*मराठा आरक्षणात देवेंद्र फडणवीस यांनीच केलेला घोळ उघड !!*
सुप्रीम कोर्टाने नुकतच मराठा आरक्षणाला स्थगिती दिली अन ते प्रकरण घटनापिठाकडे पाठवुन दिले. मग काय? भाजपचे महाराष्ट्रातील नेते व तथाकथित PAID MEDIA अन अंधभक्त यांचा माजुरा सुर एकच होता कि भाजप सरकारने मोठमोठ्या
1)
निष्णात वकीलांची फौज नेमुन मराठा आरक्षण हायकोर्टात मंजुर करून घेतले. आता सुप्रीम कोर्टात उद्धव सरकारला ते जमलं नाही. यातली खरी गम्मत सामान्य माणसाला कळतच नाहीऐ त्यामुळे सर्वांना फडणवीस म्हणतात ते खरच वाटतय. या फडणवीस नावाच्या नेत्याचा दुटप्पीपणा पहा मी तुमच्या समोर
2)
उघड करतोय.
आरक्षणाबाबतचा कोणताही निर्णय लोकसभा व राज्यसभेत मंजुर झाला व राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली कि तो कायदा बनतो व राज्यघटनेच्या परिशिष्ट ९ मध्ये या कायद्याचा समावेश करण्यात येतो. राज्यघटनेतील कलम ३१ ( क ) नुसार, अशा कायद्याला कोणालाही कोर्टात चॅलेंज करता येत नाही.
3)
हा झाला मुळ आराखडा. या प्रकरणात हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट हे फक्त सत्यनारायण पुजेप्रमाणे " ग्रंथ - वाचे " असतात. मुळ ढाचा बदलाला हात घालण्याचे अधिकार त्यांना नसतात.
भारतातील कोणत्याही राज्याला 50% पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही. १९९४ साली, तामिळनाडू सरकारने
4)
विधानसभेत १९% आरक्षण वाढवले. एकुण आरक्षण झाले ६९%. मग तामिळनाडू सरकारने तो विधानसभेत पास झालेला ठराव, केंद्र सरकार कडे पाठवला. तेथे पंतप्रधान होते पी. व्ही. नरसिंहराव. त्यांनी तो प्रस्ताव लोकसभा व राज्यसभेत पास करून घेतला अन राष्ट्रपतींकडुन मंजुरी मिळवली. या घटना बदलाचा
5)
समावेश राज्यघटना परिशिष्ट ९ मध्ये करण्यात आला. परिणामी त्या घटना बदलाला कायद्यासमोर चॅलेंजच करता येत नाही. आरक्षण द्यावं ते अस मजबुत आखणी करूनच. जेथे किंचितही लिकेज राहु नये.
फडणवीस नावाच्या डफडी सरकारने म्हणे हायकोर्टात मोठमोठ्या वकीलांची फौज उभी केली. आरक्षणाबाबत ज्या
6)
न्यायालयाचे अधिकार मर्यादित आहेत, तेथे आरक्षण टिकवुन काय मोठे दिवे लागणार होते? पण फडणवीस सरकारने लगेच स्वतःच्या अंगाला शेंदुर फासुन उदोउदो करून घेतला. आता पहा..... सुप्रीम कोर्टाला देखील या आरक्षणाला मंजुरी देण्याचे अधिकार नाहीत. मग फडणवीस यांच्या डफडी सरकारने कोणते आरक्षण
7)
दिले? कसे दिले? हे एकतरी कमळाबाईचा भक्त खरे सांगेल का?
*ही खेळी फडणवीस यांचीच*
*भाजपाच्या देवेंद्रांना माहित होतं कि, मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात जाऊन बारगळणार. आणि ते बारळगलेच पाहिजे त्यासाठी तत्त्कालीन भाजपा सरकारने फक्त मराठा मोर्चे बंद करून दिल्लीला लाईनीत लावले.
8)
आरक्षण बारगळवण्याची रितसर खेळी भाजपनेच केली अन तेच बोंब ठोकताहेत कि आम्ही आरक्षण दिलं होतं. मांजर हागलं कि कोणाला वास येऊ नये म्हणुन मांजर, स्वतःच्या त्या घाणीवर आजुबाजुची माती ओढुन घेतं. फडणवीस व त्यांची भाजपा टीम सध्या हेच करत आहेत.*
*फडणवीस यांनी 'हे 'करून दाखवावे*
9)
*आता हा आरक्षण घोळ घटनापिठापुढे सादर झालाय.... केंद्रात भाजपाचे सरकार असल्याने फडणवीसांनी आता दिल्लीत जाऊन त्यांच्या " सुल्तान व जिल्हेईलाही " मंडळींना सांगुन घटनेत बदल करून घ्यावा...... आरक्षण लोकसभा व राज्यसभेत मंजुर करून घ्यावे
10)
अन राष्ट्रपतींची मंजुरी मिळवुन तो कायदा करून, परिशिष्ट ९ मध्ये समाविष्ट करून दाखवावा अस झालच तर ४3% मराठा मते कायम त्यांच्या पदरात पडतील अन मुख्यमंत्री पदी ते कायम रहातील. त्यानंतर कधीही भाषणात " मी पुन्हा येईन " अस म्हणायची गरज फडणवीस व भाजपाला भासणार नाही.*
11)
*आजही म्हणे, अमावस्येच्या रात्री, वर्षा बंगल्यातील तळघरात रात्रभर आवाज घुमतो आहे... 😀मी पुन्हा येईन😀मीपुन्हा येईन😀*
*मराठ्यांनो सावध व्हा.. तुमची फसगत झालीय ,तुम्हाला भाजपा वाल्यांनी सहजपणे उल्लू बनवून फसविले आहे .
12)
मराठयांना आरक्षण मिळू नये यासाठी भाजप वाल्यांनीच खुंटी ठोकली आहे ,याचा बदला मराठे घेणार आहेत की नाही ?
13).
◆शब्दांकन :सतीश देवकर◆
नवी खडकी, येरवडा, पुणे*
#Chhaya_Thorat
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
