@Jollyboy Profile picture

Sep 10, 2020, 5 tweets

ज्यांच्या विचारांच्या प्रकाशात
थोडंफार चालू शकतोय
त्या माझ्या दैवताचा एक महान विचार !!

श्रोता : बाबा, देव कसा आहे?
गाडगेबाबा :- जसं वारं.
वायु असे सकळ ठायी परि त्याचे बि-हाडची नाही ।
वारं आहे ना वारं पृथ्वीवर?
आहे!
घरात दारात झाडात जिकडे तिकडे वारं आहे.
1)

पण कोणी असं नाही सांगत की
रात्री वा-याचा मुक्काम बंबईच्या ठेसनावर होता.
सांगतं का कोणी?
श्रोते :- नाही
बाबा :- परवाच्या रोजी वारं साता-याच्या ठेसनावर होतं असं सांगत का कोणी?
श्रोते :- नाही
बाबा :- ते वारं लाल, हिरवं, पिवळं, काळं ते समजत नाही
तसा परमेश्वर आहे.
2)

अन् तीर्थात देव बसवले ना जगन्नाथ रामेश्वर
हे पोट भरण्याचे देव आहेत.
*
जञा में फञा बिठाया
तीरथ बनाया पाणी..
*
भटजी म्हणतो तांब्याभर पाण्याचे पंधरा रुपये..
दोन आणे चमचा तीर्थ घ्या तीर्थ
मग सांगा जञेत देव कशाचा आहे?
श्रोते :- दगडाचा
बाबा :- तीर्थाले जाणे देवाचा संबंध नाही
3)

पैशाचा नाश खाना खराब आहे.
गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला।
माणसाची सेवा करा बप्पाहो. एकवेळ पोटाले नाही मिळलं तरी चालेल पण पोरांना साळा शिकवा.
देवा दगड धोंड्याच्य नादी नका लागू.
आपला जवळपास घाणकचरा नको टाकू.
4)

परिसर चांगला ठेवा. हरामचं खाऊ नका. तानलेल्याला पाणी पाजा भूकेल्याला घास द्या बप्पाहो
तेच देव हाये त्याचा आशिर्वाद घे.
बोला गोपाला गोपाला देव की नंदन गोपाल
5)

#Akshay_Ubale

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling