डेडपूल... Profile picture
उन्हातान्हात राहतो Cool, नाव माझं Deadpool. ॥ Social ॥ Pacifism ॥ Rational॥ #पांडुरंग #Volleyball #Wrestling #Tilling

Aug 26, 2020, 6 tweets

काळ साधारणपणे 2006 च्या दरम्यानचा ...नुकतंच आम्ही इयत्ता पाचवीला जायला लागलो होतो...त्यावेळी मुंढे साहेबांची सुरवातीला सोलापूर या ठिकाणी पोस्टिंग होती... अतिक्रमण पाढायच काम तेंव्हाही प्रगतीत होतं... आपल्या समाजाला हे असलं अतिक्रमण हटाव त्याकाळी सवयीचं न्हवत... #म #धागा 👇

तेंव्हाही लोकांच्या रोशास या तुकारामाला सामोर जाव लागलं... त्यावेळीचे त्यांचे बोल आजही मला लख्ख आठवतात...

"मला दुकाने पाडायला आनंद होत नाही. पण, माझ्या कर्तव्यापुढे मी काही करू शकत नाही. मी पण एका गरीब कुटुंबातीलच आहे."👇

पुढे परवा जेंव्हा पुणे मनपा प्रमुख आणि PMPL च्या व्यवस्थापक पदी आले तेव्हा मी पुण्यातच होतो. तेव्हा सोलापूरातील प्रसंगाची आठवण झाली. त्यांनी तिथं जी शिस्त काय असते ते दाखवून दिली होती त्याचाच प्रत्यय पुण्यात आला.

दरम्यान सोलापूर असो किंवा नाशिक असो किंवा नवी मुंबई असो त्यांनी 👇

आपल्या कामाचा धडाकाच लावला. कोणत्याही राजकीय पक्षास न जुमानता आपलं कर्तव्य प्रथम हेच त्यांनी अनेक वेळा दाखवून दिले आहे. त्याच बक्षीस ही त्यांना मिळालं... पंधरा वर्षाच्या कारकिर्दीत जवळपास 12 वेळा बदली मिळाली त्यांना. 👇

कोणत्याही पदावर वर्षभरापेक्षा जास्त काळ तुकाराम मुंढे हे प्रस्थ इथल्या व्यवस्थेला झेपत नाही...ही शोकांतिका आहे.

आज त्यांची नागपूर महानगरपालिका आयुक्तपदावरून बदली झालीय..खरं म्हणजे ह्या कोरोना च्या संकटात त्यांनी इतर अधिकार्यांना लाजवेल असं काम दिवस रात्र केलं होतं..
👇

या त्यांच्या कर्तव्याबद्दल मी त्यांचे आभार मानणार नाही. कारण, प्रत्येक प्रशासकीय अधिकारी हा जनतेला आपला कुटुंबातील आहे असं वाटलं पाहिजे.
आभार परक्यांचे मानायचे असतात साहेब तर आमचेचं आहेत.
आता नवीन ठिकाणी साहेब येतील.. पण कामाची रीत तीच असेल.. बघा हवं तर. #आदर #प्रेम

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling