डेडपूल... Profile picture
उन्हातान्हात राहतो Cool, नाव माझं Deadpool. ॥ Social ॥ Pacifism ॥ Rational॥ #पांडुरंग #Volleyball #Wrestling #Tilling

Sep 22, 2020, 5 tweets

हल्लीच्या सरकारचे अभिनंदन करावे असा योग्य क्वचितच येतो.. डॉक्टर, नर्सेससह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा देणारं विधेयक संसदेत संमत केलं त्याबद्दल संसदेचे धन्यवाद मानायला हवेत.
संसदेमध्ये साथरोग (सुधारणा) विधेयक, २०२० मंजूर झालं आहे. #म #धागा👇

यानुसार साथीच्या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षण देणारे नियम अधिक सक्षम आणि कठोर करण्यात आले आहेत.

नवीन बदलांमुळे आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना हानी पोहचवणे, जखमी करणे किंवा जिवाला धोका निर्माण करणाऱ्या तसेच👇

त्यांना कर्तव्य पार पाडण्यात अडथळा निर्माण करणाऱ्या,आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संपत्तीला, कागदपत्रांना नुकसान पोहचवणाऱ्यांना शिक्षा आणि दंड करण्याचा नियम बनवण्यात आला आहे.या अंतर्गत सर्वाधिक पाच लाखांपर्यंतचा दंड आणि सात वर्षांपर्यंतचा तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.👇

नुसत्या कायद्यांनी भारतीय जनता सुधारत नाही हे वास्तव आहे..पण त्या सुधारणेसाठी कायदेशीर मान्यता मिळाली 'हे ही नसे थोडके.'.. बाकी सगळ्याच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आपुलकी आणि प्रेमाची वागणूक द्या.. एक समाज म्हणून गरजेची गोष्ट आहे ती.❤

*योग

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling