हातरस येथील घटना गंभीर आणि दुर्मिळ असली तरीही या घटनेवरून केवळ योगी,यूपी,बीजेपी यांना पाहून आगपाखड आणि विरोध करणाऱ्यांनी ध्यानात घ्या..
थोर संतांचा वारसा लाभलेल्या याच पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात विहिरीत पोहायला गेले म्हणून खालच्या जातीतल्या
मुलांना नागडं करून ढुंगणावर बसवलं होतं तापलेल्या फरशीवर, मजुरी वाढवून मागितली म्हणून आईशी संभोग कर किंवा विष्ठा खा हे प्रकरण सुद्धा इथंच घडलंय..
नितीन आगे या विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणात रयत शिक्षण संस्थेतील शिक्षकांनीं जबानी फिरवली,
याच पुरोगामी महाराष्ट्रात खैरलांजीत निर्दोष सुटणाऱ्यांची मिरवणूक काढली, प्रियांका,सुरेखा या भगिनींवर बलात्कार होताना किमान अडवण्याची आणि त्यांची अब्रू झाकण्यासाठी कपडा टाकण्याची हिंमत कुणा महिलेत झाली नाही,
कोवळ्या स्वप्नील सोनवणे ला जीवानिशी मारहाण करताना कुणी आडवं आलं नाही, ना दंगलीशी ना द्वेषपुर्ण लिखाणाशी संबंध तरीही मोहसीन नावाच्या निष्पापाचा खून झाला, रमाबाई नगरातील निरपराध असणाऱ्यांवर गोळीबार करूनही मोकाट असलेला मनोहर कदम आणि
त्याला पाठीशी घालणारे राजकारणी ही याच महाराष्ट्राच्या मातीतले..
नालासोपारा इथं दारूगोळा सापडला तरिही आरोपीच्या समर्थनार्थ मोर्चा काढणारे याच महाराष्ट्रातले..
भीमा कोरेगावस्मारकाला वंदन करायला जाणाऱ्या निरपराध लहान लेकरं, महिला आणि वृद्धांवर त्यांच्या गाडीवर दगडफेक करणारे,
त्यांनी उपाशी रहावं, पाणी ही मिळू नये म्हणून बंद पाळणारे ही याच महाराष्ट्राच्या मातीतले....
आणि अगदी नुकताच प्रेमप्रकरणापायी जातीयतेचा बळी ठरलेला विराज जगताप ही याच महाराष्ट्राच्या मातीतला..
सगळं लिहण्याचं कारण एवढंच की सिलेक्टिव्ह भूमिकेत नसावं माणसानं..🖋️नितेश शेलार
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
