@Jollyboy Profile picture

Sep 23, 2020, 9 tweets

*म्यानमारचे 'मंडाले' - एक बौद्ध संस्कृतीचे शहर* Mandalay in Myanmar - City of Buddhist Culture

म्यानमार देशातील एक नंबरचे शहर म्हणजे यंगून (म्हणजेच रंगून) आणि दोन नंबरचे शहर मंडाले असून ते इरावती नदीच्या किनारी वसलेले आहे. इ.स.सन १८५७-५९ मध्ये मिनदोन राज्याच्या
1)

राजवटीत हे शहर स्थापित झाले. दुसऱ्या महायुद्धात या शहराची अपरिमित हानी झाली. पण फिनिक्स पक्षा प्रमाणे हे शहर पुन्हा भरभराटीस आले. बर्माचे हे सांस्कृतिक आणि बुद्धीझमचे मोठे धार्मिक केंद्र आहे. येथे बौद्धांचे प्राबल्य जास्त आहे. त्यामुळे असंख्य मॉनेस्ट्रीज आणि
2)

सातशेच्यावर पॅगोडे येथे आहेत. जगातील सर्वात जास्त बौद्ध भिक्खू असलेले हे शहर आहे.

इथे मंडाले डोंगर असून त्यावरून या शहराला मंडाले नाव पडले असावे. या मंडाले टेकडीवरून संपूर्ण शहराचा मोठा नयनरम्य देखावा दिसतो. इथे टेकडीवरच मोठा पॅगोडा आहे. इथली बुद्धमूर्ती अतिशय
3)

सुंदर आहे. मंडाले हिलच्या पायथ्यापाशी कुथोडाव पॅगोडा आहे. ५ वी धम्म संगिती इथे मिनदोन राजाच्या कालकिर्दीत सन. १८७१मध्ये भरली. तेव्हा संपूर्ण त्रिपिटक येथे ७२९ मार्बल प्लेटवर कोरण्यात आले आहे. व त्यासाठी ७२९ विहारे त्याच्या सुरक्षिततेसाठी बांधण्यात आली आहेत. त्रिपिटकाचे जगातील
4)

एकमेव असे हे दगडी पुस्तक आहे. जगातून असंख्य पर्यटक हे खास बघण्यासाठी येथे येतात.

इथला महामुनी पॅगोडा तर मंडाले शहरातील प्रसिद्ध पॅगोडा आहे. येथील पंचधातूची बुद्धमूर्ती आसनस्थ असून ३.७ मीटर उंच आहे. इथे दररोज दर्शनासाठी व मूर्तीला सोनेरी वर्ख लावण्यासाठी अनेक दूरवरून भाविक
5)

येतात. मंडाले शहरातील हा मोठा प्रतिष्ठित पॅगोडा आहे. मंडाले शहराला लागूनच इरावती नदी वाहते. तिच्या पात्रातून बोटीने जाऊन मिंगुन पॅगोडा व मिंगुन बेल पाहता येते. पाकिस्तान मधील पेशावर येथील कनिष्क स्तुपात सापडलेले बुद्धधातू येथेच उ बा खंती मॉनेस्ट्रीत सुरक्षित आहेत.
6)

श्वेनानडॉ मॉनेस्ट्री आणि १.२ कि. मी. लांबीचा लाकडी ब्रिज येथेच आहे. तसेच 'आतुमाशी' ही सर्वात मोठी मॉनेस्ट्री येथे आहे.

थोडक्यात म्यानमारचे मंडाले शहर बौद्ध संस्कृतीने ओतप्रोत भरलेले आहे. भारताच्या स्वातंत्र्य पूर्व काळात बाळ गंगाधर टिळक यांना मंडालेमध्येच
7)

ब्रिटिशांनी सन १९०८ ते १९१४ या काळात तुरुंगात ठेवले होते. जर त्यांनी तेथील बौद्ध संस्कृती पाहिली असती आणि अभ्यासली असतीतर बौद्ध संस्कृतीचा मोठा ग्रंथ लिहिला असता असे वाटते. भारतात देखील 'मंडाले' नावाची काही गावे
8)

असावीत. मुंबईत मानखुर्द ट्रॉम्बे जवळ 'मंडाले' नावाचे गाव आहे. एकेकाळी गर्द हिरव्यागार झाडीत वसलेले हे गाव आता अणुशक्ती नगर मधील काँक्रीटच्या जंगलात हरविले आहे.
10).

--- #संजय_सावंत ,( नवी मुंबई )

⚛⚛⚛

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling