@Jollyboy Profile picture

Aug 27, 2020, 18 tweets

देव वैगरे खरंच असतो का? बालपणापासुन प्रश्न पडायचा पण उत्तर फार उडवाउडवीचे मिळायचे समाधान व्हायचे नाही.आपण जरा आगावुच होतो प्रश्न विचारायचा आपल्याला भारी नाद होता त्यामुळे बरेच शत्रु तयार झाले होते असो..

जन्म राम नवमी दिवशी झाला घरच्यांनी नावच राम ठेवले यावरुन घरचे
1)

पुर्णतः धार्मिक ह्यात वादच नाही.देवबाप्पा असा,तसा.तो हे करतो,ते करतो,असे करतो,तसे करतो,चतुर्थी,एकादशी,सण,सोमवार,शनिवार,पीर असे घरचे धार्मिक वातावरण.देव असतो का विचारल्यास असतो तर म्हणुन तर आपण आहोत जग आहे असे उत्तर मिळत असे...

शाळेत जाऊ लागलो हरिनाम सप्ताह,बोकडाचे
2)

कार्यक्रम,विविध जत्रा,मंदीरे,अभिषेक,उरुस,देवीचा गोंधळ बरंच काही पाहीले.अशा वातावरणात आपण देवावर श्रद्धा ठेवणारच ना...बालपणी तेवढी कुठं अक्कल असते आणि वरुन मोठी मंडळी आपल्याला प्रश्नाची उत्तरे उडवाउडवीची देऊन गप्प करतातच की.बालपणीच देवावर आपली प्रचंड श्रद्धा निर्माण
3)

झाली होती...
देवावर टिका करणार्यांचा मला फार राग यायचा हे आमच्या देवावर टिका का करतात? देव यांना भयंकर शिक्षा का करत नाही? नाहीतर आपले लोक यांना धडा का शिकवत नाहीत? वाईट लोकांना शिक्षा कर म्हणुन देवाकडे मी प्रार्थना करायचो.जगो नहीं तो कटने को तयार रहो,हिंदु खतरे में है
4)

वैगरे वैगरे बोलायचो पण एक प्रश्न मला सतत आतुन पोखरायचा देव खरंच असतो का??

ज्याचे मुद्देसुद उत्तर मला मिळालेच नव्हते.देव असतो तर त्याचे इतके प्रकार का? जग एका देवाने बनवले तर आपण निरनिराळे देव का मानतो? देव पापी लोकांना का संपवत नाही? देव इतक्या मोठ्या जगावर कंट्रोल कसे
5)

ठेवतो,लोकांच्या मनातील सगळं देवाला कसं कळंत वैगरे वैगरे प्रश्नांनी माझ्या डोक्याचं भद्द व्हायचं.. तरिही माझ्यात काही देव नाही,नसतो हे स्विकारायचं धाडंस नव्हतं.कारण लहानपणापासून ऐकलेले स्वर्ग नरक,देव नाकारणार्याला देव जबरी शिक्षा करतो.नाहीतर ह्या ना त्या मार्गाने देव
6)

त्याला न मानणार्या लोकांची वाट लावतो वैगरे वैगरे भितीमुळे आपली काही टाप झालीच नाही कधी..

आजु बाजुच्या धार्मिक वातावरणामुळे,झालेल्या धार्मिक शिकवणीमुळे,मिळालेल्या उडवाउडवीच्या उत्तरामुळे देवावर प्रचंड श्रद्धा निर्माण झाली होतीच.डोक्याला इबिताचे पट्टे लावले की बारा हत्तीच
7)

बळ आल्या सारखा फिल यायचा,देवपुजा केल्यास खुप मोठा पराक्रम केल्या सारखं वाटायचं पण तो प्रश्न नेहमी मला अस्वस्थ करत असे देव खरंच असतो का?

एके दिवशी देव मला किळसवाणा वाटला.शाळेतील एका मंदीरात दत्त मुर्तीची स्थापना होणार होती.मुर्ती आली होती आधी पाण्याने धुतली मग एका मोठ्या
8)

पातेलात त्याला ठेवुन दुध,दही टाकुन अनेक लोकांनी मुर्तीला श्रद्धेने अंघोळ घातली आणि त्या दुध-दह्याची महाप्रसाद म्हणुन कढी बनवली गेली.देवावर श्रद्धा असुनही मला ते भावले नाही त्यादिवशी पासुन देवासाठी लोक काहीही करायला तयार असतात हे पुर्णतः पटले पण देवाला आपण जे करतोय त्याची
9)

खरंच गरज असते का हा प्रश्न पडु लागला...

पुढे वाचन,अभ्यास,वर्तमानपत्रे ह्याच्या आधारे विज्ञानवादी विचारांकडे कल वाढु लागला ते बुद्धीला पटु लागले तरिही देवावर श्रद्धा होतीच.

दाभोळकर गेले तेंव्हा नुकताच 10 वी पास होऊन काॅलेजला जाऊ लागलो होतो.हत्येनंतर वर्तमानपत्रांमध्ये
10)

रविवारच्या विशेष पुरवणी मध्ये दाभोळकरांविषयीचे विविध लेख आले. ते वाचुन त्यांच्याबद्दल प्रचंड आदर निर्माण झाला त्यांचे विचार,कार्य समजुन घेऊ लागलो. सायबर कॅफेवर जाऊन युट्युबवरचे व्याख्याने ऐकली.

देव खरंच असतो का? ह्या प्रश्नाचे थेट मुद्देसूद उत्तर मला त्यांच्या
11)

व्याख्यानमालेत मिळाले मी त्याक्षणांपासुन सरांचा फॅन झालो.त्यानंतर हळु हळु देवावरील श्रद्धेवरचा माझा विश्वास कमी कमी होऊन संपुष्टात आला.मला देवाची भिती वाटेनासी झाली.मुक्त विचार प्रिय वाटु लागले.माझे वैचारीक परिवर्तन झाले मी नास्तिक झालो.

कुठल्याही प्रकारच्या देवाचे
12)

अस्तित्व नाही हे मनाला पटायला लागले की माझ्या आयुष्यात काही सकारात्मक बदल झाले.मी संकट आल्यास प्रार्थना करणे,देवाच्या भरोशावर बसणे सोडले संकट कसे दुर करता येईल यासाठी स्वतः मार्ग शोधु लागलो एकंदरित स्वावलंबी झालो.कुठल्याही दर्गा,मंदीराला पैसे देणे बंद केले होईल तितके
13)

ऐपतीप्रमाणे दिव्यांग,वयस्करांना मदत करु लागलो.धडधाकट असणार्या लोकांना देव,अल्लाच्या नावाने पैसे मागणार्यांना पैसे देणे बंद केले.मी देव धर्मासाठी वेळ घालवणे सोडल्यामुळे तो काहीसा वेळ स्वतःच्या छंदासाठी देऊ लागलो,देवाकडे सुख मागण्यापेक्षा आपल्याला सुख कशात मिळते हे शोधु लागलो
14)

आणि ते मिळवुन त्याचा उपभोग घेऊ लागलो,दुःख आल्यास त्याला प्रतिकार करण्याची मानसिक तयारी ठेवली,सोमवार-शनिवार,श्रावन महीन्यात नाॅनव्हेज खायचे नाही असला प्रकार सोडुन दिला वैगरे वैगरे...

पुढे चालुन मला देव,अल्ला,येशु वैगरे वैगरे देवाला मानणारे सर्व लोक मुर्ख बिनडोक वाटु लागले
15)

त्यांचा तिरस्कार वाटु लागला.पण वैचारिक बदल हा एकदम न होता हळु हळु होतो हे पटायला लागले.लोकांची देवावर श्रद्धा आहे जशी माझी पुर्वी होती तसेच लोकांना संविधानाने धार्मिक स्वातंत्र्य दिलेले आहे आपण प्रबोधना पलिकडे काहीच करु शकत नाही त्यांना धार्मिक गोष्टीत रस असेल तर
16)

आपण ही त्यांच्या श्रद्धेचा आदर करायला हवा हळु हळु समजायला लागले.कुठलीही विचारधारा ही एका लिमिट पर्यंत योग्य असते त्याचा अतिरेक झाला की कट्टरता आपल्याला विनाशाकडे घेऊन जाते कळायला लागते.अशाप्रकारे श्रद्धावान लोकांबद्दल असलेला तिरस्कार गळुन पडला..

नरेंन्द्र दाभोळकर सर आणि
17)

त्यांच्या विचाधारेमुळे मला जीवनात एक उत्तम मार्गदर्शन लाभला.प्रत्यक्ष व्याख्यान ऐकण्याचा योग आला नाही पण त्यांचे विचार अमर राहतील.मरणांनंतर ही त्यांची विवेकवादी विचारधारा आमच्या सारख्या वैचारिक परिवर्तनासाठी उत्सुक असणार्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल.
18)

#Akshay_Ubale

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling