Gaju_G. Profile picture
CITIZEN | नागरिक |

Sep 15, 2020, 13 tweets

#मराठी

सुदर्शन वृत्तवाहिनीच्या UPSC परिक्षा व मुस्लिम समाज यावरील कार्यक्रमासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात जस्टिस चंद्रचूड व जस्टीस जोसेफ यांच्या बेंचसमोर सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान न्यायालयाने विशिष्ट समाजाला टार्गेट करू पाहणाऱ्या या कार्यक्रमावर कठोर ताशेरे ओढले आहेत.

सुनावणी दरम्यान न्यायालयाने काही महत्वाची निरीक्षने-मते नोंदवली आहेत...

जस्टीस चंद्रचूड - मिडिया वर सेन्सॉरशिप लावणे हे अनुच्छेद 19(1)(a)च्या विरुद्ध असेल पन त्याचवेळी ह्युमन डिग्निटीचा विचार व्हायला हवा व काही स्टँडर्ड असायला हवेत.

जस्टीस जोसेफ - मिडिया हाऊसच्या मालकीसंदर्भात व त्यांच्या रीव्हेन्यू मॉडेल संदर्भात तसेच सरकारतर्फे मिडिया हाऊसेस ना दिल्या जाणाऱ्या जाहिरातींसंदर्भातील माहिती पब्लिक डोमेन मधे उपलब्ध असायला हवी

जस्टीस जोसेफ - मिडियाला अमेरिकन संविधायासारखे फ्रिडम नाहीये. अनेकवेळा मिडियातील चर्चांमधे विरोधी मत मांडले जात असताना आवाज बंद केला जातो. हे योग्य नाही.

जस्टीस चंद्रचूड - इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रिंट मिडिया इतकाच शक्तिशाली आहे पण त्यांचा प्रभाव खूप विस्तृत आहे. विशिष्ट समाजाला टार्गेट करून ते अशांततेच केंद्र बनू शकतात.

जस्टीस चंद्रचूड - सदर कार्यक्रम अंत्यत घातक(incidious) आहे. विशिष्ट समाजाचे नागरिक इतरांप्रमाणेच परीक्षा देतात व त्यात प्रक्रियतुन निवडले जातात. यामुळे UPSC परीक्षेची देखील नालस्ती होते. असे कार्यक्रम कसे चालू शकतात ?

जस्टीस जोसेफ - जेव्हा आपण वृत्तपत्र स्वातंत्र्यबद्दल बोलतो तेव्हा ते अमर्याद स्वातंत्र्य नाही. त्यांनाही सामान्य नागरिकांइतकेच स्वातंत्र्य आहे. आपल्याला अशा पत्रकारितेची गरज आहे जी प्रामाणिक आहे.

जस्टीस चंद्रचूड - जेव्हा पत्रकार काम करत असतात तेव्हा त्यांनी राईट टू फेअर कमेन्ट लक्षात घेऊन काम करावे. अनेक गुन्हेगारी प्रकरणे दाखवताना मिडिया फक्त एकच बाजू दाखवते.

जस्टीस जोसेफ - इलेक्ट्रॉनिक मिडिया जास्तीस जास्त TRPकडे बघितले जात आहे त्यामुळे सेन्शनॅलिझम वाढत आहे.

जस्टीस चंद्रचूड - UPSC मधे घुसण्यासाठी विशिष्ट धर्माचे लोकं षड्यंत्र करत आहेत आणि जामिया विद्यापिठाचे विद्यार्थी त्या षडयंत्राचे भाग आहेत असे बोलले जाते तेव्हा ते टॉलरेट केले जाऊ शकत नाही.

जस्टीस चंद्रचूड - देशाचे सर्वोच्च न्यायालय म्हणुन मुस्लिम UPSC मधे घुसण्याचे षडयंत्र करत असल्याचे सांगण्याची परवानगी आम्ही देऊ शकत नाही. असे करण्याचे अमर्याद स्वातंत्र्य मीडियाला आहे असे म्हणता येणार नाही.

जस्टीस चंद्रचूड - सदर कार्यक्रमाच्या रूपरेषेवरून असे दिसते कि कार्यक्रमाचा उद्देश मुस्लिम समाजास अपमानित करणे आणि त्यांना सिव्हिल सर्व्हिसेस मधे घुसखोरी करण्यास जबाबदार ठरवणे अश्या स्वरूपाचा आहे.

जस्टीस चंद्रचूड - लोकशाही समाजाची उभारणी आणि घटनात्मक हक्क व कर्तव्ये याचे पालन हे वेगवेगळ्या समुदायांच्या एकत्रित राहण्यावर अवलंबून आहे. विशिष्ट समाजाला अपमानीत करण्याच्या प्रयत्नांनकडे अयोग्यतेने पाहिले पाहिजे.

पुढील आदेशापर्यंत सदर कार्यक्रमाचे उर्वरित भाग प्रसारित करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे.

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling