अभिजीत शरयु विलास औताडे Profile picture
Entrepreneur - Lifestance Enterprises Deals High-tech Medical Equipment’s Urology, Gynaecology, Surgery & ENT.
Sep 9, 2021 4 tweets 1 min read
सध्या एक नविन ऑनलाइन फ़्रॉड सुरु झालाय तरी कृपया सर्वांनी काळजी घ्यावी

तुम्ही २०१२/२०१३ मध्ये एक पॅालिसी काढली होती आणि तिचा प्रीमीयम १ वर्षच भरला आणि त्याची आता इतकी अमाऊंट झाली आहे पण ते पैसे काढण्यासाठी तुम्हाला दुसरया एका पॅालिसीचे २ वर्षाचे प्रीमीयम भरावे लागतील तरच ही पॉलिसी स्विच होईल आणि पुढे ४/५ महिन्यांनी तुम्हाला पुर्ण पैसे काढतां येतील असे सांगुन तुमच्या गळ्यात वार्षिक ६०/६५ हजार प्रीमीयम असलेली पॉलिसी १०/१२ वर्षासाठी गळ्यात मारली जात आहे. आणि अगदी पद्धतशीर वेल इंग्लिश आणि हिंदी स्पीकिंग असणारी एकदम सोफ़िस्टिकेटेड मॅनर असणारी टिम हे सगळे
Sep 30, 2020 4 tweets 1 min read
प्रश्न : तेहतीस कोटी देव कोणते ?

उत्तर : बहुतेक लोकांना 'तेहतीस कोटि' चा अर्थ 'तेहतीस करोड'
असाच वाटत असतो.पण येथे कोटि शब्दाची, 'टि' पहिली वेलांटी आहे.

मुळात संस्कृतमधील "कोटि" या शब्दाचा
अर्थ करोड नसून 'प्रकार' असा आहे.

खरे संशोधन असे केले गेले आहे की,
ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी ३३ प्रकारच्या देवांना कार्यभार सोपवले आहेत.

त्यांच्यात
८ वसू,
११ रूद्र,
१२ आदीत्य,
१ इंद्र
आणि १ प्रजापती
असे पाच स्तर आहेत.

प्रत्येकाचा कार्यभाग (खाते) भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगळी कोटि (कॅटेगरी) दिलेली आहे.

अष्टवसूंची नावे -
आप,धृव,सोम,धर,अनिल,
Sep 21, 2020 4 tweets 1 min read
पाऊस पिकू देईना,आणि आरक्षण शिकू देईना अशी गत आमची झाली असतांना सर्व पक्ष आरक्षणाला पाठिंबा देता आहे
सगळेच नेते म्हणतात आम्ही आरक्षणचे सोबत.सरकार म्हणत मागच्या सरकारनं आरक्षण अभ्यास करूनच दिलेलं नाहीये मागचं सरकार म्हणतंय याच सरकारला द्यायचं नाही.जाणकारांचे म्हणंणं आहे हे
न्यायालय ठरवील.न्यायालय म्हणत ते सरकारच्या हातांत.अरे बाबांनो नक्की चाललय तरी काय.आणि पाठिंबा ही त्यांचा हा वरील फोटो सारखा आहे. माझी आज्जी मला सांगायची लबाडच आवतन जेवल्यावर खरं.समाजाची चेष्टा करण्याचं काम ही व्यवस्था करतेय.बांधवांनो विचार करा हम लाखोंसे आये थे,हमने हजारो मोर्चे निकाले थे
Sep 20, 2020 8 tweets 3 min read
छत्रपती शिवाजी महाराजांची व कवी भूषण यांची भेट रायगडावर झाली. ते कवी आहे हे महाराजांना समजले,त्यांनी म्हटलं, आपण कवी आहात? मला आपलं एखादं काव्य ऐकता येईल का?
कवी भुषणांनी म्हटलं हे राजन,
इंद जिमि जृंभपर। बाढब सअंबपर ।।
रावण सदंभपर। रघुकुलराज है ।।
पवन बारिबाहपर। संभू रतिनाहपर ।। जो सहसबाहपर। रामद्विजराज है ।।
दावा दुमदंडपर। चीता मृग झंडपर ।।
भूषण वितुंडपर। जैसे मृगराज है ।।
तेज तम अंशपर। कन्नजिमि कंसपर ।।
जो म्लेंछ वंशपर। शेर शिवराज है ।।

#शेर_शिवराज_है।।

#मराठी_अर्थ:
इंद्र जसा जंभासुरावर,
जमीनीवरचे वादळ जसे आकाशावर,
रावणाच्या लंकेवर जसा रघुकुळाचा
Sep 17, 2020 7 tweets 2 min read
*शिंडलर्स लिस्ट मानव ते महात्मा प्रवास*

शिंडलर्स लिस्ट चित्रपटात एक जर्मन व्यावसायिक नाझी सैनिकांच्या मदतीने यहुदी लोकांना आपल्या कारखान्यात काम करायला ठेवून अफाट संपत्ती कमवतो. पण जसाजसा जर्मन नाझींचा अत्याचार वाढायला सुरू होतो त्याच संवेदनशील मन परिवर्तीत होत व तो आपली सर्व ImageImageImage संपत्ती जर्मन सैनिकांना लाच देऊन आपल्या कारखान्यातील 1100 लोकांचा जीव वाचवितो.जेंव्हा युद्ध संपत तेंव्हा शेवटी एक प्रसंग आहे शिंडलर आपल्या सहाय्यकाला जी भुमिका बेन किंग्जले यांनी केली आहे(गांधी चित्रपटात महात्मा गांधींची भुमिका केली आहे) म्हणतो की मी आणखी काही माणसे नाझींच्या
Sep 2, 2020 11 tweets 2 min read
*काकूंचा १८०० रुपयांचा समज आणि आपली झाकली मूठ सव्वा लाखाची*

काल परवा सगळीकडे व्हायरल झालेला काकू आणि त्यांचा १८०० चा हिशेब चा व्हिडिओ त्यावर बनलेले जोक्स पाहिले तर काकू वर हसणे सोपे आहे पण त्यापैकी ५०% लोकांनी स्वतःला आरश्यात पाहिले तर लक्षात येईल...आज जे काकू ना समजत नाही आहे ते आपल्याला समजते म्हणजे आपण शिक्षित आहे असा समज करून ट्रोल करणे सोपे आहे पण आपल्यातील ही ५०% लोक अजून आर्थिकदृष्ट्या अशिक्षित आहेत. ज्या पद्धतीने १८०० रुपये म्हणजे किती हे समजून घेताना किंवा समजून घेण्यात काकूंची तारांबळ उडते तशीच काहीशी परिस्थिती ५०-६०% लोकांची आहे ....

१.बचत
Aug 29, 2020 16 tweets 3 min read
*अश्रू*

आज शनिवारी दुपारीच बंड्याचा फोन आला...

_"उद्या येताय का सकाळी वृद्धाश्रमात भेट द्यायला ?

मी म्हटले, _"अरे उद्या फ्रेंडशिप डे. तुझे प्लॅन्स असतील मित्रांबरोबर..."_

_"ह्या..!! ते संध्याकाळी. आपण सकाळी जाऊन येऊ"_ बंड्याकडे उत्तर तयार असतेच.

_"ओके!!!"_ मीही तयार होतोच. नाहीतरी बरेच दिवस त्याचे ते वृद्धाश्रम बघायची इच्छा होतीच. संधी मिळतेय तर जाऊच.

सकाळी लवकर उठून बंड्याबरोबर निघालो. वाटेत बंड्याने चिवडा, मिठाई, पत्ते, असे बरेच काही घेतले. आत शिरताच बंड्याला पाहून तिथली मंडळी खुश झाली. _"हाय हिरो!!... हाय चिकण्या!!!"_ अश्या हाक सुरू झाल्या....
Aug 18, 2020 4 tweets 1 min read
बिस्कीट चा पुडा
भूख की दवाखाना 🤔

आठवडाभरात मदत मागण्यांसाठी येणाऱ्या कॉल ला एक दिवस ठरवून देतो या दिवशी येतोय असा निरोप देतो या आठवड्यात काल ९ गरजवंत कुटुंबांना अत्यावश्यक किराणा द्यायचा ठरवले होते पण काही अडचणीमुळे मला पोहचवता आला नाही रात्री सात वाजता एका ताईचा कॉल आला आणि म्हणाल्या साहेब आज येणार होतात काय झालं? मी बोललो ताई उद्या दुपारी येईल ताईंच्या आवाजात थोडासा कंप होता म्हणून त्यांना धीर देत बोलत केलं त्या ताईंनी सांगितलं काही नाही साहेब ६ वर्षाच पोरगं आहे त्याला दोन दिवस झालं ताप येतोय गोळ्या आणून दिल्यात त्याला काही खाऊ वाटत नाही बिस्कीट
Aug 9, 2020 4 tweets 1 min read
छत्रपती शिवाजी महाराज खरच समजले का हो तुम्हा आम्हाला ?
महाराजांचा हा अवमान नेहमी कश्यासाठी? तुमचे हे घाणेरडे राजकारण करण्यासाठीच नेहमी तुम्हाला महाराजांनाच का बरे मध्येच आणावं लागत किंबहुना तुम्ही ना ते जाणून बुजून आणता ? खरचं लायकी आहे का हो तुमची छत्रपतीं चे नाव घ्यायची ? का इतिहास विसरलात ? का स्वतः ला खूप मोठे समजत आहात? छत्रपती शिवराय ना लोकांच्या मनातून जातील ना तर डोक्यातून तुम्ही कितीही अवमान करा ओ महाराजांचा
पण इतकंच लक्षात ठेवा कि सोनेरी माणूस आहेत ते,सूर्यासारखे तेज आहे महाराजांच्या विचारांचे, त्यांच्या कार्याच अश्याने इतकंच होईल;
Aug 8, 2020 9 tweets 2 min read
चार चार गर्लफ्रेन्ड असणारा गुणी अभिनेता

दीड-दोन महिने होत आले. एक चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूत टी. व्ही.चा पडदा आणि वृत्तपत्रांचे रकाने भरण्यात यशस्वी झालाय. एकीशी प्रेम, दुसरीशी लफडं, आणि तिसरीशी बिझनेस. चौथी लिव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशिपमध्ये राहून त्याचं अकौंट झिरो करते. म्हणे गुणी कलावंत.हत्या की आत्महत्या यावर दोन महिने चर्वित-चर्वण चाललंय.
कुणाचाही जीव जाणं वाईटच. त्या सुशांतच्या आत्महत्येचं की कथित हत्येचं मी समर्थन करणार नाही. कारण प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो. पण सव्वाशे कोटींच्या देशात एक सुशांतच आत्महत्या करतो काय? 33000 शेतकर्‍यांनी
Aug 5, 2020 4 tweets 1 min read
खरं सांगायचं झालं तर... सन १९८७ साली
महाराष्ट्रातून पहिली चांदीची वीट राम मंदिरासाठी अयोध्येत गेली होती. एका शहरातून पहिली चांदीची वीट अयोध्या येथे पाठविण्यात आली होती. हे शहर मुंबई नसून ते ठाणे होते... धर्मवीरांचे ठाणे. एके काळचे ठाण्याचे शिवसेनाप्रमुख असणारे लाडके गुरुवर्य श्री Image धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ती पहिली चांदीची वीट पाठवली होती. कोणाच्याही ध्यानी मनी नसताना कोणतीही शोबाजी न करता दिघे साहेबांनी ती वीट बाबरी पाडण्याच्या ५ वर्ष आधी पाठवली होती. धर्मवीरांनी त्या जागी मंदिर व्हावे म्हणून पहिली चांदीची वीट बनवून घेतली होती. त्या विटेला साहेबांनी
Jul 14, 2020 6 tweets 1 min read
॥ VERY VERY IMPORTANT ॥

अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कोविड-१९ च्या रुग्णांसाठी महत्वाची इंजेक्शन मिळण्याऱ्या मुंबई महानगर प्रदेशातील दुकानांची यादी जाहीर

Remedesivir & TOCILIZUMAB

कोरोना बाधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईक यांच्यासाठी खालील ठिकाणी औषधे उपलब्ध आहेत. Remdesivir या इंजेक्शनसाठी डिस्ट्रीब्युटरचे संपर्क नंबर
(Hetero & Cipla Pharmaceuticals Company)

(१) हेटेरो हेल्थकेअर लि. अंधेरी (पूर्व)
०२२-२६८४९३४०
०२२-२६८४९३३७/८/९
८५५३९१०४१४
९३७३१७४२०३

(२) मानवी लाईफकेअर कांदीवली (पश्चिम)
९७६८२७५५२७
९८९२९७५४०४
Jul 12, 2020 10 tweets 2 min read
HIV चा पहिला पेशन्ट हा १९८१ मध्ये सापडला.मी तेव्हा इयत्ता ९ वी मध्येच
शिकत होतो तेव्हा, मुंबई मधे HIV चा पहीला पेशंट सापडला अशी बातमी चाळीस वर्षा पुर्वी वर्तमान पत्र व आकाशवाणी वरून रेडीओ सर्वत्र प्रसारीत झाली होती, सगळीकडे याची भीती इतकी भीती पसरली होती की शाळेत मित्र ही मित्रांच्या सोबत जेवनाचा डब्बा शेअर करत नव्हते , पण आज चाळीस वर्षा नंतर आपण काय बघतोय, तर HIV ग्रस्त लोकां सोबत समाजात खुशाल आपण वावरत आहोतच की, आणी ते लोक ही HIV सकट जगतच आहेत की. अजूनही HIV न होऊ देणारी कींवा तो पुर्ण बरा करनाली लस जगाने कुठेच मिळालेलीच नाही. सुरुवातीला HIV
Jul 8, 2020 5 tweets 1 min read
प्यादी ही मरण्यासाठीच का ?? 🤔

अनेक दिवसांपासून डोक्यात असलेला हा प्रश्न आहे की बुद्धिबळात दोन्ही ही
बाजूकडून प्यादीच पुढे का असतात ?
उभा-आडवा मारा करु शकणारे बलदंड हत्ती,कानाकोपऱ्यातून तिरप्या चालीने वेध घेऊ शकणारे काटक उंट,उलटसुलट अडीच घरां पल्याड जाऊन हल्ला चढवू शकणारी घोडी, सर्वशक्तिमान वजीर आणि महामहीम बादशहा एवढी सारी मातब्बर मंडळी मागच्या रांगेत आणि तोफेच्या तोंडी कोण तर स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व नसलेली किरकोळ देहयष्टीची एक-एक घर पुढे सरकणारी प्यादी ! हा म्हणजे झाडाने सावलीत बसण्यातला प्रकार झाला बरं इतर सर्व मोहरे प्रकरण अंगाशी आले तर मागे फिरु
Jun 30, 2020 6 tweets 1 min read
*मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै.*
अजून तरी किती महीने कोरोनाचा हा कहर चालेल माहित नाही. सुरूवातीला तर काही दिवस सहजतेने गेले आणि आता मात्र सर्व
संयमाचा बांध सुटला. एकमेकांना फोन करून उधार उसनवार दिलेले पैसे मागायला सुरूवात झाली, कोणी व्याज मागायला सुरुवात केली कोणी राहत्या घराची व व्यवसायाच्या जागेचे भाडे मागायला सुरुवात केली, इतके दिवस थांबलो, आता नाही थांबणार, असे फोन सुरू झाले पण कोणाच काहीच सुरू नाही, मग मित्रांनो तुम्ही ज्याला मागताय, तो देणार कोठून ? हा विचार आपण केलाय का ? तो जिथ जगतोय,तिथेच आपणही आहोत.जे संकट त्याच्यावर आहे तेच तुमच्यावर आहे. चूक
Jun 29, 2020 5 tweets 2 min read
सरकारने आपल्या कमाईचे सर्वच पर्याय खुले केलेत !
१. दारू विक्री सुरू
२. गुटखा विक्री सुरू
३. पेट्रोल पंप सुरू (तेही पूर्ण दर आकारून)
४. आरबीआयचे व्याज सुरू
५. ऑनलाइन मार्केट सुरू
६. टि.व्हि.चँनेल सुरू
७. सर्व विभागांचे कर लागू (भूमी कर, परवाना देयक इ.)
८. वीज देयक सुरू 🙁 जे कुठलाही कर देत नाहीत त्या गरीबांना सर्व काही मोफत.
१. काेरोना चाचणी मोफत
२. धान्य मोफत
३. मनरेगा लागू (नव्या दरांसह)
४. गॅस सिलिंडर मोफत
५. विनाकाम मजुरी लागू🙁

मध्यमवर्गीय सर्वच ठिकाणी दबतोय कारण तो याचसाठी जन्मलाय !

१. सरकारची देयकं अदा कर.
२. मुलांच्या शिक्षणाची फी भर.
Jun 25, 2020 6 tweets 1 min read
राजर्षी शाहू महाराज !!
हजारो राजे झाले, मात्र माणसातला राजा, राजातला माणूस हाच आणि असा सन्मान लाभणारा हाच राजा.

वारसा नेमका कशाचा असतो हे लख्खपणे समजलेला राजा.

जेव्हा महाराष्ट्रातल्या आदिवासी, डोंगराळ, दुर्गम, ग्रामीण भागातल्या शाळा ‘ परवडत नाहीत ‘ Image म्हणून नादान राज्यकर्ते बंद करायला
निघतात तेव्हा तब्बल शंभर वर्षापूर्वी
प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारा
कायदा मंजूर करून अंमलात आणणारा
हा राजा.

जेव्हा शिक्षण व्यवस्था भांडवली हातात देऊन बटिक करायला राज्यकर्ते आतुर झालेले आहेत तेव्हा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात
Jun 22, 2020 5 tweets 2 min read
@VarshaEGaikwad
मा.वर्षाताई गायकवाड,
शालेय शिक्षणमंञी,
महाराष्ट्र राज्य
द्वाराः सोशल मिडीया व ई-मेल मार्फत आपणांस निवेदन सादर करण्यात येत आहे.
विषयः शालेय विद्यार्थ्यांना घरपोच मोफत पुस्तक वाटप करण्याचे बाबत.
महोदया :
वरील विषयी आपल्या सेवेत असे निवेदन करण्यात येत आहे की,आज संपुर्ण भारत देशात व आपल्या महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले असल्यामुळे देश संकटात असून शिक्षण व शैक्षणिक अभ्यासक्रमाबाबत पालक,विद्यार्थी व शिक्षक संभ्रमात आहेत.तसेच ॲानलाईन शाळा जरी सुरु करण्यांत आल्या असल्या तरी प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्मार्ट फोन किंवा
Jun 20, 2020 4 tweets 2 min read
#टकमक_टोक - #राजधानी_दुर्गराज_रायगड🚩

रायगडवरील एक भितीदायक असे ठिकाण. जिथे मृत्युला देखील थरकाप वाटतो असा तो बेलाग टकमक टोक. गुन्हेगारांना टकमकीची शिक्षा सुनावत असे, शिक्षा ऐकुणच गुन्हेगारांचे अर्धमरण व्हायचे. टकमकाच्या भितीनेच लोक गुन्हा करण्यापासुन सावध असत. Image रायगडाच्या टकमकीचा धाक कोणाला नाही असा इतिहासात कोणीच नाही. ह्या टकमकी वरुन फक्त वारा आणि पाऊसच मनसोक्त संचार करु शकतात. थरकाप उडतो तो मानवाचा.

सह्याद्री आपल्या जीवनात योग्यतो समतोल राखुन आहे. म्हणजे ज्या प्रमाणे तो आपल्याला त्याच्या सौंदर्याचे मोहक रुप दाखवतो त्याचप्रमाणे तो
Jun 14, 2020 14 tweets 3 min read
आत्महत्या एक उपाय कि पळवाट 🤔
२० जानेवारी २०१७ माझ्या आयुष्यातला
एक काळा दिवस जो मी कधीच विसरु
शकत नाही. ज्या दिवशी मी नाशिकच्या
सोलर पॅनल चे उत्पादन काम करणारी १ कंपनी आणि त्यांचा डिस्ट्रिब्युटर ह्यांच्या त्रासाला कंटाळून कारण त्याच्या मागे असलेला राजकिय आणि पोलिसांचा
पाठिंबा ह्याला घाबरुन माझी व माझ्या बायकोची काहीही चुक नसतांना मी घेतलेला आत्महत्येचा निर्णय बायको तर आधिच घाबरुन मेंटल डिप्रेशन मध्ये गेली होती ज्याचेतुन तिला बाहेर पडायला आज पुर्ण अडीच वर्ष गेली. आज अडीच वर्षा नंतर ही ती मध्येच कधी ही बोलतांना किंवा काही करतांना पुर्ण ब्लँक होऊन जाते.
Jun 10, 2020 5 tweets 1 min read
कोरोना पेक्षा महाभयंकर असा कोरोनाच्या भीतीचा धंदा सुरु झाला आहे 🤔 एकदम पद्धतशीरपणे मोठे रॅकेट्स सक्रिय झालेले आहेत.एक चक्रव्यूह बनवून सर्व सामन्यांना
ओढून, एका क्षणात आयुष्यभराची कमाई
संपवत आहेत.कोणाकोणाचे हात आहेत हे
सांगणे कठीण आहे.हॉस्पिटल माफियांचे
पासुन,फ़्रॉड टेस्टिंग लॅब, लॉज,होटल्स इत्यादी अशा बरेच लोकांची चैन तयार झाली आहे. शाळा चालू झाल्या तर स्कूल माफिया सुद्धा त्यात ॲड होतील.
सरकारने अश्या प्रकारणांवर तरी वेळीच कारवाई करावी. ते नाही झाले तर त्या चेन मधे ते सुद्धा सहभागी आहेत हे जनतेचे मत बनायला वेळ नाही लागणार. ही चेन कशी काम करते ते पहाच...