गरमागरम भज्यांना कुरकुरीतपणा आणणारे अमृत म्हणजे #खाद्यतेल..
पण गेल्या ६ महिन्यात याच खाद्यतेलांच्या किंमती ४० ते ५० % वाढल्या आहेत.
परंतु अनेकांना याच कारणच माहिती नसल्याने ते सवयीप्रमाणे केंद्र सरकारला दोषी धरत आहेत.
याविषयावर सर्वांनाच माहिती व्हावी म्हणूनच हा लेखन प्रपंच ~
जानेवारी २०२१ ची आकडेवारी पाहिली तर जून २०२० पासून खाद्यतेलांच्या किंमती जवळपास ४० ते ५० टक्क्यांनी वाढलेल्या आपल्याला दिसून येतील.
यातील १५ टक्के वाढ एकट्या जानेवारी महिन्यात झाली आहे.
Solvent Extractor's Association of India चे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी जानेवारी मध्ये सांगितलेलं की, या वाढलेल्या किमती एप्रिल मे अखेरपर्यंत राहतील आणि त्यानंतर हळू हळू कमी होतील.
💰 किंमती का वाढल्या?
आपल्या देशात पाम, सोयाबीन आणि सूर्यफुल या ३ तेलांचा सर्वाधिक वापर होतो.
➡️ पाम तेल -
जगाला पाम तेलाचा जवळपास ८०% पुरवठा मलेशिया व इंडोनेशियातर्फे केला जातो.
मलेशियाने कश्मीरबाबत पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर भारत मलेशिया संबंध बरेच ताणले गेले होते. त्यावेळी आपण पाम तेल आयात करायचं बंद केलं होत. मात्र २०२० मध्ये पुन्हा आयात करण्यास सुरुवात केली.
मात्र कोरोनामुळे तिथले ही पाम तेलाचे उत्पादन कमी झाले आहे.
मात्र चीन कोरोनातुन सावरत असल्याने चीनची तेलाची मागणी देखील वाढली आहे.
गेल्या सहा महिन्यात चीनने पाम तेलाची आयात ३१% वाढवली आहे.
जानेवारी २०२० च्या तुलनेत जानेवारी २१ मध्ये चीनचे खाद्यतेलाची मागणी ४८% वाढली आहे.
उत्पादन कमी असताना चीनने आयात वाढवल्याने त्याचा प्रभाव तेलाच्या किंमतीवरही पडला.
➡️ सोयाबीन तेल -
जगभरात ब्राझील आणि अर्जेंटिना हे दोन प्रमुख देश आहेत जे सोयाबीनचे प्रमुख उत्पादक आहेत.
मात्र तिथल्या दुष्काळामुळे आणि कोरोनामुळे गेल्या १० वर्षात सोयाबीनचे सर्वात कमी उत्पादन आले.
➡️ सूर्यफुल तेल -
रशिया आणि युक्रेन सूर्यफुलाच्या बियांचे मुख्य निर्यातदार आहेत. भारतही यांच्याकडूनच खरेदी करत असतो.
मात्र या दोन्ही देशात मिळून सूर्य फुलाच्या बियांचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा जवळपास ३० लाख टन कमी झाले आहे.
ज्यामुळे यांच्या किंमती ही वाढल्या.
भारत जवळपास सुमारे ६५% तेल इतर देशांमधून आयात करतो. त्यामुळे जगाच्या पाठीवर घडलेल्या गोष्टींचा प्रभाव भारतावर पडणे निश्चित आहे.
भारतात खूप आधीपासून खाद्य तेलांवर आयात कर वसूल गेला जातो. पाम तेलावर तो ३७.५% होता.
नोव्हेंबरमध्ये केंद्र सरकारने त्यात १० टक्के कपात करून २७.५% केला.
मात्र ज्या देशांमधून आपण आयात करतो तिथे किंमत वाढल्याने हा आपल्याला हा बदल दिसून नाही आला.
याव्यतिरिक्त पाम तेलावर १७.५% तर सोयाबीन आणि सूर्यफुल तेलावर २०% कृषी सेस आकारला जातो.
मात्र सरकार हा कृषी सेस देखील कमी करण्याच्या विचारात आहे.
येत्या महिनाभरात सरकारने आयात केलेलं खाद्यतेल बाजारात येईल, तेव्हा तेलाच्या किंमती निश्चितच कमी होतील.
माहिती नसताना उगाच केंद्र सरकारला दोष देण्यापेक्षा आधी माहिती घेत चला.
क्यूँ की पढेगा इंडिया, तभी तो आगे बढेगा इंडिया 🇮🇳
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
महाराष्ट्रातील एका गावाला अतिरेक्यांनी स्वतंत्र घोषित केलं होतं, नाव ठेवलं "अल् शाम" 🏴☠️
भारताला सीरियासारखे इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे काम इसिसने याच गावातून सुरू केले.
या लोकांनी ठाणे जिल्ह्यातील "पडघा" गावाची निवड केली होती. (1/4)
हळूहळू सर्व दहशतवादी या गावात जमा होऊ लागले.
या दहशतवाद्यांनी गावाला 'स्वतंत्र' घोषित केले होते. त्यांनी गावाचे नाव बदलून ‘अल शाम’ केले.
जिहादच्या नावाखाली भारतात दहशत माजवणे आणि दहशतवादी कारवाया करणे ही दहशतवाद्यांची योजना होती. (2/4)
त्यानंतर देशभरातील जिहादी तरुणांना या गावात आणून त्यांना दहशतवादाचे प्रशिक्षण देण्याची धोकादायक योजना आखण्यात आली.
15 जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये घाटकोपर बॉम्बस्फोटाचा मुख्य आरोपी साकिब नाचनचा समावेश आहे. त्याचा मुलगा शमील नाचन आणि भाऊ आकिब नाचन यांना अटक केली. (3/4)
अग्निवीर अमृतपाल यांचा अंत्यविधी एका सैनिकाप्रमाणे केला नाही, म्हणून विरोधी नेते सरकार आणि भारतीय सेनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
मात्र शासकीय प्रथेप्रमाणे अंत्यविधी न करण्यामागे अग्निवीर योजनेचा काहीच संबंध नाही.
जाणून घेऊया नक्की कारण काय होत? (1/5)
11 ऑक्टोबर 2023 रोजी सेन्ट्री ड्युटीवर असताना त्यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.
वैद्यकीय प्रक्रिया पार पाडल्यानंतर, अंत्यसंस्कारासाठी एका एस्कॉर्ट पार्टीसह लष्कराच्या बंदोबस्तात पार्थिव देह त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले.(2/5)
अग्निपथ योजनेच्या अंमलबजावणीपूर्वी किंवा नंतर सामील झालेल्या सैनिकांमध्ये भारतीय सेना फरक करत नाही.
1967 च्या लष्करी आदेशानुसार आत्महत्या केलेल्या सैनिकांना लष्करी अंत्यसंस्काराचा हक्क नाही. कोणताही भेदभाव न करता या विषयावरील धोरण तेव्हापासून सातत्याने पाळले जात आहे.(3/5)
सर्व मराठी न्युज चॅनेलवर सध्या एक बातमी चालवली जात आहे,
"भारतीय फुटबॉल महासंघात तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप झाल्याने FIFA ने भारतीय फुटबॉल महासंघाची मान्यता रद्द केली."
पण खरी बातमी समजून घ्यायची असेल तर थ्रेड संपूर्ण वाचा ~
या बातमीत तिसरा पक्ष म्हणजे "भारताचे सुप्रीम कोर्ट"
भारतीय फुटबॉल महासंघाच्या नियमानुसार कुठलीही व्यक्ती १२ वर्षांपेक्षा जास्त महासंघाची अध्यक्ष राहू शकत नाही.
१२ वर्षांपेक्षा जास्त वेळ अध्यक्ष राहिलेले प्रफुल्ल पटेल यांना मे २०२२ मध्ये सुप्रीम कोर्टाने राजीनामा द्यायला भाग पाडले आणि महासंघाच्या संचालनासाठी प्रशासक समिती नेमली.
मात्र इगो दुखावलेल्या प्रफुल्ल पटेलांनी FIFA ला पत्र लिहीत "तिसरा पक्ष" फुटबॉल महासंघात हस्तक्षेप करत असल्याचे सांगितलं.
प्रफुल्ल पटेल हे FIFA चे सदस्य असून AFC चे उपाध्यक्ष आहेत, या पदांचा गैरवापर करत भारतीय फुटबॉल महासंघाची मान्यता रद्द करण्यास FIFA ला भाग पाडले.
ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ रोजी रायगडावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला. आणि हाच दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संपूर्ण भारतात "हिंदु साम्राज्य दिन"🚩 म्हणून साजरा करतो. (१/१०)
संघाशी जेमतेम तोंड ओळख असलेल्या व्यक्तीच्या मनात असाही प्रश्न येऊ शकतो की, भारतात अनादी काळापासून अनेक शूरवीर पराक्रमी राजे महाराजे होऊन गेले मग छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झालेला दिवसच संघ "हिंदु साम्राज्य दिन"🚩 म्हणून का साजरा करतो? आणि असा प्रश्न येणे साहजिक आहे. (२/१०)
जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तेव्हा अवघ्या हिंदुस्तानात हल्लकल्लोळ माजला होता. समस्त हिंदु समाज मुघल आणि यवनी आक्रमणांनी त्रस्त झाला होता.
आया बहिणींची अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली जात होती, तलवारीच्या जोरावर धर्मांतरण घडवून आणलं जातं होत. (३/१०)
जयेश कुलकर्णी, नंदुरबार येथे ११ वीत शिकणारा एक स्वयंसेवक...
आई सात वर्षापूर्वीच गेली तेव्हापासून जयेश आणि त्याची बहीण नंदुरबारला मामाकडेच राहतात तर वडील जवळच एका लहान गावात राहायचे.
काही दिवसांपूर्वी वडिलांना कोरोनाने ग्रासलं.
दुखणं बळावल्याने हॉस्पिटलला दाखल कराव लागलं, त्यातून रेमिडीसिवरचा तुटवडा..
खूप फिरला इंजेक्शनसाठी , सर्वजण प्रयत्न करत होते, एका स्थानिक नगरसेवकांच्या (श्री. कळवणकर) माध्यमातुन इंजेक्शन उपलब्ध झाले, परंतु उशीर झाला. त्याच रात्री जयेशच्या वडिलांना शासकीय रुग्णालयात हलवावं लागलं.
आणि नंतर त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला....
दरम्यान ज्या नगरसेवकांनी इंजेक्शन उपलब्ध करून दिले होते. त्यांच्याकडे दाराशी पहाटेपासून एक जोडपं बसलं होत, त्यांच्या मुलासाठी इंजेक्शन मिळेल का या आशेवर...