विजय माणदेशी Profile picture
मटण प्रेमी, घाटी मराठा. शंभूराजे ना मानणारा, महाराष्ट्र प्रेमी. जय महाराष्ट्र..

May 14, 2021, 5 tweets

आपल्या धाकल्या धन्याला माझ्या शंभूराजाला मानाचा मुजरा ... आजचा दिवस दर वर्षी पुरंदर वर जाणे हे ठरलेलंच असते माझे. आणि सुट्टी मग ऑफिस मध्ये कितीही urgent काम असेल तरीही. पण यावर्षी ते जमणार नाही.
#sambhajimaharajjayanti

तसाच गेलो असतो पण तिथे मिलिटरी ट्रैनिंग सेन्टर करून खूप बंधने आणलीत किल्ल्यावर जायला. मिलिटरी वाल्याना दुसरा एखादा किल्ला का मिळू शकला नाही ते समजत नाही.

छावा कादंबरी वाचली काही वर्षांपूर्वी आणि वेड लागले या वादळाचे. मिसेस गरोदर असताना गर्भ संस्कार म्हणून इतर पुस्तके न देता

मी "छावा" वाचायला दिली. आमच्या मुलाला आम्ही शंभू म्हणूनच बोलावतो. आम्ही खरं तर सर्व काही मुलगी होणार म्हणून ठरवले होते. पण घरात शंभू आला. संभाजीराजांच्या नखाएवढा जरी तो बनू शकला तरी माझ्यासाठी खूप आहे.

खरंच कितीतरी वादळे आव्हाने आणि संघर्षमय जीवन जगला माझा राजा .... मृत्यूलाही आव्हान दिले... राजे तुम्हाला परत एकदा मुजरा.
#म

@threadreaderapp unroll pls

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling