#राजा_पसनजित_धम्मदिक्षा
भाद्रपद पौर्णिमा म्हणजे पोट्ठापाद मासो पुन्नमि
"ऐहिक संपत्ती ही अनित्य आणि नाशवंत आहे. तर धम्मरूपी धन शाश्वत आहे."
"आपली बरीवाईट कृत्ये नेहमी छायेप्रमाणे आपला पाठपुरावा करतात"
"सर्वात अधिक गरज करुणामय ह्रदयाची आहे."
1)
"आपल्या प्रजाला एकुलत्या एक मुलाप्रमाणे माना, त्यांच्यावर जुलूम करू नका, त्यांचा नाश करू नका, आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या ताबा ठेवा, कुमार्गाच्या विचारांचा त्याग करा व सन्मार्गने जा, दुसर्यानां पायदळी तुडवून स्वतः उच्चपदी चढू नका, दु:खिताला सुख द्या आणि त्याला
2)
आपला मित्र माना."
"राजशाही बडेजावस अधिक महत्व देऊ नका, किंवा तोंडपुजा करणार्यांची गोड शब्दात केलेली स्तुती ऐकू नका."
"तपश्चर्येने स्वतःला क्लेश करून घेण्यात काहीही लाभ नसते म्हणून धम्माचे चिंतन करा व सदाचारणाच्या नियमांचे महत्व ओळखा."
"सर्व शहाणे लोक शारीरिक सुखोपभोगांची
3)
उपेक्षा करतात, ते काम वासनांचा तिरस्कार करतात आणि पवित्र जीवनाचा अवलंब करतात"
"जिथे वासना असते तिथे सत्य राहू शकत नाही."
"ज्याला हे ज्ञान झाले आहे. त्यालाच प्रज्ञा प्राप्त होते, ही प्रज्ञा प्राप्त करून घेणे हा जीवनाचा एकमेव उद्देश आहे तिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवनाचे
4)
अपयशच होय."
"मन उदात्त करा आणि निश्चित ध्येयावर निष्ठा असू द्या. सद्वर्तनाच्या राजधर्माच्या नियमांचे उल्लंघन करू नका, आणि तुमचा आनंद बाह्य वस्तूंवर अवलंबून न ठेवता
5)
तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबून ठेवा. असे कराल तर कराल तर तुमची किर्ती चिरकाल टिकेल."
6)
#अजय_पवार ,जळगाव.
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
