😎मोटाभाई गुजरातवाले🇮🇳🚩🤟🏻 Profile picture
The_Young_Guns_Of_INDIA🇮🇳

Jun 5, 2021, 20 tweets

Web series Family Man2 आणि राजीव गांधी व श्रीलंकन तामिळी !!

भारत आणि श्रीलंका यांची राजकीय खेळी आणि तामिळ संघर्ष यांची कथा यात दर्शवली आहे.पण मी आज तुम्हाला श्रीलंकेच्या आणि भारताच्या काही घटना सांगू इच्छित आहे.भारताच्या स्वातंत्र्याच्या एका वर्षानंतर (१९४८) ब्रिटिशांनी

श्रीलंकेला एक स्वतंत्र देश म्हणून घोषित केला.श्रीलंकेच्या जनसंख्येत सगळ्यात मोठा समुदाय हा सिंहला समाज म्हणून होता.श्रीलंकेच्या स्वातंत्र्याच्या नंतर सत्तेत राहणारा सगळ्यात मोठा समूह सिहाला हा होता.जेव्हा भारत आणि श्रीलंके च्या ब्रिटिश राजवटी मध्ये श्रीलंके मध्ये

मोलमजुरी करण्यासाठी भारतातून भरपूर प्रमाणात भारतातल्या तामिळींना श्रीलंके मध्ये नेण्यात आले.श्रीलंकेच्या स्वातंत्र्यानंतर दुसरा मोठा समुदाय म्हणजे तामिळ पण होता.त्या नंतर हळू हळू तामिळी जनतेचे शोषण होऊ लागले,याच कारणास्तव तामिळी जनतेच्या हितासाठी तिथे छोटेमोठे गट तयार झाले (

संघटना) यातच १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध सुरु झाले.ज्यातून भारताला पाकिस्तान मधून पूर्व पाकिस्तान काढून त्यातून बांगलादेश तयार करायचा होता.जेव्हा युद्ध सुरु झाले तेव्हा पाकिस्तान ला भारतीय हवाई हद्द वापरण्यास मज्जाव केला गेला.या साठी पाकिस्तानला बांगलादेश ला जाण्यासाठी

भारताला वेढा घालून श्रीलंके वरून पूर्व पाकिस्तान ला (बांगलादेश ला) जावे लागत होते.हे अंतर खूप होते त्यामुळे लढाऊ विमानांना इंधन खूप लागत होते.याच वेळी श्रीलंकन सरकारने पाकिस्तानला मदत करायला सुरवात केली,श्रीलंकेने त्यांची हवाई हद्द आणि इंधन दोन्ही गोष्टी पाकिस्तानला वापरायला

दिल्या.तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी श्रीलंकेला खडेबोल सुनावले कि तुम्ही भारत पाकिस्तान च्या भानगडीत पडू नका.पण श्रीलंकेने इंदिरा गांधींच्या चेतावणी ला केराची टोपली दाखवली.तेव्हा इंदिरा गांधीजींनी ठरवले कि श्रीलंकेला दणका देयाचा.त्यांनी विचार करून ठेवला होता कि आता

श्रीलंकेचे दोन तुकडे करावे लागणार नंतर भारत सरकार ने अनधिकृतपणे तामिळी अधिकाऱ्यांसाठी लढणाऱ्या गटांना मदत पुरवायला सुरु केले त्यांना खाण्या पिण्याच्या आणि युद्ध सामुग्री पण पुरवल्या गेल्या.हे सगळे चालू असताना लिट्टे (Liberation tigers of tamil Eelam )ची सुरवात झाली.हे एक

राजनैतिक आणि सैनी संघटन आहे.हे संघटन श्रीलंके मध्ये स्वतंत्र तामिळ राष्ट्र असावे अशी मागणी करत होते.तामिळी जनतेचे रक्षण करण्यासाठी ज्या संघटना उभय राहिल्या त्यातील एक tamil new tigers हि पण संघटना होती.TNT मध्ये विद्यार्थी आणि तरुणाचा खूप मोठा वर्ग होता आणि याचा कर्ता धर्ता

व्ही प्रभाकरन होता.श्रीलंकेमधील अल्पसंख्येक तामिळ भीती खाली वावरत होते त्यांना वाटत होते त्यांची ओळख श्रीलंकेमधून पुसून टाकली जाईल, बहुसंख्यिक सिंहला जनता त्यांचा धर्म त्यांची भाषा हि समाप्त करायला निघाली आहे.१९५६ मध्ये श्रीलंकेने एका विवादित कायद्यावर शिक्का मोर्तब केले.

सिंहली भाषेला राष्ट्रीय भाषा जाहीर करून टाकले.तामिळी लोक स्वतःच्या भाषेविषयी खूप सवेंदनशील असतात.(या बाबतीत मराठी लोकं विरुद्ध आहेत.स्वतःच हिंदी आणि इंग्रिजीचा भढीमार चालू करतात.) तामिळी भाषेचा आग्रह त्याचा दुसरा पैलू असा पण होता कि सरकारी नोकरी मध्ये तामिळी जनतेचे महत्व कमी

होत चालेले.१९७६ येता येता LT लिट्टे (Liberation tigers of tamil Eelam )म्हणून ओळखू लागले होते.हि संघटना एवढी ताकतवान होती याचा अंदाज आपण असा लावू शकता कि लिट्टे ची स्वतःची पायदल,हवाईदल आणि नौदल होती.श्रीलंका सरकार ज्या सघंटनेला आतंकवादी संघटना म्हणत होती ती संघटना जगातील एकमेव

अशी संघटना होती ज्या संघटने कडे वायुसेना आणि नौसेना होती,हळू हळू या संघटनेने संपूर्ण श्रीलंकेमध्ये दहशत पसरवली होती कि त्यांनी तिथल्या एका राष्ट्रपतीला त्यांनी सुसाईड बॉम्बिंग करून टाकले.हळू हळू हे संघटन एवढे ताकातवर होत चालले होते कि भारत पण चिंताग्रस्त झाला होता.तत्कालीन

प्रधानमंत्री राजीव गांधी यांना एका भारत सरकारमधील अधिकाऱ्याने सांगितले होते जर लिट्टे आत्ता नाही थांबवले तर उद्या हि संघटना भारतावर भारी पडेल.तत्कालीन भारत सरकारला हि चिंता होती कि उद्या या संघटनेने श्रीलंके मध्ये स्वतंत्र प्रस्थापित केले तर भारतातील तामिळी जनतेला एकत्रित करून

तामिळ भूमी स्थापन करण्याची मागणी करू लागतील,म्हणूनच भारत सरकारने लिट्टे आणि श्रीलंका सरकार मध्ये एक शांती समझोता केला.पण हा समझोता काही कारणास्तव जास्त दिवस टिकला नाही.भारत सरकारने श्रीलंकेमध्ये आपली शांती सेना पाठवली होती.याचा च फायदा घेत भारत सरकार ने विचार केला कि लिट्टे

ला या द्वारे समाप्त करूया.पण हा डाव उलटा पडला भारत सरकार ला वाटले २-३ दिवसाचे हे misssion असेल, पण असे झाले नाही.हे युद्ध १ नाही,२ नाही तब्बल ३ वर्ष हे युद्ध चालू होते.१९८९ मध्ये राजीव गांधी निवडणूक हरले. नवीन प्रधानमंत्री विश्वनाथ प्रतापसिंग यांनी शांती सेनेला परत बोलावूंन

घेतले १९९० पर्यंत सगळे भारतीय सैन्य परतले.या ३ वर्षांमध्ये भारताचे १२०० जवान शाहिद झाले होते.यातच पुढच्या निवडणूक येऊ घातल्या ओपिनियन पोल मध्ये राजीव गांधींचे सरकार येणार असे चित्र झाले असताना राजीव गांधींनी निवडणुकांच्या सभेमध्ये घोषणा केल्या कि ते श्रीलंकेमध्ये तामिळी

जनतेच्या हितासाठी शांती प्रस्थपित करण्यासाठी भरपूर प्रयत्न करणार म्हणून सांगितले. लिट्टे ला भीती होती जर राजीव गांधींचे सरकार आले तर काय करतील सांगता येत नाही. म्हणून आत्मघातकी बॉम्ब चा कट रचला गेला आणि २१ मे १९९१ च्या रात्री १० वाजून २०मिनीटांनी तामिळनाडूच्या श्रीपेरंबुदुर

मध्ये त्यांना मारले गेले.ज्यांनी मारले ते लिट्टेचे प्रशिक्षित आतंकवादी होते.राजीव गांधींच्या हत्येची माहिती हि अगोदरच भारतीय गुप्तहेर खात्याला होती त्यांनी राजीव गांधींना अगोदरच सांगितले होते कि तुम्ही तामिळनाडू मध्ये कुठे हि कोणतेही रॅली करू नका.त्यांनी कोणाचे ऐकले नाही

आणि म्हंटले कि मी घाबरून घरात बसू शकत नाही असे होणार नाही.या नंतर २००९ मध्ये श्रीलंकन सरकार ने लिट्टे चा खात्मा करून टाकला आणि या गृहयुद्धमध्ये ७० हजार पेक्षा जास्त लोकांचे प्राण गेले.यानंतर लिट्टेच्या काही त्या युद्धातून वाचलेल्या समर्थकांनी निर्वासित सरकारचे घटन केले.

विदेशात असलेले श्रीलंकन तामिळी शांततेच्या माध्यमातून तामिळी हिताच्या अजूनही मागणी करत असतात.(transnational government of tamil eelam)
या वेबसिरीज मध्ये नायक शेवटी जिंकलेला दाखवला आहे. reel आणि real life मध्ये हाच फरक आहे मित्रांनो !!

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling