ट्विटर|मराठी Profile picture
📢चालू घडामोडी| ⌛ ऐतिहासिक माहिती| 📝माहितीपूर्ण थ्रेड्स| 🎓 नोकरी विषेयक Updates| 🗃️सर्वसमावेशक पोस्ट्स चा संग्रह| 👨‍💻 #मराठीनोकरी #म #मराठी #Thredकर✒️

Apr 16, 2021, 11 tweets

ℝ𝕒𝕥𝕚𝕠𝕟 ℂ𝕒𝕣𝕕 धारकांसाठी गुड न्यूज! आता घरबसल्या मिळणार धान्य; कसं? पाहा, डिटेल्स👇
#म #मराठी #मराठीट्विट #Thredकर✒️
(1/11)

देशातील कोरोना स्थिती गंभीर झाली असताना महाराष्ट्रात १५ दिवसांसाठी कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.कोरोना नियंत्रणासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे बाहेर जाऊन रेशन कसे आणायचे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे, यावर सरकारने नामी योजना आणली आहे.
(2/11)
@abhiautade @Phanase_Patil

आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि प्रवासी मजुरांना परवडणाऱ्या किमतीत धान्य मिळावे यासाठी सरकारकडून "वन नेशन वन रेशन कार्ड योजना" चालविली जाते.लाभार्थ्यांना शिधा केंद्रातून धान्य मिळते. गर्दी आणि लांब रांगा असल्याने अनेकदा रेशन मिळण्यास अडचण येते.
(3/11)
@Prakashgadepat1 @PatilEkMaratha

या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने "मेरा रेशन अ‍ॅप" सुरू केले असून, याद्वारे आता आपण घरी बसून धान्य मिळवू शकता.मेरा रेशन अ‍ॅप वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचा भाग असून,या माध्यमातून घरी बसून रेशन बुक करू शकता. यासंदर्भात केंद्रीय अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी माहिती दिली आहे.
(4/11)

एनएफएसएचे लाभार्थी, विशेषत: स्थलांतरित लाभार्थी, वाजवी किमतीचे दुकान किंवा रेशन शॉप विक्रेता यांच्यामध्ये ओएनओआरसी संबंधित सेवा सुलभ करणे या मोबाईल अ‍ॅपचे उद्दिष्ट आहे,अशी माहिती सुधांशू पांडे यांनी दिली आहे.मेरा रेशन अ‍ॅप वापरणे सुलभ आणि सोपे आहे.
(5/11)
@swaruprahane88 @SutarSp

गुगल प्लेस्टोरवर हे अ‍ॅप मोफत उपलब्ध आहे. हे अ‍ॅप डाऊनलोड करून इंस्टालेशन प्रक्रिया पार पडल्यानंतर अ‍ॅप उघडा आणि त्यात आपल्या रेशनकार्डचा तपशील भरा.ही प्रक्रिया झाल्यानंतर आपली नोंदणी पूर्ण होईल. यानंतर आपण अ‍ॅपवरून घरबसल्या रेशन मागवू शकता.
(6/11)
@sdsurvase @Shrikant_Daphal

"मेरा रेशन अ‍ॅप" सध्या हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे, परंतु लवकरच १४ भारतीय भाषांमध्येही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या अ‍ॅपद्वारे तुम्हाला तुमच्या नजीकच्या रेशन सेंटरची अचूक माहिती मिळू शकेल.
(7/11)
@PomaneSpeaks @Pakshirajaa @Coolkiranj

रेशनकार्ड धारकांना या अ‍ॅपद्वारे रेशन विक्रेत्याची संपूर्ण माहिती आपण पाहू शकता. रेशनकार्ड धारक या अ‍ॅपद्वारे आपल्या सूचना किंवा तक्रारी नोंदवू शकतात.रेशन कधी आणि कसे प्राप्त होईल, ते रेशनकार्ड धारक या अ‍ॅपच्या मदतीने इतर माहिती स्वतः घेऊ शकतील.
(8/11)
@Shrirekha27 @niyati_nimit

या अ‍ॅपचा सर्वाधिक स्थलांतरितांना फायदा होईल, असे सांगितले जात आहे.रेशनकार्ड धारकांना या अ‍ॅपद्वारे नुकत्याच झालेल्या व्यवहारांची माहिती पाहता येईल. तसेच महिन्याभरात त्यांना किती रेशन मिळेल, याची माहितीही यावर उपलब्ध असेल.
(9/11)
@mansifule @Hindsagar @sujitgr8 @kalyanjadhav

रेशनकार्ड हे अत्यंत महत्त्वाचं असून सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ते आवश्यक आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून सरकार आपल्या राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना रेशन पुरवते.रेशनकार्ड हे फक्त एका विशिष्ट उत्पन्नाच्या गटासाठी आहे, ज्याचे प्रमाण राज्यात वेगवेगळे आहे.
(10/11)
@paddy_064

फक्त स्वस्त किंमतीत धान्य मिळत नाही तर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत.कुटुंबातील सर्व सदस्यांचा तपशील रेशनकार्ड मध्ये नोंदविला जाणे आवश्यक असते. एखादा नवीन सदस्य आपल्या घरात आला असेल,तर आपण त्यांचे नाव रेशनकार्ड मध्ये घरबसल्या जोडू शकतो.
(11/11)
@The_realist0001 @wankhedeprafull

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling