ट्विटर|मराठी Profile picture
📢चालू घडामोडी| ⌛ ऐतिहासिक माहिती| 📝माहितीपूर्ण थ्रेड्स| 🎓 नोकरी विषेयक Updates| 🗃️सर्वसमावेशक पोस्ट्स चा संग्रह| 👨‍💻 #मराठीनोकरी #म #मराठी #Thredकर✒️

Apr 14, 2021, 9 tweets

𝔸𝕒𝕕𝕙𝕒𝕒𝕣 ℂ𝕒𝕣𝕕 हरवलंय किंवा चोरी झालंय?; टेन्शन घेऊ नका, असं करा मोबाईल क्रमांकाशिवाय रिप्रिंट👇
#म #मराठी #मराठीट्विट #Thredकर
(1/9)

आजच्या काळात आधार कार्ड हे एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज बनलं आहे आणि ते मुलांसाठी किंवा तरुण असो किंवा वृद्ध, सर्वांसाठीच सरकारी आणि खासगी संस्थांच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार आवश्यक करण्यात आलं आहे.
@MarathiMavala @SutarSp
(2/9)

परंतु जर तुमचं आधार कार्ड चोरी झालं किंवा हरवलं तर तुम्हाला अनेक सुविधांचा लाभ घेणं कठीण होऊ शकतं.अशा परिस्थितीत आपण आधार कार्ड पुन्हा प्रिंट करू शकता. यासाठी तुम्हाला यापुढे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाचीही गरज भासणार नाही.
@Me_Saleel @Ams_NavThar @Phanase_Patil
(3/9)

कारण आधार कार्ड तयार करणारी संस्था यूआयडीएआयने आता ही प्रक्रिया सुकर केली आहे. नोंदणीकृत मोबाइल क्रमांक न देता तुम्ही आधार रिप्रिंट करू शकता.आधार रिप्रिंट करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम uidai.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल.
@abhiautade @Coolkiranj
(4/9)

त्या ठिकाणी तुम्हाला My Aadhaar हा टॅब दिसेल.त्यावर क्लिक केल्यानंतर Order Aadhaar PVC Card असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर नव कार्ड ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल यानंतर तुम्हाला तिथे मोबाईल क्रमांक रजिस्टर नाही असा एक कॉलम दिसेल
(5/9)

त्यावर लक्षपूर्वक क्लिक करावं लागेल.त्यानंतर तुम्हाला अल्टरनेट नंबर टाकावा लागेल. त्यावर एक ओटीपीही तुम्हाला प्राप्त होईल.ओटीपी टाकल्यानंतर तुमचं आधार कार्ड रिप्रिंट होईल. तुम्ही पोस्टाद्वारेही आधार कार्ड घरी मागवू शकता. यासाठी तुमच्याकडून ५० रूपये शुल्क आकारलं जाईल.
(6/9)

दरम्यान, तुम्हाला आधार कार्ड ऑनलाइन डाऊनलोड करायचं असेल तर तुम्हाला ते फेस ऑथेंटिकेशननंदेखील डाऊनलोड करता येईल.
@CovidWarriorM5 @PatilEkMaratha
(7/9)

परंतु यासाठी तुमच्याकडे नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असणं आवश्यक आहे.होमपेजवर Get Aadhaar Card हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर त्या ठिकाणी Face Authentication हा पर्याय दिसेल.Face Authentication निवडण्यापूर्वी आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि कॅप्चा भरावा लागेल.
(8/9)

तुम्हाला ऑथेंटिकेशन प्रक्रियेद्वारे चेहरा वेरिफाय करावा लागेल.यानंतर ओकेवर क्लिक करा,हे करताच कॅमेरा सुरू होईल.आपला संपूर्ण चेहरा एका चौकटीत येईल अशाप्रकारे आपल्याला कॅमेरासमोर बसावे लागेल आणि ही प्रक्रिया येथेच संपेल.त्यानंतर तुम्ही आधार कार्ड डाऊनलोड करू शकता.
(9/9)

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling