aditya chavan ▪︎▪︎nxsus▪︎▪︎ Profile picture
crypto Investor,Entrepreneur 🐳 Cyber Enthusiast,IMPEX,Forex,Commodity Trader,Polyglot! (Fully Unvacd😎)

Apr 11, 2021, 10 tweets

#टीका_नही_चूना_लगा
स्वतंत्र भारताचे १ले पंतप्रधान दिवंगत पं. जवाहरलाल नेहरु यांचे पिताश्री दिवंगत मोतीलाल नेहरु ब्रिटीश राजवटीतील १ मातब्बर वकील प्रस्थ होते.ब्रिटीशांनी संस्थाने खालसा करण्यासाठी ‘दत्तक वारस नामंजूर’असा कायदा केला.या कायद्याचे प्रचंड ज्ञान मोतीलाल नेहरु यांना होते

सबब मोतीलाल नेहरुंच्या कायद्यावरील पकडीमुळे त्यांचे मानधन वाढत गेले व मोतीलाल नेहरु त्याकाळात एक गर्भश्रीमंत प्रस्थ बनले.तरीदेखील मोतीलाल नेहरुंनी स्वातंत्र्यलढा जिवंत ठेवण्यासाठी आपली संपत्ती गांधीजींच्या सल्ल्याने काँग्रेसला दान केली.नेहरुंनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान

बनू शकले त्यामागे देखील नेहरु कुटुंबाचा देशकार्यासाठीचा त्याग विचारात घेतला गेला होता.पिताश्रींचा वारसा चालवणाऱ्या चाचा नेहरुंनी १९४७ नंतर आपल्या २०० कोटी संपत्ती पैकी १९६ कोटी रुपयांची संपत्ती देशासाठी दान केली.त्यावेळेस शुद्ध तोळे सोने ८८ रुपये प्रतितोळा दराने विक्री केली होती.

नेहरुंचा वारसा पुढे चालवणाऱ्या दिवंगत इंदिराजींनी आजोबा मोतीलाल नेहरु यांनी १९३० मध्ये खरेदी केलेली आनंद भवन नावाची वास्तू १९७० मध्ये देशाच्या नावे केली.यासोबतच दुसऱ्या महायुद्धानंतर नेहरुंनी अमेरीका किंवा सोव्हिएत युनियन यांच्या गटात सामील न होता स्विकारलेला अलिप्ततावाद भारताला

आंतरराष्ट्रीय राजकारणात विश्वगुरु बनवून गेला. एका देशाच्या प्रमुखाकडे हवी असलेली शालीनता, सभ्यता,नैतिकता,विद्वत्ता व बुद्धीप्रामाण्यवाद नेहरुंकडे होता.भारताचे सार्वजनिक आरोग्य, विविध रोगांवरील लसीकरण आदी गोष्टींचा पाया नेहरुंनी घातला.अगदी कोरोना महामारीच्या भयंकर कालखंडातसुद्धा

नेहरुंच्या काळात उभारलेली NIV संस्था उपयुक्त ठरली.नेहरुंनी रचलेल्या पायावर भारताचे निर्माण करत असताना नेहरु ते डॉ.मनमोहन सिंग या काँग्रेसी राजवटीच्या ६० वर्षांत भारताने प्रचंड प्रगती केली आहे.देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या ८०-८५ टक्के इतकी होती

३५ कोटी लोकसंख्येचा देश आज १३५ कोटी लोकसंख्या ओलांडून गेला असताना दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या २५-३० टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे इप्सित साध्य झाले होते.गेल्या ६ वर्षांतील नोटबंदी,जीएसटी,लॉकडाऊन आदी कारणांमुळे दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या वाढली आहे.

पण वाढलेला आकडा नेमका किती?या प्रश्नाचे उत्तर निती आयोग २ वर्षे झाली देत नाहीये.ज्या देशात पोलाद बनत नव्हते,चांगल्या दर्जाची सुई बनत नव्हती तो देश आज कोरोना सारख्या घातक संसर्गजन्य रोगांवर लस बनवून निर्यात करतोय हे चाचा नेहरु ते डॉ.मनमोहन सिंग या काँग्रेसी राज्यकर्त्यांचे

निर्विवाद यश आहे.विचार करा,यापैकी एकाही राज्यकर्त्यांने कधीही कोणत्या रोगावरच्या लसीकरणासाठी ईव्हेंट केला असता तर?तर,त्यांना मूर्ख ठरवण्यात आले असते.वर्षभरात सुमारे १,६८,४६७ देशवासी कोरोनाने आपला जीव गमावलेले असताना,आजही पुरशी हॉस्पीटल्स,पुरेसे बेडस्,व्हेंटीलेटर्स,रुग्णवाहीका

उपलब्ध नसताना जर कोणी लसीकरणाचा उत्सव साजरा करणार असेल,तर त्याला भारताचा वैभवशाली इतिहास अव्वल दर्जाचा कोडगा व मूर्खच ठरवेल.खरे मूर्ख तर ते मतदार आहेत,जे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात,देश ऊभारणीत शून्य योगदान असलेल्या संघटनेकडून विकासाची अपेक्षा करत होते.
#टिका_उत्सव #टीका_नही_चूना

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling