@Jollyboy Profile picture

Sep 19, 2020, 9 tweets

पंजाब आणि हरियाणामध्ये शेतकऱ्यांची प्रचंड मोठी आंदोलने चालू आहेत. केंद्र सरकारमध्ये सामील असणाऱ्या शिरोमणी अकाली दलाने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी राजीनामा दिला आहे.

हे आंदोलन केंद्र सरकारने शेतमाल विक्री खुली करण्यासंदर्भात
1)

काढलेल्या अध्यादेशाविरुध्द चालू आहे. मुळात अध्यादेश कशासाठी? ज्या विधेयकावर सरकारला चर्चा नको असते त्यावर अध्यादेश काढून हुकूमशाही पद्धतीने त्याची अंमलबजावणी करणे हा या सरकारने पायंडा पाडला आहे.

नवीन नियमानुसार शेतीमालाच्या विक्रीवर बाजार समिती (मंडी) चे बंधन आणि नियमन
2)

असणार नाही. कोणत्याही जागेवर शेतमाल विक्री होऊ शकते. मंडीचा सेस, कमिशन इत्यादी द्यावे लागणार नाही. सर्वसाधारणपणे एक क्विंटल गहू, मक्यामागे किमान 150 रुपये ते 170 रुपये खर्च वाचणार आहे, जो शेतकऱ्याला किंवा त्याच्याकडून माल विकत घेणाऱ्याकडे शिल्लक उरेल.
3)

वर वर दिसता हे शेतकऱ्यांच्या फायद्याचं दिसतं. तशा पोस्ट आय टी सेल कडून येतीलच. आणि शेतीमधील शे* पण न कळणारे लोक त्यावर ज्ञान पण देतील.

खरी गोम अशी आहे की मंडीची तथाकथित एकाधिकारशाही मोडणे हा दिखावा आहे. क्विंटलमागे 150 रुपये फायदा हा शेतात जाऊन धान खरेदी करणारा बड्या
4)

उद्योगपतीचा होणार. (तोच तो मेरे बाप का सपना वाला...) सुरुवातीला या 150 रूपयातील 100 रुपये शेतकऱ्यांना देइल. पण एकदा का धान मंडी मधील इतर व्यापारी, सरकारी खरेदी यंत्रणा थंडावल्या की तो बडा व्यापारी म्हणेल त्या किंमतीला शेतकऱ्यांना त्यालाच धान विकावे लागेल.
5)

वर कोणतेही वाद झाले तर ते 'सामंजस्याने' सोडवण्यासाठी लवाद म्हणून एका बोर्ड ची स्थापना करण्यात येईल. त्या लवादाचा निर्णय (मांडवली) शेतकऱ्यांवर बंधनकारक असेल. त्यामुळे पुढे जर न्यायालयात जायची वेळ आली तर त्या खटल्याला काही अर्थ नसेल.

एका बड्या उद्योगपतीची मोनोपॉली तयार
6)

करण्याचं काम राजरोसपणे सुरू आहे. ज्यांना पटत नाही त्यांनी दहा वर्षांपूर्वी दूरसंचार क्षेत्रात किती मोबाईल कंपन्या होत्या, आता किती राहिल्यात आणि अजून दोन वर्षात किती असतील हा प्रश्न स्वतःलाच विचारा.

पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांना हे समजून चुकलंय. म्हणून नजिकचा फायदा न बघता
7)

भविष्याकडे पाहून ते मैदानात उतरले आहेत. बाजार समिती/ धान मंडीमधील व्यापारी त्यांना पाठिंबा देत आहेत. हे व्यापारी तर भाजपचे हक्काचे मतदार... तरीही त्यांचा नंबर लागलाच!

शेतकऱ्या जागा हो..

लवकरच हे लोण आपल्यापर्यंत पोहोचणार आहे.
8)

सब बिक जायेगा!
सबका नंबर आयेगा!! याचां मुख्य हेतू महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतक-यांची पत निर्माण करणा-या सहकारी संस्था उद्वस्त करणे हा आहे .....😡😡😡😡😡
9)

#Chhaya_Thorat

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling