डेडपूल... Profile picture
उन्हातान्हात राहतो Cool, नाव माझं Deadpool. ॥ Social ॥ Pacifism ॥ Rational॥ #पांडुरंग #Volleyball #Wrestling #Tilling

Sep 23, 2020, 7 tweets

हेदवी आणि वेळणेश्वर किनारा...

काही ठिकाणं अशी असतात.. तिथं गेलं की काळाच्या उदरात दाबून ठेवलेल्या आठवणींच्या जखमा ठसठसू लागतात. त्या जखमेवरील वाळत आलेली विसराळूपणाची खपली निघून जाते..मग वाहती जखम त्याच आठवणींच्या रक्ताने माखून जीव नकोसा करते. #म #धागा 👇

हेदवी आणि वेळणेश्वर किनारा.. अतीव सूंदर.. स्वच्छ..तुलनेने कमी गर्दीचा किनारा.. नजर टिकेपर्यंत खोलवर पहुडलेला अरबी. त्यावरून येणारी वाऱ्याची प्रत्येक शाखा नसानसात शिरून नसा टच्च फुगवून टाकते.👇

इथं जवळच गणेश मंदिर आहे.. भाविक मनोभावे प्रार्थना करताना पहाणे हा माझा आवडता छंद. तो अशा दूरवरच्या प्रार्थनास्थळी हमखास उफाळून येतो. नमस्कार करताना भक्तांच्या चेहऱ्यावरील निरागसता पिता यायला हवी. मनःशांती मिळते त्याने. मंदिराच्या सभा मंडपात बसून हे करायचं असतं.👇

एवढाली लोकसंख्या त्यांची एवढाली गाऱ्हाणी देवापर्यंत पोहचत असतील ना? पोहचत असतील... नाहीतर कोण कशाला एवढं तल्लीन होऊन आपलं सुखदुःख अनोळखी देवाला सांगत बसेल? असो👇

हे पेशवेकालीन गणेश मंदिर आहे.. दशभुजा लक्ष्मी गणपती मंदिर ही म्हणतात याला.. सगळ्या मंदिर परिसरात असतो तो फ्रेशनेस इथंही आमराई आणि निसर्गानं उधळला आहे.👇

या परिसरात असणारी लाल माती..तशी ती कोकणात सगळीकडं आहेच.. पण इथल्या मातीचा रंग जरा जास्तच खुलून दिसतो. त्याच लाल जांभा चिऱ्यांची घरं.. मनाचा ताण हलका करतात.👇

मी मागे सांगितलं त्याच पद्धतीने इथली लोकं खूपच मायाळू आहेत.. त्यांच्या अडचणी फार काही वेगळ्या नाहीत.. कोविड19 मुळे जे हाल बाहेर आहेत तेच इथंही आहेत.
आज शब्दांचा तुटवडा जाणवतो आहे..तूर्तास रजा घेतो. संधी मिळाली तर हा परिसर चुकवू नका.. या कोकण आपलाच आहे.❤

फोटो -गुगल

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling