अभिजीत शरयु विलास औताडे Profile picture
Entrepreneur - Lifestance Enterprises Deals High-tech Medical Equipment’s Urology, Orthopaedic, Gynaecology, Surgery & ENT

Sep 20, 2020, 8 tweets

छत्रपती शिवाजी महाराजांची व कवी भूषण यांची भेट रायगडावर झाली. ते कवी आहे हे महाराजांना समजले,त्यांनी म्हटलं, आपण कवी आहात? मला आपलं एखादं काव्य ऐकता येईल का?
कवी भुषणांनी म्हटलं हे राजन,
इंद जिमि जृंभपर। बाढब सअंबपर ।।
रावण सदंभपर। रघुकुलराज है ।।
पवन बारिबाहपर। संभू रतिनाहपर ।।

जो सहसबाहपर। रामद्विजराज है ।।
दावा दुमदंडपर। चीता मृग झंडपर ।।
भूषण वितुंडपर। जैसे मृगराज है ।।
तेज तम अंशपर। कन्नजिमि कंसपर ।।
जो म्लेंछ वंशपर। शेर शिवराज है ।।

#शेर_शिवराज_है।।

#मराठी_अर्थ:
इंद्र जसा जंभासुरावर,
जमीनीवरचे वादळ जसे आकाशावर,
रावणाच्या लंकेवर जसा रघुकुळाचा

राजा प्रभूरामचंद्र चालून गेले होते,
वारा जसा पाण्याने भरलेल्या ढगांवर,
शंकर जसा रतीचा पती मदनावर,
सहत्र क्षत्रियांवर जसा परशुराम चालून गेले होते,
आकाशातली विज जशी लाकडी बुंध्यावर,
चित्ता जसा हरणांच्या कळपावर,
सिंह(मृगराज) जसा हत्तीवर,
प्रकाशाचा किरण जसा अंधार कापतो,

कृष्ण जसा कंसावर,
तसेच शेर शिवराज म्लेंच्छ वंशावर चाल करून गेले आहेत.

#English_Translation:
Like lord Indra against the demons,
Like underwater volcanic fire over the ocean
Like lord Ram of the raghus clan against boastful ravana,
As strong wind scatters the clouds of rain

As lord Siva destroyed rati’s husband(kaamdev),
and Like parsurama destroyed sahastraarjuna -
Like fire which burns woods,
and a Cheetha on herd of deer ,
Like lion on hogs,
so says Bhushan.
Like a ray of light in darkness,
Like boy Krishna upon kansa,
So has descended king

Shivaji ,the Tiger.
upon the clan of mlecchas(barbarians)

कवी भुषणांचे हे अप्रतिम काव्य ऐकून महाराजांना आनंद झाला, त्यांनी या पाहुण्याचा आदर करून गडावर ठेवून घेतले. या काळात (म्हणजे सुमारे अडीच वर्ष) कवी भूषणांनी महाराजांच्या जीवनातील अनेक घटनांचा अन् विशेषत: युद्धप्रसंगांचा वेध

घेतला, हे निश्चित आणि त्यांनी महाराजांच्या जीवनावर काव्यरचना करावयास प्रारंभच केला.
शिवबावनी हा ग्रंथ त्याच पुस्तकातील एक भाग आहे असे समजतात. हिंदी साहित्यात चंद्रकृत पृथ्वीराज रासा या ग्रंथाच्या तोडीची मान्यता शिवराजभूषणास आहे.

#संदर्भ: श्री शिवबावनी, जेष्ठ इतिहास संशोधक आप्पा परब.

🚩🙏 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🙏🚩

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling