#कांदानिर्यातबंदी
'या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?'
लोकमान्य आज हयात असते तर ज्वाजल्या डोळ्यांनी हा सवाल करते झाले असते.
यंदाच्या जून महिन्यात सरकारने कायद्यात बदल करून कांदा आणि बटाटा यांना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले होते.. #म #धागा 👇
का? तर शेतकऱ्यांना चार पैसे मिळवून देण्यात हा कायदा आडकाठी आणत होता.. त्यावेळी आम्हीच कसे शेतकऱ्यांचे कैवारी म्हणत ऐतिहासिक वगैरे पाऊल म्हणत सरकार आणि भक्तांनी कल्लोळ माजवला होता.. ते पाऊल जर ऐतिहासिक असेल तर आज कांदा निर्यातबंदी हे पाऊल मागास आणि त्यांच्या बुद्धीप्रमाणे 👇
बुरसटलेले म्हणावे लागेल.
2014 ला काँग्रेसने अशी निर्यातबंदी घातली तेंव्हा ते नालायक आहे असे आरोळी भाजप ठोकता झाला.. कानफाट्या नाव पडलेल्या काँग्रेसला ते नाकारताही आले नाही ही शोकांतिका आहे.
मुळात बाजारदरात कृत्रिम हस्तक्षेप करण्याची सरकारला गरज काय? 👇
ज्याला कांदा घ्यायला परवडत नाही त्याने तो खाऊ नये.. कांदा न खाल्ल्याने माणूस मरत नाही.. मध्यमवर्गीय ग्राहकांची एवढीच सरकारला काळजी असेल तर सरकारने कांदा चढ्या दरात खरेदी करून स्वस्त धान्य दुकानातून तो जनतेस उपलब्ध करून द्यावा.. 👇
शेतकऱ्यांना गाडून मध्यमवर्गीयांचे चोचले पुरवण्याचा दलाली धंदा आतातरी सरकारने बंद करावा.
वर सांगितल्याप्रमाणे जून महिन्यात कांदा नियंत्रणमुक्त करायचा आणि सप्टेंबर महिन्यात त्यावर बंदी घालायची यात सरकारच्या धोरणातील अज्ञानपणा तेवढा दिसतो.. कांदा हे पीक ज्यावेळी भरगोस उत्पादित 👇
होते तेंव्हा तो योग्य किमतीविना फेकून द्यायची वेळ शेतकऱ्यांवर येते..उत्पादन खर्च ही निघत नाही..तेंव्हा हे सरकार आणि ग्राहक त्याच्या मदतीला येतात काय?
याचं उत्तर नाही असं आहे कारण, राजकीयदृष्ट्या मध्यमवर्गीय हा एकगठ्ठा वोट बँक आहे तसे शेतकऱ्यांचे नाही.. 👇
सतरा शेतकरी संघटना अस्तित्वात आहेत पण त्यांचा आवाज एकतर दाबला जातो किंवा त्याचे नेते सत्तेच्या वळचणीला जाऊन उभे राहतात ही वस्तुस्थिती आहे.. शेतकरी मात्र आहे तिथेच मरणाच्या दारात उभा राहतो.
सध्या बिहारी लोक निवडणुकीस सामोरे जातायत.. त्यांच्यासाठी हा निर्णय घेतला हे उघड आहे.. 👇
वास्तविक यंदा एप्रिल ते जून या दिवसांत 20 कोटी डॉलर्स एवढी निर्यात झाली... गेल्यावर्षी ही निर्यात 44 कोटी डॉलर्स होती.. बाकी सगळ्या निर्यात आघाडीवर बोंबाबोंब असताना जे काही निर्यात होत असून चार पै परकीय चलन मिळत असताना.. हा पाय कुऱ्हाडीवर मारणारा निर्णय घेणाऱ्यांची बौद्धिक 👇
क्षमता आतातरी जनतेने ओळखायला हवी.
खोट्या घोषणा आणि लांगुलचालन करण्यात हातखंडा असलेले ही लोक शेतकऱ्यांचे उत्पन्न येत्या 2 वर्षात दुप्पट करतो म्हणाले होते.. त्यात किती सत्यता असेल हे विविध अर्थ आणि शेती तज्ञांनी त्यावेळीच दाखवून दिले होते.. 👇
आपल्या शेती जाणिवा बळीराजा, काळी आई, धनी या भावानेपर्यंतच आहेत त्या मोडून... वस्तुस्थितीचा अभ्यास आपण कधी करणार? हा प्रश्नच आहे.
भूक लागली की स्वयंपाक बनवायला घ्यायचा नसतो तो अगोदर तयार असावा लागतो.. नाहीतर कडाक्याची भूक मरून नंतर तयार केलेल्या अन्नावरची वासनाही उडून जाते..👇
आपलं तसं होण्याआधी आपण सावध होऊन योग्य ती काळजी घ्यायला हवी.🙏
संदर्भ - माहितीजाल, लोकसत्ता.
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
