हा थ्रेड वाचत असताना तुम्हास काही गोष्टी #unpopularopinion वाटू शकतात.. कोणाच्याही भावना दुखावणे हा आमचा हेतू नाही.
गोष्ट यंदाच्या जूनच्या पहिल्या आठवड्यातली.. केरळमध्ये एक प्रेग्नन्ट हत्तीण मारल्याची घटना घडली होती..फार दुःखद आणि चीड आणणारीच घटना होती ती.. #म #धागा 👇
तावातावाने सगळेच व्यक्त होत होते त्यावेळी.. पण त्यात प्राणीप्रेमापेक्षा दांभिकपणा जास्त दिसत होता.. इथं वैयक्तिक पेक्षा सामाजिक भान या अर्थानं मी दांभिकता म्हणतोय.
खरंतर मानवी जीवन हे आशा हिंसेच्या पायावरच उभं आहे. अगदी पूर्वी शिकार करून खाण्यापासून ते आत्ता संकरित 👇
प्रजाती निर्माण करण्यापर्यंत सगळीकडे हिंसा भरून राहिलेली पहावयास मिळते. मानव जसजसा शेती करून स्थायिक व्हायला सुरुवात झाली.. तशी मानवी संस्कृतीत एका भावनेने बळ धरलं.. ती भावना म्हणजे 'निसर्गातील इतर प्राणी एकतर आमच्या सोबत असतील किंवा आमच्या विरोधात.' 👇
या भावनिक न्यायाने 'उपद्रवकारी आणि अउपद्रवकारी' असे सरळ सरळ दोन गट प्राण्यांत पाडले गेले. त्यातूनच पुढे उपद्रवकारी नसलेली आणि मानसाळलेली प्राणी प्रजाती पाळीव प्राणी म्हणून उदयास आली..त्यांचा फायदेशीर वापर मानवाने 'फक्त आपल्याच' भल्यासाठी करून घेतला..👇
आणि आजतागायत बैलपोळा साजरा होतो ते याच कृतज्ञतेच्या भावनेने. ही दृश्य बाब. अर्थात हे सर्व न करता मानव फक्त शिकार करूनच राहिला असता तर आपण अजूनही जंगलात राहिलो असतो.
आता उपद्रवकारी प्राण्यांना संपवणे ही मानवी परंपरा आहे. उदाहरणार्थ.. उंदरांना फॉस्फईड खाऊ घालणं.. 👇
आता त्या गोळ्या प्रेग्नन्ट मादी उंदीरही खातच असेल ना.. तिचंही कुटुंब असेल.. पिल्लं असतील.. पण,इथं ती उपद्रवकारी असल्याने तिला संपवणे श्रेयस्कर. फळात स्फोटक घालणे हा ट्रॅप असतो.. उपद्रवकारी हत्ती, रानडुक्कर यांच्यासाठी..👇
वरील उंदरांना मारणे ग्राह्य धरल्यास.. इथं हत्ती आणि डुक्कर यांची हत्या नैतिक मुद्द्यांवर कशी नाकारणार हा प्रश्न आहे.
निसर्गाच्या सगळ्यात जवळचा उद्योगसाथी म्हणजे शेतकरी.. भूतदया या विषयात शेतकऱ्यांइतका निष्णात कोणीच नसेल.. पाळीव प्राण्यांना जीव लावणे म्हणजे काय असतं.. 👇
जनावरांना जीव लावणे म्हणजे काय असतं हे आपल्यापैकी बऱ्याच जणांची शेतकरी पार्श्वभूमी असल्याने माहिती असेलच.आता उपद्रवमूल्य जास्त असणाऱ्या काही कीटकांचा-प्राण्यांचा बंदोबस्त करणे हा सांस्कृतिक वारसा असल्याने शेतकरी त्यापासून दूर राहणे अशक्यच.तरीही अशा काही घटना घडल्याकी पहिल्यांदा👇
टीकेची तोफ डागली जाते शेतकऱ्यांवर. इकडं 'पुट डाऊन' च्या गोंडस नावाखाली बाकीजण जिवंत प्राणी गाडत असतात त्याबद्दल कोणास काही वाटत नाही.. हा दुटप्पी दांभिकपणा झाला.
मागे हरियाणात एका घोड्यास फार गंभीरपणे मारलं गेलं.. जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 👇
पामराने हे कृत्य केलं म्हणून समाजाने ते स्वीकारलं असं म्हणण्यास इथं वाव आहे तशाच पद्धतीने बाकी घोड्यास अश्व लावताना आपण रोज बघत असतोच.उदा. रेसकोर्स,वरातीत नाचणारे घोडे.अतोनात हाल होतात या प्राण्याचे या ठिकाणी..आपण बंदी घालतो कशावर तर घोडागाडी शर्यतीवर.ही झाली निवडक दांभिकता.👇
जगभरात दुबदुभत्या जनावरांची डायरेक्ट सिमेन ट्रान्स्फर करून संकरित प्रजाती निर्माण केल्या जातात.. त्यास आता कितीतरी दशक लोटली. ह्या अनैसर्गिक सेक्शुअलपणाबद्दल आपणास काही वाटत नाही.. तसं पाहिलं तर हा बलात्कारी मानसिकतेचा परिपाक होऊ शकेल.. पण त्याविषयी बोललो तर आपली सुखवस्तू 👇
विकासाची व्याख्याच बदलावी लागेल म्हणून 'चालतंय की.. त्याला काय होतंय' अस म्हणून आपण विषयास बगल देतो.
आत्ता परवा अमेरिकेत 'जेनेटिकली मोडीफाईड मोस्कीटो' संकल्पना राबवण्याबाबत चाचपणी सुरू झालीय.. टेक्सास प्रांतात डासांच्या या उत्पत्तीने मानवास फायदेशीर काही करता येईल का? 👇
याबाबत खल सुरुय. इथं डासांचा विचार करावा की मानवाच्या सुखवस्तू हव्यासाचा हा प्रश्न आहे.
जाताजाता एक.. विज्ञान प्रगत होत गेलं.. तशी मानवी सुखी विकासाची व्याख्या बदलत गेली.आणि त्या बदलाने इतर दुर्बल प्राण्यांची गळचेपी वाढत गेली हा इतिहास आहे.. वर्तमान आहे.आणि भविष्यही तेच असेल.👇
एका स्तिमित मर्यादे पर्यंत विज्ञान फायदेशीर आहे.. विज्ञानावरची मानवी निष्ठा बदलली की त्याचं शस्त्र होतं.. 'अणू विज्ञान' हे त्याचं उत्तम उदाहरण.. ऊर्जेची भूक भागवण्यासाठी अणू एकदम परफेक्ट सोल्युशन.. पण त्याचं weapon बनवलं की सत्यानाश अटळ आहे.. 👇
मग हे जग हिरोशिमा नागासाकी वेळी म्हणलं..'आइन्स्टाइन बघ तुझ्यामुळे काय झालं' असो.. जगाची रितच ती.. 'चांगल्याला जग सोबती असतं.. वाईट एकलकोंड असतं.'
सांगायचा मुद्दा आहे.. भूतदया हवीच पण निवडक नको.. काहीतरी फॅशन म्हणून 'व्हेगन' बनणं वेगळं आणि खरोखर व्हेगन असणं वेगळं.. 👇
मानवी हिंसा ही मानवाच्या अपरिहार्य जीवनाचा भाग आहे.. इतर प्राण्यांनाही जगण्याचा हक्क आहे.. फक्त आपण आपली दांभिकता सोडायला हवी. जिथं उपद्रवमूल्य जास्त असणाऱ्या प्राण्यांची गाठ पडेल त्यावर शस्त्राने मार्ग न काढता शास्त्राने मार्ग काढायला हवा.. एवढंच.👇
टीप - प्राण्यांची हत्या करण्यास आमचा पाठिंबा नाही. हिंसेस आमचा तीव्र विरोधच आहे. समाजमाध्यमातून आणि इतर ठिकाणी व्यक्त होताना जो एककल्ली विचार प्रदर्शित होतो त्याची दुसरी बाजू मांडण्याचा हा प्रयत्न होता. यातून कोणाची भावना दुखावली असल्यास त्रिवार क्षमस्व: .🙏
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
