रिंकू ✨✨ Profile picture
Tension Lene Ka Nahi, Dene ka!!

Sep 30, 2020, 13 tweets

#Armenia #ArmeniaVSAzerbaijan
अझरबैजान आणि आर्मेनिया या दोन देशांमध्ये सध्या युद्ध पेटलय, आपल्यापैकी अनेकांसाठी हे देश अपरिचित असतील परंतु सध्या जगाच्या नकाशावर कुठल्याही देशांमध्ये युद्धाची ठिणगी पडली तरी इतर देशांसाठी ती चिंतेची बाब आहे. 
+

या युध्दाचं कारण ह्या दोन देशांमधला सीमा विवाद हे असून ह्याला मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मियांमधील तेढही कारणीभूत ठरली आहे. अझरबैजान हे मुस्लिम बहुल राष्ट्र आहे तर आर्मेनिया हे ख्रिश्चन बहुल राष्ट्र आहे. 
+

मुख्य विवाद अनेक वर्ष जुना नागार्नो- काराबाख प्रदेश असून हा ख्रिश्चन बहुल प्रदेश असून अझरबैजानच्या सीमेत येतो त्यांना आर्मेनियामध्ये विलीन व्हायचं आहे जे अझरबैजान देशाला मान्य नाही.
नागार्नो-काराबाख प्रदेश एकेकाळी ओटोमन, रशिअन आणि पर्शिअन साम्राज्याचा मध्यबिंदू होता.
+

१९२१ साली हे दोन्ही देश सोव्हिएत रिपब्लिक होते आणि नागार्नो-काराबाख प्रदेश स्वायत्त ठेवण्यात आला होता.१९८० सालापासून सोव्हिएत सत्तेला उतरती कळा लागली,१९८८ साली तेथील संसदेत नागार्नो-काराबाखची स्वायत्तता संपुष्टात आणून प्रदेश आर्मेनियात विलीन करायच्या प्रस्तावाला बहुमत मिळाले +

परंतु अझरबैजान देशाने ह्या मागणीच दमन करायचं ठरवलं आणि तिथे पहिल्या युद्धाची सुरुवात झाली जे १९९४ पर्यंत चाललं त्यानंतर तिथे संघर्ष विराम (ceasefire) घेण्यात आला आजतागायत शांततेच्या प्रस्तावावर दोन्ही बाजुंकडून स्वाक्षरी करण्यात आलेली नाही.
+

अझरबैजानसाठी नागार्नो प्रदेश मोक्याचं ठिकाण असून ह्याभागाजवळून त्यांच्या महत्त्वाच्या अश्या natural gas आणि तेल ह्यांच्या पाइपलाइन तुर्की आणि युरोपात जातात.
 त्यामुळे ते ह्या भागाचा कब्जा सोडायला तयार नाहीत.
+

काही महिन्यांपासून ह्या प्रदेशात अस्थिरता होती, जुलै मध्ये १६ सैनिक ठार झाले त्यानंतर परिस्थिती चिघळली आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर ceasefire violation चे आरोप करायला सुरुवात केली. 
+

भरीस भर हयात आता तुर्की आणि पाकिस्तान अझरबैजान च्या बाजूने युध्दात उतरले आहेत. तुर्की आणि अझरबैजान अनेक दशकांपासून मित्र देश आहेत. त्यांच्यात प्राचीन ऐतहासिक संबंध असून, अझरबैजानी लोक हे टर्किश संस्कृतीची उपशाखा समजली जाते. 
+

याविरुद्ध तुर्की आणि अर्मेनिया ह्यांच्यात शेजारी असूनही  कुठलेही द्विपक्षीय संबंध नाहीत, ह्याचं एक कारण १९१५ साली जवळपास १.५ मिलियन लोकांना ओटोमन संप्रदायाच्या लोकांनी ठार मारलं त्यात आर्मेनियाला पाठिंबा दिला नव्हता.
+

पाकिस्तानचा पाठिंबा काही कारणांसाठी असू शकतो जसे की मुस्लिम राष्ट्रांच नेतृत्व करणे, खलिफा आपल्याच देशाचा असावा ही महत्त्वाकांक्षा बाळगणे, भविष्यात भारत विरोधात गरज पडली तर त्यासाठी मुस्लिम देशांची मोट ह्यानिमित्ताने बांधणे इ. इ
+

तर आर्मेनियाच्या बाजूने रशिया, इराण हे देश आहेत. इराण बाहेरून पाठिंबा देत असून त्यांना शस्त्र पुरवत आहे. इथे महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, इराण हे मुस्लिम बहुल देश असूनही आर्मेनियाला पाठिंबा देत आहे. ह्याचं कारण इराण आणि अझरबैजान ह्यांच्यात असलेले अनेक विवाद 
+

सगळ्यात मोठा विवाद दक्षिण अझरबैजानशी संबंधित असून तो इराणचाच भाग आहे त्यांना इराण पासून स्वतंत्र होऊन उत्तर अझरबैजान(आताचा अझरबैजान देश)त्यांच्यात विलीन व्हायचं आहे ह्या विभाजनाला अर्थातच इराण संमती देत नाही,अश्या तऱ्हेने दोन्ही देश शीआ मुस्लिम बहुल असूनही एकमेकांचे मित्र नाहीत.+

तूर्तास पश्चिम आशियात वेगाने घडणाऱ्या ह्या घडामोडींकडे सगळ्या जगाचं लक्ष वेधलं गेलं आहे आणि आता इथे काय घडतं ह्यावर नजीकच्या भविष्यातील अनेक गोष्टी अवलंबून असतील.
+

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling