा अर्थ नागवंशिय लोकांनी बुध्दाचा विशुध्दी मार्ग
3)
स्विकारलेला आहे .
लेण्यामध्ये भारतियांनी दिलेले दान लिहून ठेवलेल्या व्यक्तींच्या नावांच्या याद्या आहेत. ती सर्व नावे नाग हे उपपद लावूनच लिहिलेली आहेत त्याचे गावाचे आईचे नाव व नाग हे उपपद लावलेले स्पस्टपणे लिहिलेले आहे .
आपण सर्व नागवंशिय असल्याचा हा पुरातत्वीय पुरावा
4)
प्रत्येक लेणीत आहे .
माझे परममित्र नंदकुमार कासारे हे स्वःतास नागवंशिय म्हणवून घेतात त्या पाठीमागचा हाच तो सार्थ अभिमान अजूनही कायम आहे .....
5)
#महेन्द्र_शेगांवकर
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
