अहम् ब्रह्मास्मि 𝕏 Profile picture
Digital पत्रकार 🗞️ Blogger ✍️ Explorer 🧗 Foodie🍕 📝बौद्धिक@#भ्रम_म्हणे▪️Read My Blog Here 👇

Jun 1, 2021, 10 tweets

गरमागरम भज्यांना कुरकुरीतपणा आणणारे अमृत म्हणजे #खाद्यतेल..

पण गेल्या ६ महिन्यात याच खाद्यतेलांच्या किंमती ४० ते ५० % वाढल्या आहेत.

परंतु अनेकांना याच कारणच माहिती नसल्याने ते सवयीप्रमाणे केंद्र सरकारला दोषी धरत आहेत.

याविषयावर सर्वांनाच माहिती व्हावी म्हणूनच हा लेखन प्रपंच ~

जानेवारी २०२१ ची आकडेवारी पाहिली तर जून २०२० पासून खाद्यतेलांच्या किंमती जवळपास ४० ते ५० टक्क्यांनी वाढलेल्या आपल्याला दिसून येतील.

यातील १५ टक्के वाढ एकट्या जानेवारी महिन्यात झाली आहे.

Solvent Extractor's Association of India चे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी जानेवारी मध्ये सांगितलेलं की, या वाढलेल्या किमती एप्रिल मे अखेरपर्यंत राहतील आणि त्यानंतर हळू हळू कमी होतील.

💰 किंमती का वाढल्या?
आपल्या देशात पाम, सोयाबीन आणि सूर्यफुल या ३ तेलांचा सर्वाधिक वापर होतो.

➡️ पाम तेल -
जगाला पाम तेलाचा जवळपास ८०% पुरवठा मलेशिया व इंडोनेशियातर्फे केला जातो.

मलेशियाने कश्मीरबाबत पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर भारत मलेशिया संबंध बरेच ताणले गेले होते. त्यावेळी आपण पाम तेल आयात करायचं बंद केलं होत. मात्र २०२० मध्ये पुन्हा आयात करण्यास सुरुवात केली.

मात्र कोरोनामुळे तिथले ही पाम तेलाचे उत्पादन कमी झाले आहे.

मात्र चीन कोरोनातुन सावरत असल्याने चीनची तेलाची मागणी देखील वाढली आहे.

गेल्या सहा महिन्यात चीनने पाम तेलाची आयात ३१% वाढवली आहे.

जानेवारी २०२० च्या तुलनेत जानेवारी २१ मध्ये चीनचे खाद्यतेलाची मागणी ४८% वाढली आहे.

उत्पादन कमी असताना चीनने आयात वाढवल्याने त्याचा प्रभाव तेलाच्या किंमतीवरही पडला.

➡️ सोयाबीन तेल -
जगभरात ब्राझील आणि अर्जेंटिना हे दोन प्रमुख देश आहेत जे सोयाबीनचे प्रमुख उत्पादक आहेत.

मात्र तिथल्या दुष्काळामुळे आणि कोरोनामुळे गेल्या १० वर्षात सोयाबीनचे सर्वात कमी उत्पादन आले.

➡️ सूर्यफुल तेल -
रशिया आणि युक्रेन सूर्यफुलाच्या बियांचे मुख्य निर्यातदार आहेत. भारतही यांच्याकडूनच खरेदी करत असतो.

मात्र या दोन्ही देशात मिळून सूर्य फुलाच्या बियांचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा जवळपास ३० लाख टन कमी झाले आहे.

ज्यामुळे यांच्या किंमती ही वाढल्या.

भारत जवळपास सुमारे ६५% तेल इतर देशांमधून आयात करतो. त्यामुळे जगाच्या पाठीवर घडलेल्या गोष्टींचा प्रभाव भारतावर पडणे निश्चित आहे.

भारतात खूप आधीपासून खाद्य तेलांवर आयात कर वसूल गेला जातो. पाम तेलावर तो ३७.५% होता.

नोव्हेंबरमध्ये केंद्र सरकारने त्यात १० टक्के कपात करून २७.५% केला.

मात्र ज्या देशांमधून आपण आयात करतो तिथे किंमत वाढल्याने हा आपल्याला हा बदल दिसून नाही आला.

याव्यतिरिक्त पाम तेलावर १७.५% तर सोयाबीन आणि सूर्यफुल तेलावर २०% कृषी सेस आकारला जातो.

मात्र सरकार हा कृषी सेस देखील कमी करण्याच्या विचारात आहे.

येत्या महिनाभरात सरकारने आयात केलेलं खाद्यतेल बाजारात येईल, तेव्हा तेलाच्या किंमती निश्चितच कमी होतील.

माहिती नसताना उगाच केंद्र सरकारला दोष देण्यापेक्षा आधी माहिती घेत चला.

क्यूँ की पढेगा इंडिया, तभी तो आगे बढेगा इंडिया 🇮🇳

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling