@Jollyboy Profile picture

Aug 30, 2020, 5 tweets

#वर्षावासाची_तिसरी_पौर्णिमा

भाद्रपद पौर्णिमा म्हणजे पोट्ठापाद मासो पुन्नमि

वर्षावासचा आरंभ आषाढी पौर्णिमेपासून होतो आणि समाप्ती अश्विन पौर्णिमेला होतो. या चार पौर्णिमांमध्ये 'भाद्रपद पौर्णिमा' ही तिसरी आहे.

या वर्षावासचा काळात भिक्खूगण एकाच ठिकाणी राहत या काळात ते
1)

बुध्द धम्म तत्त्वज्ञानाचे विचारांवर चिंतन मनन करीत असतात.

पावसाळ्यात है भिक्खू इकडे तिकडे फिरत ओले गवत तुडवितात, त्यामुळे गवतातील बारीकसारीक जीव जंतूंचा नाश होतो, असे लोक टीका करू लागले. ही गोष्ट जेव्हा तथागतांना कळाली तेव्हा भिक्खूनी वर्षाकाळी एकाच ठिकाणी राहावे, असा
2)

त्याने नियम केला.

तथागतांनी आषाढी पौर्णिमेच्या दिवशी वर्षावासाला सुरुवात व्हावी असा नियम केला. वर्षावासाला सुरुवात झाल्यानंतर भिक्खूनी तीन महिने एका ठिकाणी राहिले पाहिजे.

वर्षावासाच्या तीन महिनाच्या काळात भिक्खू आंतरिक शुध्दी आणि मनोविकासाचा कसून प्रयत्न करतात.
3)

भिक्खूच्या जीवनाचे चार महत्वाचे पैलू आहेत. प्रथम त्यांना जी चिवर दिली जातात त्यात त्यांनी समाधानी असायला हवे. त्यांनी स्वतःला खूप उच्च असल्याचे भासवू नये किंवा इतरांचा द्वेषही करू नये. साधी राहणी, साधे भोजन, आसक्तीविहिन दिनचर्या असावी. शरीर रक्षणापुरती आवश्यक तरतूद करण्याची
4)

त्याला मुभा असावी. अशी मानसिकता असलेला भिक्खू साधनेत त्वरित प्रगती करतो. निश्चितच असे सद्गुण असलेला भिक्खू साधारण उपासकासाठी बलप्रद आणि प्रेरणादायक ठरतो.
5).

सदर स्तूप हा अजिंठा लेणीतील आहे

#अजय_पवार ,जळगाव.

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling