स्मित सुशील प्रभुखानोलकर🇮🇳 Profile picture
राष्ट्राय स्वाहा, इदं राष्ट्राय इदं न मम ! #वंदेमातरम् 🇮🇳
Jul 7, 2022 8 tweets 2 min read
#सावरकरांचे_विचार
भाग २२
श्री पु गोखलेंनी तात्यारावांना एकदा प्रश्न केला की, "तात्या तुमचे वय आणि ही क्षीण प्रकृती पाहता जो जंबिया जवळ ठेवता त्याचा कितपत उपयोग करू शकाल - प्रसंग पडलाच तर?"

ते नजर रोखून श्रीपुंकडे पाहात क्षणभर रस्त्यातच थांबले, आणि चटकन उसळून म्हणाले -

१/८ "मी क्षीण झालो आहे, थकलो आहे, माझे वयही होत आलेले आहे, हे तुला वाटते ते अगदी खरे आहे. इथे कोणी माझ्यावर हल्ला करील असाही संभव जवळजवळ नाहीच. पण हा सर्व आपण काही गृहीत कृत्ये धरून काढलेला निष्कर्ष आहे.

२/८
Feb 27, 2022 13 tweets 4 min read
#मराठी_राजभाषा_दिवस

मराठी प्रेमाचे नुसतेच तुणतुणे वाजवून आपली #मराठी मोठी होणार नाही हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जाणले होते.

#भाषा केवळ संवादाचं माध्यम अन अभिव्यक्त होण्याचे साधन नसून,भाषा ही संस्कृतीचं द्योतक आहे; संस्कृतीची वाहक आहे.

१/१३ आपल्या भाषेतून आपले संस्कार प्रतीत होत असतात आणि म्हणूनच 'परकीय भाषेतून आलेल्या शब्दांमुळे मराठी अधिक संपन्न झाली' हे तत्कालीन अन आताच्या भाषातज्ञांचे मत, सावरकरांनी त्यावेळीच खोडून काढले होते.

२/१३
Feb 26, 2022 11 tweets 4 min read
#आत्मार्पण
तात्या दररोज रात्री निजताना योगविषयक श्लोक म्हणत. त्या वेळी ते आपले दोन्ही हात प्रथम टाळूवर ठेवून मग कपाळ, छाती, पोट यांवर ठेवीत ठेवीत पायांवरून पावलांकडे सावकाश नेत असत.

ते श्लोक पुटपुटत असल्याने ते श्लोक कोणते हे सांगणे कठीण होते; पण ते सदर कृती ३ वेळा करीत.

१/११ Image हा प्रकार मी लागोपाठ ३-४ दिवस पाहिला. कुतूहल तर निर्माण झाले होते, पण तात्यांना मी हेतुतःच काही विचारले नाही. कदाचित त्यांनी हा परिपाठ बंद केला असता, अशी मला भीती वाटली.

मात्र कुतुहलाने त्या वेळी कामावर असलेल्या शुश्रूषांकडे मी चौकशी केली होती. त्यांनीही तेच सांगितले.

२/११ Image
Feb 21, 2022 4 tweets 3 min read
१९ जानेवारी १९९०

आज पासून बरोबर ३२ वर्षांपूर्वी ४ लाखाहून अधिक हिंदूंना मध्यरात्री मस्जिद-मदरश्यामधून 'रालीव गालीव या चालीव' (ईस्लाम स्विकार करो, मरो या अपनी महिलाओं को छोडकर भाग जाओ) चा option देणाऱ्या सैतानांचा विध्वंस आपल्यापैकी किती लोकांना माहीत आहे ?

#TheKashmirFiles
१/४ "ऐ जालिमों, ऐ काफिरों, कश्मीर हमारा है, यहां क्या चलेगा - निजाम-ए-मुस्तफा.
रालिव, गालिव या चालिव" - चे नारे देत मध्यरात्री तुम्हांला नेसत्या वस्त्रानिशी घरातून बाहेर काढलं...
•जो कालपर्यंत प्रेमळ चाचा,भाईजान होता तोच आज वासनांध सैतान बनून तुमच्या आई-बहिणीच्या अब्रूला हात घालतो..
Feb 2, 2022 7 tweets 3 min read
#सावरकरांच्या_आठवणी
भाग ३०

लोकमान्य टिळकांचे देहावसान झाल्याची दुःखद बातमी अंदमानात येऊन पोहोचली.

