आज #Instagram वर एक पोस्ट बघितलं. त्यात जे काही लिहीलेलं ते वाचून मला अश्रु अनावर झाले नाहीत.
छत्रपती शंभूराजेंचे शेवटचे काही शब्द:
"आबासाहेब, तुम्ही आभाळाच्या डोळ्यांनी पाहात असाल मला, पण मला तुमचे आभाळाएवढं रुप पाहायला डोळेच राहिले नाहीत हो...
(१/४)
...आग्र्याहुन येताना तुमचा हात विश्वासाने हातात घेऊन म्हणालो होतो, "आमची फिकीर करु नका आबासाहेब, आम्ही सुखरुप गडावर पोहोचु".
तसा तुम्हीही माझा विश्वासाने हात हाती घ्याल का आबासाहेब? पण ते हातही उरले नाहीत आता. अन् तुम्हाला "आबासाहेब, अशी साद घालायला जीभही उरली नाही हो...
(२/४)
...पण एक सांगतो आबासाहेब, रक्ताचा अभिषेक घालूनच स्वराज्याचं मंदीर पवित्र होणार असेल, आणि शिवपूत्र म्हणून अशीच मृत्युशी ओळख होणार असेल, तर मी रायगडीच्या जगदीश्वराला एकच मागणं मागेन, हजारवेळा जन्म दे, पण शिवपूत्र म्हणूनच दे...
(३/४)
...जगायचं कसं हे तुम्ही जगाला शिकवलत आणि मरायच कसं हे मी शिकवेन.
- रणधुरंदर छत्रपती संभाजी महाराज
"सकल शास्त्र पंडित, ज्ञानकोविंद, सर्जा, रणधुरंदर, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज, धर्मवीर श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराज की जय"
🚩जय रौद्र शंभो 🚩
(४/४)
@TheRSS_Piyussh @MatruBhakt @thatPunekar @RakyaDadoos_ @PunekarVoice @mi_puneri @Vedashree_19 @marathi_mulgi__ @Ok_Bharatiya @imMvyas @The_NitinD @pratik_shinde18 @RajeGhatge_M @BatmanTweets4U @rajrajsi
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
