कट्टरता..
ती जीवनात असो की खेळात त्यामुळे जी नामुष्की येते ती सध्या #CSK चे पंखे अनुभवत असणार.. खेळ कोणताही असो तो खेळणारे आणि त्यांचे चाहते यांच्या अंगी एक खिलाडूवृत्ती असावी लागते..तिचा अभाव असला की खेळ खेळणारे देव होतात आणि त्यांचे चाहते भक्त. #म #धागा 👇
वास्तविक कोणी कोणाचा भक्त व्हावं हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न.. पण माझ्यासाठी जो देव आहे तो इतरांसाठीही देवच असायला हवा ही कट्टरता आत्मघातकी असते.. CSK च्या भक्तांकडे बघून ती कट्टरता उतू जात असल्याची सल अखंड भारताने गेले दशकभर अनुभवली.👇
इतर संघांवर, त्यांच्या मालकांवर आणि खेळाडूंवर नको नको ते आरोप करताना आपला संघ दोनेक वर्ष या IPL नामक कुंभमेळ्यास का मुकला होता? हा नैतिक प्रश्न ते स्वतःस कधीही विचारताना दिसत नाहीत..कारण त्यांच्या नैतिकतेच्या व्याख्येत ते बसत नाही. 👇
2014 पासून राजकीय पटलावर एक भक्त संप्रदाय आणि समाजमाध्यम पटलावर IT सेल उदयास आली.. तत्पूर्वी त्यासम पंख्यानी जो उच्छाद घातला होता तो किती डोईजड होता तो शब्दात सांगता येणे कठीण.👇
खेळ आला की जय-पराजय आला त्यातून विजयाच्या उन्मादात वाहत जायचे नसते तसेच पराजय जिव्हारी लावून घ्यायचा नसतो हे साधे नैसर्गिक तत्व..त्यास तिलांजली दिल्यास जे होते तेच इथं घडते..ते म्हणजे खेळाचा मनमुरादपणे आनंद घेता येत नाही.. 👇
तो घ्यायचा असल्यास या पंख्यानी आतातरी शहाणे व्हावे..अन्यथा आज जे RR ने घडवलं ते उद्या अन्य कोणी घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही.. आणि सतत असं गर्वहरण करून घेत असताना एक प्रकारचे मानसिक मागासलेपण येत..👇
त्यापासून दूर राहायचं असेल तर विरोधी संघ आणि त्यांच्या चाहत्यांच्या ही भावना असतात..हे मुळात समजावून घेऊन वर्तन ठेवावे लागेल.. ते ठेवाल ही अपेक्षा..🙏
बुरा ना मानो होली है..! ❤
टीप- सर्वच संघांच्या चाहत्यांनी भक्त न होता खेळाचा निस्सीम आनंद लुटावा हा आहे मुख्य सांगावा.🙏
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