सावरकरांनी "हा राष्ट्रीय शोकदिन आहे. म्हणून आपणा सर्वांनी आज उपवास पाळावा" अशी सूचना करताच केवळ राजबंद्यांनीच नव्हे, तर इतर कैद्यांनीही सावरकरांच्या या सूचनेला दुजोरा दिला.

१/६ त्या दिवशी सेल्युलर जेल मध्ये कुणीच जेवलं नाही.

दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांच्या दृष्टीस पडणार नाही अशी काळजी घेऊन शोकसभा घेण्यात आली. सावरकरांनी कैद्यांना टिळकांचे मोठेपण स्पष्ट करून सांगितले.

अधिकाऱ्यांना मागाहून हे सारे कळले. त्यांना आश्चर्य वाटले.

२/६
Oct 24, 2021 4 tweets 3 min read
आज आपण पाकिस्तानकडून सपशेल पराभूत झालो.

काहीच, अगदी काहीच हरकत नाही त्यात!
तो खेळ आहे, इतकी वर्षे #WorldCup मध्ये आम्ही त्यांना हरवलं, आज त्यांनी आम्हांला!

पण #BangladeshHinduGenocide आणि अफगाणिस्तान, पाकिस्तान मधल्या #हिंदूनरसंहार बाबत शोक व्यक्त करण्याऐवजी आज भारतीय संघ -
१/४ #BlackLivesMatter साठी गुडघ्यावर बसून 'गोऱ्यांच्या चुकीबाबत आम्ही खेद व्यक्त करतो' आविर्भावात झुकला!
का?
फक्त Black Lives Matter करतात का?
#HinduLivesMatter करत नाहीत?
हिंदूंमध्ये जीव नसतो?
हिंदू स्त्रियांवरील अत्याचार कृष्णवर्णीय स्त्रियांवरील अन्यायापेक्षा कमी पाशवी आहेत क?
२/४
Oct 13, 2021 6 tweets 3 min read
वेंगुर्ल्यातील सुप्रसिद्ध #चौकोनीपाव आणि कुद्रे बिस्किट्स

चौकोनी पाव म्हणजे आमच्या वेंगुर्ल्याची खासियत !

#वेंगुर्ले हे स्वातंत्र्यपूर्व काळात आशिया खंडातील पश्चिम किना-यावरील आयात-निर्यातीचे प्रमुख व्यापारी केंद्र होते.
(१/६) वेंगुर्ले बंदराजवळील सागर बंगला, दीपगृह, मंदिरे, फळसंशोधन केंद्र, विस्तीर्ण समुद्रकिनारा ही इथली आकर्षणे !
इथली खाद्यसंस्कृतीही जरा हटकेच आहे. सकाळच्या नाष्ट्याला अगदी दुपारी २ पर्यंत इथल्या लहान-मोठ्या हॉटेलांतून उसळ-चौकोनी पाव, हाफ भजी, कटींग चाय यालाच जास्त मागणी असते.
(२/६)
Oct 12, 2021 6 tweets 3 min read
लखोबा लोखंडेने बहुजन (खरं तर ते सर्वांचेच आदर्श आहेत) समाजाच्या श्रद्धास्थानांचा अपमान केला म्हणून ज्यांनी कोर्टाबाहेर त्याच्यावर हल्ला केला, इथे twitter वर येऊन 'तो लिमये, म्हणजे ब्राह्मण...म्हणून इतर समाजातील आदर्शांचा अपमान करतो' असं certificate देऊन मोकळे झालेले -

(१/६) - आपल्या पुरतं सोयीस्कर 'सत्य' शोधून जातीचं राजकारण करणारे #ठेकेदार, हा भय्या पाटील समर्थ रामदास स्वामी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा असा जाहीर अपमान करत असताना कुठे लपले आहेत ?

समाजात जातीय तेढ निर्माण करून हा विकृत भैया पाटील काय साधू पाहत आहे?

(२/६)
May 27, 2021 5 tweets 3 min read
#स्वातंत्र्यवीरसावरकर

इथे पुण्यात येरवडा तुरुंगात रँड आणि आयर्स्ट यांचा 'कट करून हत्या' प्रकरणी दामोदर हरी चाफेकर यांना फाशीची शिक्षा झाली आणि तिथे भगूरला अवघ्या साडे चौदा वर्षाचा विनायक त्या बातमीने मात्र प्रचंड अस्वस्थ झाला.
काय करावं, काही सुचेना त्याला !
(१/५) रात्र उलटून चालली होती.
'काय करावं ?' या विचाराने विनायक नुसता तळमळत होता.

लहानपणापासूनच 'मातृभूमीसाठी कोणताही त्याग करण्याचा' विचार जोपासणाऱ्या विनायकाला चाफेकरांच्या हौतात्म्यातून आपलं जगण्याचं उद्दिष्ट गवसलं.
(२/५)
May 26, 2021 6 tweets 2 min read
#गांधीगोंधळ
भाग १: स्वातंत्र्याचा मार्ग

"छे ! आत्मत्याग, आत्मबल, सत्याग्रह, अहिंसा, सत्य इ. गोंडस नावाखाली हितशत्रूसच शोभण्यासारखा राष्ट्राचा जो तेजोभंग आजपर्यंत करण्यात आला तो पुरे झाला !
राजकारणाचा पोरखेळ करून टाकला तो पुरे झाला. हा #गांधीगोंधळ आता पुरे झाला !

(१/६) म्हणे कलकत्त्यास पायी जा आणि ओरडा !

हो, जर तुम्हांस राष्ट्रासाठी खरोखरच काही करून दाखवायचे असेल, तर हे बालिश तत्वज्ञान नि हे षंढतेचे शास्त्र पहिल्याने पायाखाली तुडवून टाका !

पुन्हा 'हे कृत्य सत्याग्रह आहे की नाही' हा प्रश्न एखाद्या आजीसारखा विचारीत न बसता -
(२/६)
Jan 4, 2021 8 tweets 5 min read
#केसरी

आजच्याच दिवशी १४० वर्षांपूर्वी, म्हणजे ०४ जानेवारी १८८१ रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दैनिक #केसरी हे वर्तमानपत्र सुरु करून भारतीय असंतोषाला वर्तमानपत्राच्या माध्यमातून वाट मोकळी करुन दिली.

#लोकमान्यटिळक
(१/८) २ जानेवारी १८८० साली लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी पुण्यात 'न्यू इंग्लिश स्कुल' ची स्थापना केली.

महादेव बल्लाळ नामजोशी हे संपादक सुद्धा ह्या शाळेच्या संचालक मंडळाचा भाग होते.

(२/८)
Jan 2, 2021 8 tweets 4 min read
#सावरकरांच्या_आठवणी
भाग २२ : #मास्टरतारासिंग_आणि_स्वातंत्र्यवीरसावरकर

अकाली दलाचे माजी अध्यक्ष, तसेच गुरुव्दाराप्रबंधक समितीचे माजी अध्यक्ष आणि शिखांचे पुढारी मास्टर तारासिंग हे काँग्रेसचे कट्टर विरोधक होते. काँग्रेसचे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे धोरण त्यांना पटत नव्हते.

(१/८) ImageImage त्यांचा नि अकाली दलाचा काँग्रेसला ठाम विरोध होता.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आणि त्यांच्या पंजाबच्या दौऱ्यात आणि दिल्लीत त्यांच्या तेथील मुक्कामात भेटी होत, चर्चा होत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेली #हिंदू या शब्दाची व्याख्या मास्टर तारासिंगांना पटत असे.

(२/८)
Jan 1, 2021 9 tweets 7 min read
#सावरकरांच्या_आठवणी
भाग २१ : #गीतरामायण

सुप्रसिद्ध कवी कै.ग.दि.माडगूळकर यांनी त्यांचे #गीतरामायण हे काव्य लिहावयास आरंभ केला होता आणि काही कडवी रविवारच्या #केसरी त प्रसिद्ध होऊ लागली होती.
तात्याराव सावरकर ती कडवी अगदी न चुकता वाचत असत.

(१/८) ग. दि. माडगूळकरांच्या कल्पकतेची झेप आणि अर्थपूर्ण शब्दांची यथायोग्य योजना तात्यांना फार आवडे.

एकदा केसरी मधील #गीतरामायण काव्य वाचून झाल्यावर तात्या म्हणाले, “माडगूळकरांची प्रतिभा उत्तुंग आहे. ते खरे प्रतिभासंपन्न कवी आहेत."

(२/८)
Jan 1, 2021 4 tweets 3 min read
नववर्ष इ.स.२०२१ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शंभूराजांना केलेला उपदेश मनी धरावा :

अखंड सावधान असावे । दुश्चित कदापि नसावे ।
तजवीज करीत बैसावे । येकांत स्थळी ।।

काही उग्रस्थिती सांडावी । काही सौम्यता धरावी ।
चिंता पराची लागावी । अंतर्यामी ।।

(१/४) श्रेष्ठी जे जे मेळविले । त्यासाठी भांडत बैसले ।
तरी मग जाणावे, फावले । गनिमासी ।।

ऐसे सहसा करू नये। दोघां भांडण तिसऱ्या जाय।
धीर करोन महत्कार्य । समजोन करावे ।।

आरंभीच पडीली धास्ती । म्हणजे कार्यभाग होय नास्ती ।
याकारणे समस्ती । बुद्धी शोधावी ।।

(२/४)
Dec 31, 2020 4 tweets 3 min read
#सावरकरांच्या_आठवणी
भाग २० : #आत्मर्पणाचा_विचार

"माझ्या आठवणीप्रमाणे आपल्या आत्मर्पणाची प्रकट चर्चा तात्यांनी श्री.धनंजय कीर यांच्यापाशी केली होती.

१९६३ नोव्हेंबरमध्ये केव्हातरी संध्याकाळी खाली अंगणातून फेरी मारून झाल्यावर त्यांच्यापाशी तात्यांनी ही चर्चा केली.

(१/४) कुमारील भट्ट, जगद्गुरू आद्य शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत रामदास यांच्याप्रमाणे आपणास आत्मार्पण करावे असे का वाटते, याविषयी सांगताना तात्या म्हणाले :
'वरील संतांना आपले जीवितकार्य पूर्ण झाले, आता कर्तव्य काही उरले नाही, अशी कर्तव्यपूर्ततेची भावना प्रबळ झाली -

(२/४)
Dec 28, 2020 8 tweets 4 min read
#सावरकरद्वेषींची_खरडपट्टी

#गुलाम मानसिकतेत जन्मलेल्या नि स्वार्थासाठी कणाहीन नेतृत्वाचा उदो उदो करणाऱ्या कर्तृत्वशून्य, निर्बुद्ध #सावरकरद्वेषी किड्यांची, सुमारे पाऊणशे वर्षांपूर्वी #भाषाप्रभू पु.भा.भावे यांनी आपल्या अग्रलेखातून केलेली खरडपट्टी आजही तेवढीच लागू पडते.

(१/८) पु.भा.भावे लिहितात :
"भ्रष्टबुद्धी असलेल्याने सावरकरांस हिणविणे म्हणजे कर्दमांतील गांडुळाने फणीधरासमोर वळवळ करणे होय, जनान्यातील कंचुकीने अनेक समरप्रसंग गाजवणारऱ्या शुरांस युद्ध शास्त्रावर धडे देणे होय, दरिद्री खर्डेघाशाने कालिदासाच्या प्रतिभेसमोर वाकुल्या दाखवणे होय.

(२/८)
Dec 28, 2020 8 tweets 5 min read
#सावरकरांचे_विचार
भाग १६

" 'नाही, नाही, राष्ट्रे कधीही मरत नाहीत, परमेश्वर गांजलेल्यांचा कैवारी आहे. त्याने मनुष्याला स्वातंत्र्यात राहण्यासाठी उत्पन्न केले आहे. तुम्ही मनांत आणा की तुमचा देश स्वतंत्र झालाच!' याहून अधिक उत्साहक असा दुसरा कोणाचा #राष्ट्रमंत्र आहे ?

(१/८) 'एकदा मनुष्याने असा निश्चय केला की मी स्वातंत्र्य, स्वदेश व मानव्य यावर भक्ती करतो, की मग त्याने स्वातंत्र्यासाठी, स्वदेशासाठी व मानव्यासाठी लढलेच पाहिजे, अखंड लढले पाहिजे, सर्व आयुष्यभर लढले पाहिजे, शक्य त्या त्या शस्त्राने लढले पाहिजे, -

#स्वातंत्र्यवीरसावरकर
(२/८)
Dec 26, 2020 5 tweets 3 min read
#सावरकरांचे_विचार
भाग १५

सन १९५२ मध्ये पुण्यात #अभिनवभारत सांगता समारंभानिमित्त #स्वातंत्र्यवीरसावरकर आले असता त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राचे अनावरण करण्याचे कसबा पेठेतील तरुण मित्रमंडळाने योजले होते.

(१/५) Image या समारंभाला सरसंघचालक गोळवलकर गुरुजी आणि संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कै.ग.वि.केतकरही उपस्थित होते.

त्या दाटीवाटीच्या समारंभातील भाषणात संदेश देताना सावरकर म्हणाले होते :
“हिंदूच्या हितार्थ झटणारे आपण #हिंदुत्वनिष्ठ आधीच मूठभर ! -

(२/५) Image
Sep 5, 2020 10 tweets 6 min read
#चाणक्य
भाग १

यह धारावाहिक उस महापुरूष के जीवन, उनके विचारोंपे आधारित है, जिन्होंने #राष्ट्रहितसर्वोपरि विचार सर्वप्रथम रखा और #अखंडभारत को सशक्त एवं एकसंघ राष्ट्र बनाने का स्वप्न देखा!

इस धारावाहिक को मूर्तरूप देने वाले 'पागल' व्यक्ति का नाम है - डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी।

१/१० चलिए देखते है #चाणक्य धारावाहिक से जुड़े कुछ दिलचस्प तथ्य:

१) लेखक एवं निर्देशक डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदीजी ने पूरे ५ साल एकाग्र चित्तसे अनुसंधान (research) करने के पश्चात इस धारावाहिक की निर्मिती की है। मराठी, गुजराथी, हिंदी, अंग्रेजी एवं अन्य भारतीय प्रादेशिक भाषा -

२/१०
Aug 14, 2020 6 tweets 4 min read
#अखंडभारत
"भारताच्या फळणीविरोधी आंदोलनात मी आघाडीवर होतो. परंतु शेवटी १९४७ मध्ये आपल्या मातृभूमीचे दोन तुकडे झाले. अशा प्रकारे पाकिस्तान अस्तित्वात आले तरी ती हानी भरून निघावी अशी घटना घडली, ती म्हणजे परकीय दास्यातून हिंदुस्थानचा फार मोठा भाग मुक्त करण्यात आपणाला यश मिळाले.
(१/६) भारताच्या स्वातंत्र्याचे जे युद्ध आमच्या पिढीने सतत लढविले आणि ज्यामध्ये एक सैनिक म्हणून गेली पन्नास वर्षे मी दिलेली लढत, भोगलेले कष्ट नि केलेला त्याग आमच्या पिढीतील अन्य कोणाही देशभक्तापेक्षा उणा नाही. ते युद्ध मुक्त शेवटी आम्ही जिंकले !

#AkhandBharat
(२/६)
Jul 8, 2020 19 tweets 5 min read
त्या साहसी उडीला आज ११० वर्ष पूर्ण !
तो दिवस होता ७ जुलै १९१० !

फ्रान्समधल्या मार्सेलिस बंदरावर हिंदुस्थानास निघालेली 'मोरिया' बोट काही काळासाठी स्थिरावली होती.

त्या बोटीत साखळदंडात कैद होते #स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.
इंग्रजांचे अतिशय #डेंजरस् कैदी !

(१/१८) कारण लंडनला, शत्रूच्या घरातच जाऊन सावरकरांनी तेथील भारतीय क्रांतिकारकांच्या सहाय्यानं #अभिनव_भारत या आपल्या क्रांतिकारी संघटनेचं जाळं विणलं होतं.
पिस्तुलं जमविली होती, बॉम्ब बनविण्याचं प्रशिक्षण मिळवलं होतं.
अगदी भारतात सुद्धा ते तंत्र आणि बॉम्ब पाठविले होते.

(२/१८)