स्मित सुशील प्रभुखानोलकर🇮🇳 Profile picture
राष्ट्राय स्वाहा, इदं राष्ट्राय इदं न मम ! #वंदेमातरम् 🇮🇳

May 27, 2021, 5 tweets

#स्वातंत्र्यवीरसावरकर

इथे पुण्यात येरवडा तुरुंगात रँड आणि आयर्स्ट यांचा 'कट करून हत्या' प्रकरणी दामोदर हरी चाफेकर यांना फाशीची शिक्षा झाली आणि तिथे भगूरला अवघ्या साडे चौदा वर्षाचा विनायक त्या बातमीने मात्र प्रचंड अस्वस्थ झाला.
काय करावं, काही सुचेना त्याला !
(१/५)

रात्र उलटून चालली होती.
'काय करावं ?' या विचाराने विनायक नुसता तळमळत होता.

लहानपणापासूनच 'मातृभूमीसाठी कोणताही त्याग करण्याचा' विचार जोपासणाऱ्या विनायकाला चाफेकरांच्या हौतात्म्यातून आपलं जगण्याचं उद्दिष्ट गवसलं.
(२/५)

आणि त्या रात्री आपल्या देवघरातल्या #अष्टभुजा देवीच्या मूर्ती समोर उभा राहून बाल विनायकाने जी शपथ घेतली ती शेवटच्या श्वासापर्यंत पाळली.

"माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्त्र युद्धात शत्रूस मारीन, चाफेकरांसारखा मरेन किंवा शिवरायांसारखा विजयी होऊन -

(३/५)

माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा राज्याभिषेक करीन. यापुढे मी माझ्या देशाचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन !"

(४/५)

वयाच्या साडे चौदाव्या वर्षी ही भीष्मप्रतिज्ञा केलेल्या हिंदुसंघटक स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पुढील ६८ वर्ष ती शपथ आयुष्याचाच यज्ञ चेतवून कसोशीने पाळली.

#त्याग या वृत्तीच्या मर्यादा जर कुणी ओलांडल्या असतील तर ते म्हणजे सावरकर कुटुंब !

#वंदेमातरम्🇮🇳
#सावरकरजयंती
(५/५)

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling