डेडपूल... Profile picture
उन्हातान्हात राहतो Cool, नाव माझं Deadpool. ॥ Social ॥ Pacifism ॥ Rational॥ #पांडुरंग #Volleyball #Wrestling #Tilling

Sep 14, 2020, 7 tweets

सध्या #StandWithUmarKhalid हा ट्रेंड सुरुय.. कोण आहे उमर खालिद याविषयी जुजबी माहिती.

◆उमर खालिद मूळचा महाराष्ट्रातील आहे. विदर्भातील अमरावतीमधील तालेगाव हे त्याचे मूळ गाव आहे.
◆तीस वर्षापूर्वी उमर खालिदचे वडिल दिल्लीत स्थायिक झाले. #म #धागा 👇

◆उमर खालिदचे वडिल सय्यद कासिम रसूल इलियास हे दिल्लीत ऊर्दू भाषेतील मॅगझीन 'अफकार-ए-मिल्ली' चालवतात.
◆उमर खालिद जेएनयूमधील स्कूल ऑफ सोशल सायन्स विभागात इतिहास विषयात पी. एचडी. करत होता.
◆त्याआधी उमरने जेएनयूमधून इतिहासात एमए आणि एमफिल केले आहे.👇

◆उमर खालिद जेएनयूमध्ये ज्या संघटनेशी जोडला आहे त्या डीएसयूबाबत सीपीआय माओवादी समर्थक विद्यार्थी संघटना मानली जाते. त्यामुळे उजव्या विचारसारणीचे लोक या संघटनेला कायमच विरोध करत आले आहेत. 

उमर खालिद देशद्रोही असल्याचं त्याचे विरोधक सांगतात.. त्याने देशविरोधी घोषणा दिल्याचे 👇

आरोपही त्याच्यावर केले गेले..

पण, उमर म्हणतो, होय माझे नाव जरूर उमर खालिद आहे पण मी दहशतवादी नाही. काही लोक माझ्या धर्माचा व नावाचा उल्लेख करून एका समुदायाला लक्ष करत आहेत.

◆ होय, आम्ही सर्वसामान्य, गरीब, शोषित, दलित यांच्याबाबत आवाज उठविला आहे व भविष्यातही उठवत राहू पण 👇

आम्ही देशविरोधी नाही व देशविरोधी कृत्यांना साथ देत नाही की त्यांचे समर्थन करत नाही.
◆खालिदचे म्हणणे आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या राज्यघटनेत जे जे म्हटले आहे त्याचबाबत बोलत आहोत, आवाज उठवत आहोत.👇

◆मूलभूत अधिकाराबाबत मग धर्मस्वातंत्र्य, असो की आहार, आचार, पोशाख ते विचार काहीही असो त्याचे संरक्षण आम्हाला घटनेने दिले आहे. मात्र, काही लोकांचा याला विरोध आहे. अशा प्रवृत्तींना आम्ही विरोध करतच राहणार. 👇

टीप- सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे..सदर माहिती माहितीजाल आणि वर्तमानपत्र यातून संकलित केली आहे.. समाजमाध्यमातून व्यक्त होण्याअगोदर जुजबी माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे. कोणाचीही दिशाभूल करण्याचा आमचा हेतू नाही. माहितीत चूक आढळल्यास ते आमचे अज्ञान समजावे.🙏

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling