डेडपूल... Profile picture
उन्हातान्हात राहतो Cool, नाव माझं Deadpool. ॥ Social ॥ Pacifism ॥ Rational॥ #पांडुरंग #Volleyball #Wrestling #Tilling

Sep 16, 2020, 5 tweets

जिओ और जिने दो..

जगासाठी यंदाचं वर्ष मृतकाय असेलही.. पण मुकेशसाठी नाही. कारण त्यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज ली. (RIL) ने मिळवलेली गुंतवणूक.
जानेवारी 2020 मध्ये सरकारी मालकीच्या 83 PSU चं मिळून मार्केट कॅपिटलायझेशन (m-cap) होतं ₹ 19.3 लाख कोटी . #म #धागा 👇

आणि अंबानींच्या RIL चं m-cap त्यावेळी होतं.. ₹ 9.6 लाख कोटी. कालच्या मंगळवारी सरकारी कंपन्यांचं मिळून भाग भांडवल होतं.. ₹ 15.16 लाख कोटी आणि RIL चं भाग भांडवल होतं..₹ 15.30 लाख कोटी. सरकारची सर्वात मोठी फर्म SBI चं m-cap आहे ₹1.79 लाख कोटी. 👇

गेल्या सहा एक महिन्यात RIL ने कशाप्रकारे गुंतवणूक मिळवली.. कंपनीची स्थिती स्टॉक मार्केट मध्ये कशी मजबूत होत गेली आपण पाहिलेलं आहे. जवळपास $ 33 बिलियन एवढा इक्विटी कॅपिटल उभं केलं गेलं..त्याने कंपनीचं एकूण कॅपिटल हे $207 बिलियन एवढं काल नोंदलं गेलं.👇

या सगळ्यात अंबानींची संपत्ती झालीय $88.4 बिलियन..जगातील सहावे श्रीमंत मानव आहेत ते.संपत्ती निर्मिती व्हायला हवी..पण तिचं एकात्मिकरण व्हायला नको..समान वाटप व्हायला हवं.. नाहीतर मग मक्तेदारी तयार होते. जो कोणी मक्ता घेईल त्याचंच सगळ्यांना ऐकावं लागतं..मग ते बरोबर असो की चूक.. 👇

एक म्हण आहे 'जिओ और जिने दो.' त्यातील 'जिओ' तर जनतेने फुकट होतं म्हणून आपलंसं केलं.. आता 'जिने दो' ला कसं भिडायचं एवढाच प्रश्न शिल्लक आहे.. येत्या काळात ते ही कळेल.❤

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling