aditya chavan ▪︎▪︎nxsus▪︎▪︎ Profile picture
crypto Investor,Entrepreneur 🐳 Cyber Enthusiast,IMPEX,Forex,Commodity Trader,Polyglot! (Fully Unvacd😎)

Apr 20, 2021, 12 tweets

#सोशल_मीडिया_विकृती
शीतयुद्धाच्या काळात जर्मनीमधे भिंतीचं रक्षण करण्यासाठी शिकाऊ कुत्रे होते.भिंत ओलांडायचा प्रयत्न करणार्‍या माणसावर हल्ला करून त्याचे लचके तोडणे हेच त्यांना शिकवलं होतं.पूढे ती भिंत कोसळली तेंव्हा ह्या कुत्र्यांची गरज संपली पण त्यांना दुसरं काहीच येत नव्हतं.

त्यांचं ट्रेनिंग असं होतं की त्यांना समाजात पाठवणं शक्य नव्हतं.त्यामुळे नाईलाजाने त्यांना गोळ्या घालून ठार करावं लागलं.त्या कुत्र्यांचा काहीही दोष नव्हता पण माणसाने त्यांच्या डोक्यात भरलेल्या वाईट गोष्टींमुळे त्यांची ही अवस्था झाली.आपल्या देशात अर्बन नक्षलवाद हा जसा धोका आहे तसंच

अर्बन धर्मवाद हा पण तितकाच मोठा धोका आहे.जेव्हा चकचकीत घरांमधे आँफिसेसमधे बसणारे,उच्चशिक्षित लोक यामधे गुंतलेले असतात तेंव्हा याचा धोका कित्येकपटीने वाढलेला असतो.समाजात,आपापल्या जातीच्या गटांमधे ह्या माणसांच्या विद्वत्तेला,समृद्धीला एक वलय असतं आणि या वलयाचा फायदा उठवून ही माणसं

आपापले विचार समाजात पसरवत असतात.ही माणसं सुशिक्षित व विचार करणारी तो विचार चांगल्या पद्धतीने शब्दांमधे मांडू शकतात.यामुळे सोशल मीडियावर ही माणसं खूप पाँप्युलर असतात.या सगळ्यामधे एक पॅटर्न असतो ते म्हणजे सोशलमिडिया ग्रुप्स तयार होवून त्यामागून पद्धतशीर ब्रेनवाँशिंग केलं जातं

कधी कळत आणि नकळत.खऱ्या खोट्या बातम्या,तद्दन खोटी किंवा एकतर्फी माहीती पसरवून ये केलं जात असतं.मग एक आँनलाईन समर्थकांचं सैन्य तयार आपल्या विरोधकांवर शाब्दिक हल्ले करून त्यांना नामोहरम केलं जातं ज्याला आपण ट्रोल्स म्हणतो.ट्रोलिंग करणार्‍या लोकांचं वय हे १५ ते ३५ आहे हिच चिंतेची बाब

आहे.आपल्या पुढच्या पिढीला आपण नासवून टाकलेलं आहे हे कटू सत्य आपल्यासमोर लवकरच एक मोठी समस्या म्हणून आपल्यासमोर येणार आहे. एकदा माणसाला इतक्या भडक पद्धतीने रिअँक्ट होण्याची,एकतर्फी विचार करण्याची,एकदा कळपाची बांधिलकी पत्करली की मग कुठलाही विचार न करता त्याच्या सगळ्या गोष्टींना

समर्थन करणे.याची सवय झाली की ही सवय तेवढ्यापुरती रहाणार नाही.ही सगळी माणसं आहेत यांच्यामागे एक विचार करणारी संघटित लाँबी आहे त्यामुळे त्यांना कुत्र्यांसारखं ठार मारता येत नाही मग ही माणसं समाजात जातात तेंव्हा काय होईल याची कल्पना करवत नाही.यापुढे जर सोशल व डोमेस्टिक व्हाँयलन्स

घटना वाढतील अशी मला भिती वाटते.यापलिकडे एक असाही समाज आहे जो टिव्हीवर,सोशल मीडियावर,पेपरमधे शेअर झालेल्या गोष्टींना प्रामाणिकपणे सत्य मानत असतो,त्याच्यावर या असल्या गोष्टींचा कसा परिणाम होत असेल ही पण चिंतेची बाब आहे.यामधे सगळ्यात जास्त गोची झाल्ये ती विवेकी विचारांची.

कारण त्यांना दोन्ही गट आपले शत्रू मानतात.खरंतर वैचारिक क्रांती आणि एका मर्यादीत चौकटीत धर्म या अन्न वस्त्र निवारा इतक्या गरजेच्या गोष्टी आहेत.पण एका गटाला ते धर्मवादी वाटतात आणि दुसऱ्या गटाला धर्मविरोधी.पुरोगामी विवेकी विचार ही एक शिवी बनवून वापरात आहे हल्ली.फूरोगामी,पुरोगांडु

वगैरे शब्द सर्रासपणे वापरणाऱ्या माणसांना पुरोगामी विचार या शब्दाच्या अवकाशाचा अंदाज तरी आहे का असा संभ्रम निर्माण झाला आहे.प्रेम जिव्हाळा आत्मियता वगैरे गोष्टीच्या कल्पना संदर्भ झपाट्याने बदलत आहेत व याचा संबंध स्वार्थ,हितसंबंध जपणे,व्यावहारिक आर्थिक फायदा याकडे झुकाव होत आहेत.

मनाच्या प्रेमाची वाटचाल हळूहळू शारिरिक वासनेचं रूप घ्यायला लागली आहे आणि याला प्रॅक्टिकल थिंकिंग असं गोंडस नाव देऊन त्याचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.आपल्याला करमणूक म्हणून जे आँफर केलं जातंय त्यांच बदललेलं स्वरूप हा फार मोठा अभ्यासाचा विषय असणार आहे यापुढे

मानसशास्त्रासाठी बिभत्स आणि सेन्सेशनल थ्रिल्ससाठी आपली भूक वाढते आहे का?
आपलं उत्तर प्रामाणिक असलं तर आपण ठरवू शकू.
आपण एका सामाजिक ज्वालामुखीच्या तोंडावर उभे आहोत.
आणि या आगीत आपली मुलं जळून जाणार आहेत.
सावध व्हायला हवं.

जय महाराष्ट्र 🙏

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling